________________
चमत्कार
___51
एक माणूस तर मला सांगत होता, 'दादा, आपले अपहरण करून घेऊन जाऊ.' मी म्हणालो, 'हो, या जगाचे काही खरे नाही.'
आम्ही जादुगार नाही म्हणजे आपल्या इथे असे रोजचे कितीतरी चमत्कार होतात, पण मी सगळ्यांना सांगत असतो की, दादा चमत्कार करीत नाहीत. दादा जादुगार नाहीत. हे तर आमचे 'यशनाम' कर्म आहे. एवढे सारे यश आहे की फक्त हात लावला आणि तुमचे काम फत्ते होऊन जाते. आपल्या इथे एक ज्ञान घेतलेले महात्मा आहेत. त्यांची सासू कॅन्सरच्या टाटा हॉस्पिटलमध्ये होती. तर त्यांच्या सासूबाईंना हॉस्पिटलवाल्यांनी रजा दिली की आता दोन-तीन दिवसात ही केस 'फेल' होणार आहे, तर यांना तुम्ही घरी घेऊन जा. तेव्हा त्या महात्म्याच्या मनात आले की, 'दादा इथे मुंबईतच आहेत, तर माझ्या सासूला दादांचे दर्शन करवून देतो. मगच इथून जाऊ.' म्हणून मला येऊन सांगू लागले की, 'माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांना जर दर्शन दिले तर खूप बरे होईल.' मी म्हणालो, 'चला, मी येतो.' मग मी टाटा हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याने सासूला सांगितले, 'दादा भगवान आले.' म्हणून ती बाई तर उठून बसली. कुणालाही अशी आशा नव्हती, पण ती बाई त्यानंतर चार वर्ष जगली. त्या डॉक्टरांनी सुद्धा त्याची दखल घेतली की हे दादा भगवान येथे आले आणि कुणास ठाऊक त्यांनी काय केले! पण मी काही केले नाही फक्त पायावर विधी करवून घेतली होती! असेच बडोद्याच्या मोठ्या हॉस्पिटलवाल्यांनीही नोंद घेतली होती की 'दादा भगवान' यांच्यामुळे एवढ्या रुग्णांमध्ये फेरफार झालेला आहे.
नंतर तीन जणांनी तर आम्हाला अशी बातमी दिली होती की अचानक तोल गेल्यामुळे विमान हलू लागले तेव्हा लगेचच आम्ही 'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' बोलू लागलो, आत लोकांमध्ये तर आरडाओरड सुरु झाली होती, पण आम्ही 'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' बोललो की लगेच प्लेन व्यवस्थित झाले!!
इथे संसार मुक्त, युक्त नाही असे आमचे कितीतरी चमत्कार होत असतात, तरीही आम्ही त्यास