________________
चमत्कार
ह्या जगात संयोगाशिवाय कुठलेही काम होत नाही. कारण सर्व डिस्चार्ज संयोगाचे मिलन आहे, म्हणजेच सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. कोणी म्हणेल की, 2H आणि O दिले तर मी तुम्हाला पाणी बनवून दाखविन. तेव्हा हा तर पाणी होण्याचा स्वभावच आहे. त्यात तू कसला आलास 'मेकर' (बनवणारा) मी तुला एक H आणि एक O दिला आणि जर तू पाणी बनवून दाखवलेस तर मी तुला मेकर म्हणेन. तेव्हा तो म्हणेल, 'ते बनणार नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'नाहीतरी तू काय करणार होतास? उगाचच आपला!' म्हणजे हे संयोगांचे मिलन आहे ! 'आता हे संयोग नसतील आणि तू केलेस, ते मला दाखव,' असे आपण म्हणावे. म्हणजे चमत्कार त्यास म्हणतात की त्यात संयोगांचे मिलन होता कामा नये.
आणि परत चमत्कार करणारा म्हणतो की आता या वेळेला होणार नाही!' 'का तू वेळेची वाट पाहतोस? म्हणून चमत्कार नाही.' पण असे विचारता येतच नाही ना लोकांना! मी तर त्याचे स्पष्टीकरण विचारले ना, तर त्याचे सांधेच तोडून टाकीन. कारण मला खुलासा मागता येतो! पण आपण का त्यांच्या मागे लागायचे? याचा मग अंतच येणार नाही. अनंत जन्मांपासून या आणि याच भानगडीत पडले आहेत. भगवंतांच्या काळात चौऱ्यांशी लाख विद्या होत्या, तर भगवंत त्या सर्व विद्यांचा नाश करून गेले. पण तरीही थोडे-फार लीकेज राहून गेले !! हे तर असे आहे की, खरे विज्ञान हरवले आहे, ते निसर्ग आपणहूनच बाहेर काढेल! आपण भाव करा ना, की ह्या चमत्कारांच्या सर्व विद्या जाव्यात इथून.
जय सच्चिदानंद