Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 55
________________ ४४ पैशांचा व्यवहार लाखाचे नुकसान झाले तर? हे तर एक लाखाचे नुकसान सुद्धा पचवू शकत नाहीत ना! मग दिवसभर रडारड, चिंता, करत बसतात! अरे, वेडे सुद्धा होऊन जातात! असे वेडे झालेले आत्तापर्यंत मी बरेच पाहिले आहेत! प्रश्नकर्ता : दुकानात गिहाईक यावे म्हणून मी दुकान लवकर उघडतो आणि उशीरा बंद करतो, हे बरोबर आहे ना? दादाश्री : ग्राहकांना आकर्षित करणारे तुम्ही कोण? इतर लोक ज्यावेळी दुकान उघडतात त्यावेळी तुम्हीही उघडायचे. लोक सात वाजता उघडत असतील आणि तुम्ही साडे नऊ वाजता उघडले तर तेही बरोबर नाही. आणि लोक जेव्हा बंद करतील तेव्हा तुम्ही सुद्धा बंद करून घरी जावे. व्यवहार काय सांगतो की लोक काय करतात ते बघा. ती जेव्हा झोपतात तेव्हा तुम्ही पण झोपा. रात्री दोन वाजेपर्यंत धुमाकूळ घातला तर त्यास काय म्हणावे? जेवल्यानंतर विचार करत बसता का, की कसे पाचन होईल? त्याचा परिणाम सकाळी पाहायला मिळतोच ना? असेच धंद्यात सुद्धा आहे. खाण्या-पिण्याच्यावेळी चित्त कारखान्यात जात नसेल तर, कारखाना बरोबर आहे, पण जर खाण्या-पिण्याच्यावेळी चित्त कारखान्यात पळत असेल, तर तो कारखाना काय कामाचा? आपले हार्टफेल करविणारा कारखाना काय उपयोगाचा? तात्पर्य काय की नॉर्मालिटी समजून घ्या. परत कारखान्यात तीन शिफ्ट चालवतो. त्यात हा नवीन लग्न झालेला आहे, तेव्हा बायकोच्या मनाचेही समाधान व्हायला पाहिजे ना! घरी गेल्यावर बायको तक्रार करेल, की 'तुम्ही तर मला भेटतही नाहीत. माझ्याशी दोन शब्द सुद्धा बोलत नाही. तर हे योग्य नाही ना! संसारात योग्य दिसेल असा व्यवहार असला पाहिजे, नाही का? । घरात वडिलांबरोबर किंवा इतर मंडळीबरोबर धंद्याच्या बाबतीत मतभेद होऊ नये यासाठी तुम्ही पण 'होय बरोबर आहे,' असे सांगा. 'जसे चालत आहे तसे चालू द्या,' असे म्हणायचे पण घरात सर्वांनी मिळून असे काही ठरवायला हवे की इतकी रक्कम जमा केल्यानंतर आपल्याला जास्त नकोत. असे ठरवायला हवे.

Loading...

Page Navigation
1 ... 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100