Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 20
________________ पैशांचा व्यवहार अशा प्रकारे जन्मोजन्मीची योजना आखतच असतो जीव, आणि त्यामुळे त्याचे जन्म-मरण थांबतच नाही. योजना बंद होईल, तेव्हा त्याची मोक्षाला जाण्याची तयारी सुरु होईल. एकही जीव असा नसेल की जो सुख शोधत नसेल! त्यात पण त्याला कायमचे शाश्वत सुखच हवे! त्याला असे वाटते की लक्ष्मीमध्ये सुख आहे, पण त्यात सुद्धा आत धगधग होत असते. एकीकडे धगधग आणि दुसरीकडे कायमच्या सुखाची प्राप्ती, हे एकाचवेळी शक्यच नाही. दोन्ही गोष्टींचा विरोधाभास आहे. त्यात लक्ष्मीजींचा दोष नाही. त्याचा स्वत:चाच दोष आहे. ___ जगातील सर्व वस्तू एक दिवस अप्रिय वाटतील परंतु आत्मा तर स्वतःचेच स्वरुप आहे, तिथे द:ख कधीच नसते. जगात तर पैसे देणारा सुद्धा अप्रिय वाटू शकतो. पैसे कुठे ठेवायचे याचीच पंचाईत! थोडक्यात म्हणजे, पैसे असतील तरी दु:ख, आणि नसतील तरी दु:ख. प्रधान मंत्री झाला तरी दु:ख, गरीब असला तरी दुःख, भिकारी असला तरी दुःख, विधवा झाली तरी दुःख, संसार थाटला तिलाही दुःख, सात नवरे असतील तिलाही दुःख. दुःख, दुःख, आणि दुःख. अहमदाबादच्या शेठजींना सुद्धा दुःख. याचे कारण काय असू शकेल? प्रश्नकर्ता : त्यांना संतोष नाही. दादाश्री : ह्यात सुख होतेच कुठे? सुख नव्हतेच. हे तर भ्रांतीमुळे असे भासते. जसे एखाद्या दारुड्याचा एक हात गटारीत पडला असेल तरी तो म्हणेल, हो, आत तर कसा गारवा वाटतो, फार छान आहे. हे असे दारुमुळे वाटते. बाकी यात सुख असणारच कसे? निव्वळ खरकटेच आहे हे सारे! ___ या जगात सुख नाहीच. सुख असूच शकत नाही आणि जर सुख असते तर मुंबई अशी नसती. सुख नाहीच मुळी, हे तर भ्रांतीचे सुख आहे. आणि ती निव्वळ टेम्पररी एडजस्टमेन्ट आहे. पैशाचे ओझे वाहण्यासारखे नाही. बँकेत जमा झाले की हुश्श् म्हणणार आणि बुडाले म्हणजे दु:ख होणार, या जगात काहीच हश्श् करण्यासारखे नाही, कारण हे सर्व टेम्पररी आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100