Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 47
________________ 36 चमत्कार प्रश्नकर्ता : शंका येईल. दादाश्री : शंका वाटेल अशी गोष्ट सोडून द्या, खरे मानू नका त्यास! लिहिलेले लेख मिटत नाहीत कोणाकडूनही प्रश्नकर्ता : संत लेख मिटवू शकतात का? दादाश्री : हे फॉरेन डिपार्टमेन्ट आहे ना, त्यात लेख मिटेल असे शक्यच नाही आणि मिटवून टाकले असे जे दिसते, आपल्याला अनुभवास येते, संतांच्या माध्यमातून किंवा 'ज्ञानीपुरुषां'च्या माध्यमातून, ते त्यांच्या यशनाम कर्माचे फळ आले आहे ! अर्थात् लेख कोणीही मिटवू शकत नाही. नाहीतर कृष्ण भगवंतांनी मिटवले नसते? त्यांना काय मिटवता येत नव्हते? ते तर स्वतः वासुदेव नारायण होते. प्रश्नकर्ता : पण कित्येक संत असे पण सांगतात की त्यांनी मृत्युला दूर करण्याचा प्रयत्न केला! दादाश्री : असे आहे ना, हिंदुस्तानात सर्व संतांनी मृत्युला दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण कोणालाही असे वाटले की मृत्यू दूर झाला, म्हणून? म्हणजे हा सर्व अहंकार आहे. अहंकाराच्या बाहेर कोणी संत निघाले नाहीत. हा सर्व अहंकार आहे. आणि अहंकारींना समजवण्यासाठी आहे. निरअहंकारी तर अशा गोष्टी ऐकणारही नाही. एखादा वेडा मनुष्य बोलत असतो ना, यासारखी गोष्ट करतात हे !! आपले सारेच संत असे म्हणतात, पण ते अहंकाराने बोलतात आणि ऐकणारे सुद्धा अहंकारी आहेत, म्हणून जमले! हे तर सायन्टिफिक रित्या समजू शकेल असे आहे. विज्ञानाने समजेल की नाही समजणार? हे तर विज्ञान आहे आणि विज्ञान काय सांगते की शौचाला जाण्याचीही शक्ति कुणात नाही, संतामध्येही शौचाला जाण्याची शक्ति नाही आणि आमच्यातही शौचाला जाण्याची शक्ति स्वतःची नाही. भगवान महावीरांचा जेव्हा अंतिम निर्वाणकाळ जवळ आला तेव्हा देवतांनी विनंती केली की, 'वीर, आपण आयुष्य वाढवा, प्रभु! दोन-तीन मिनिटांचे आयुष्य वाढवले तर या जगावर 'भस्मक' ग्रहाचा दुष्परिणाम होणार नाही.' पण 'भस्मक' ग्रहाचा दुष्परिणाम झाला, त्यामुळे हे दु:ख सहन करावे

Loading...

Page Navigation
1 ... 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72