________________
दादाश्रींनी व्यवसाय आदर्शपणे, अतुल्यपणे केला, पण तरीसुद्धा त्यांचे चित्त तर सदैव आत्मा प्राप्त करण्यातच होते. १९५८ मध्ये आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्षे व्यवसाय चालू राहिला. पण स्वतः आत्म्यात राहून, मन-वचन-काया, जगाला आत्मा प्राप्त करवून देण्यासाठी गावोगावी, जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करण्यात घालविले. अशी कोणती अलौकिक दृष्टी प्राप्त झाली की जीवनात व्यापार-व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही एकाचवेळी सिद्धीच्या शिखरावर राहून शक्य झाले?
लोकसंज्ञेत लक्ष्मीलाच प्राधान्य आहे, पैशालाच अकरावा प्राण म्हटले आहे, असा प्राण समान पैशांचा व्यवहार जो आपल्या जीवनात घडत आहे, त्या संबंधात देण्या-घेण्याचे, फायदा-तोट्याचे, या जन्मात लक्ष्मी टिकण्याचे आणि पुढील जन्मी सोबत घेऊन जाण्याचे, जे मार्मिक सिद्धांत आहेत, तसेच लक्ष्मीच्या स्पर्शाचे जे नियम आहेत, ते सर्व, ज्ञान दृष्टीने पाहून आणि व्यवहारात अनुभवून दादाश्रींच्या वाणीद्वारे जी विस्तारीत माहिती प्राप्त झाली, तो हा 'पैशांचा व्यवहार' सूज्ञ वाचकांना आयुष्यभर सम्यक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरेल, हीच अभ्यर्थना!
- डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद
10