________________
चमत्कार
वर्ग येईल? चमत्काराला मानणारीच सर्व माणसे येतील! खरी माणसे चमत्कार पाहू इच्छिणारच नाही. बुद्धिवंत वर्ग जर चमत्काराची गोष्ट ऐकेल ना, तर तिथून पळून जाईल. बुद्धिवंतांना चमत्कार चालतच नाही. चमत्कार तर जादू आहे, मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत हे सर्व!
चमत्कार म्हणजे अंधश्रद्धा प्रश्नकर्ता : सत्पुरुष चमत्कार करतात का?
दादाश्री : सत्पुरुष चमत्कार करीत नाहीत आणि जे चमत्कार करतात ते सत्पुरुष नाहीत, ते मग जादुगार म्हटले जातील.
प्रश्नकर्ता : पण मुक्ती साधनेत सफलता प्राप्त करणारे चमत्कार तर घडवू शकतात ना?
दादाश्री : त्यांचे चमत्कार असे नसतात, त्यात असे कुंकु काढणे किंवा असे-तसे काही चमत्कार नसतात. त्यात तर जगात पाहण्यात आले नसेल असे परिवर्तन आपल्या अनुभवास येते. पण त्यासही आपण चमत्कार म्हणू शकत नाही. हे चमत्कार तर जादुगिरी म्हटली जाते!
प्रश्नकर्ता : पण दादा, एका संताने आंब्याचे पान घेऊन चमत्कार करून दाखवला होता. असे दोन चमत्कार मी स्वतः पाहिले आहेत!
दादाश्री : हो. पण ते जे पान मागवले, ते कशाचे पान मागवले? आंब्याचे ना? आता त्याच्या बदल्यात जर आपण सांगितले की, 'भाऊ, हे महुव्याचे पान आहे, ते घे'. तेव्हा तो म्हणेल, 'नाही, हे नाही चालणार. मला आंब्याचे पान द्या!' म्हणजे आपण जर म्हटले की हे महुवाचे पान घेऊन तू असा चमत्कार करून दाखव तर ते नाही होणार. म्हणजे हे सर्व एविडन्स आहेत. हे 'स्टील' तर असे आहे की लाख चमत्कार केले तरीही वाकणार नाही!
प्रश्नकर्ता : तर हे जे सर्व काढतात, भस्म, घड्याळ, कुंकू, आणि तांदूळ वगैरे, ही सर्व जादुगिरी आहे की चमत्कार आहे ?
दादाश्री : जादुगिरी, हातचालाखी! आपल्याला समजत नाही म्हणून