Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 96
________________ पैशांचा व्यवहार दादाश्री : निश्चितच होते! त्याने तितका त्याग तर केला ना! स्वतः जवळ आलेल्याचा त्याग केला ना! पण हेतूनुसार ते पुण्य तशा प्रकारचे बनते, हेतू जसा असेल तसे! हे पैसे दिले एवढेच मात्र पाहिले जात नाही. पैशांचा त्याग केला हे निर्विवाद. परंतु ते कुठून आले, हेतू काय, हे सर्व प्लस-माईनस होऊन जे शिल्लक राहील, ते मग त्याचे. त्याचा हेतू काय आहे ? तर सरकार घेऊन जाईल त्यापेक्षा दान करून टाका! प्रश्नकर्ता : लोक लक्ष्मीचा संग्रह करून ठेवतात. ती हिंसा म्हणायची की नाही? दादाश्री : हिंसाच म्हणायची. संग्रह करणे ही हिंसाच आहे. दुसऱ्या लोकांना त्याचा उपयोग घेता येत नाही ना! प्रश्नकर्ता : काही मिळवण्याचा अपेक्षेने जे दान दिले जाते, त्याची पण शास्त्रात मनाई नाही. त्याची निंदा केलेली नाही. दादाश्री : त्याने अपेक्षा ठेवली नाही तर उत्तम आहे. अपेक्षा ठेवली जाते ते दान तर निर्मूळ झाले, सत्वहीन म्हटले जाईल. मी तर म्हणतो पाचच रुपये द्या, पण अपेक्षा न ठेवता द्या. कुणी लाख रुपये धर्मासाठी दिले. आणि स्वतःच्या नावाची पाटी लावून घेतली, आणि कोणी एकच रुपया धर्मासाठी दिला, पण गुप्तपणे दिला, तर या गुप्तदानाची किंमत जास्त आहे. मग जरी तो एक रुपया असला तरीही. आणि ज्याने स्वत:च्या नावाची पाटी लावून घेतली त्याची तर 'बॅलेन्स शीट' संपली, कारण त्याने जे धर्मासाठी दिले होते त्याचा मोबदला त्याने पाटी लावून (इथेच) मिळवून घेतला. आणि ज्याने एकच रुपया खाजगीत दिला, पण त्याने त्याचा मोबदला घेतला नाही, म्हणून त्याचे बॅलन्स शिल्लक राहिले. प्रश्नकर्ता : पुण्याच्या उदयामुळे गरजेपेक्षा जास्त लक्ष्मीची प्राप्ती झाली तर? दादाश्री : तर वापरुन टाकायची, मुलांसाठी फार जपून ठेवू नये.

Loading...

Page Navigation
1 ... 94 95 96 97 98 99 100