________________
पैशांचा व्यवहार
५९
'यांची (दादाजींची) परत भेट झाली नाही तर उत्तम.' आणि कधी वाटेत जाताना मी दिसलो, तर दुसऱ्या दिशेने निघून जाईल, हे माझ्या पण लक्षात येते. म्हणजे अशा प्रकारे मी सुटलो, मी या सर्वांना सोडू इच्छित होतो आणि या सर्वांनी सोडले मला!!
निसर्गाचा न्याय काय म्हणतो? की 'जे घडले ते करेक्ट,' जे घडले तोच न्याय. जर तुम्हास मोक्षाला जायचे असेल तर जे घडले, त्यालाच न्याय समजा, आणि जर तुम्हास भटकत राहायचे असेल तर कोर्टाच्या न्यायाने निकाल लावा. निसर्ग काय सांगतो? घडले तोच न्याय आहे, असे जर तुम्ही समजाल, तर तुम्ही निर्विकल्पी होत जाल आणि जर कोर्टाच्या न्यायाच्या दिशेने तुम्ही पुढे गेलात तर विकल्पी होत जाल.
तीन-तीनदा फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा कर्जदार भेटणार नाही. आणि जर का भेटला, तर तो आपल्यावरच चिडतो. हा मार्ग असा आहे की घर बसल्या तुम्हाला पैसे परत द्यायला येईल. पाच-सातवेळा तुम्ही त्याच्याकडे वसुलीसाठी जाऊन आलात, तरी शेवटी तो म्हणतो की 'महिन्यानंतर या' आणि त्याक्षणी जर तुमचे परिणाम बदलले नाहीत, तर घर बसल्या पैसे मिळतील, पण तुमचे परिणाम बदलतात ना? 'हा तर बेअक्कल माणूस आहे, नालायक आहे. येथे येणे वाया गेले.' असे तुमचे परिणाम बदलतात ना! तुम्ही तिथे परत गेले तर तो शिव्या देईल. तुमचे परिणाम बदलतात त्यामुळे समोरचा माणूस बिघडणार नसेल तरीही बिघडतो.
प्रश्नकर्ता : याचा अर्थ असाच ना की आपणच समोरच्या माणसाला बिघडवतो?
दादाश्री : आपणच आपले सर्वकाही बिघडविले आहे. ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व आपणच घडवून आणल्या आहेत. आता त्यास सुधारण्याचा उपाय काय? तर समोरचा कितीही दुःख देत असेल, तरीही त्याच्यासाठी मनात एकही उलट विचार करायचा नाही, हाच त्याला सुधारण्याचा उपाय. यात आपलेही सुधरते आणि त्याचेही सुधरते. लोकांच्या मनात उलट-सुलट विचार आल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून तर आम्ही समभावे निकाल करण्यास सांगितले आहे. समभावे निकाल म्हणजे काय? की त्याच्या बाबतीत काही विचारच करायचा नाही.