Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 87
________________ ७द पैशांचा व्यवहार मी समजून आहे की या बिचाऱ्याची मती अशी आहे. त्याची दानत अशी बनली आहे. त्यामुळे त्याला जाऊ द्या. 'लेट गो करा' आम्ही कषायांपासून (क्रोध-मान-माया-लोभापासून) मुक्त होण्यासाठी आलो आहोत. म्हणून स्वतःची फसवणूक होऊ देतो, दुसऱ्यांदा सुद्धा फसविले जातो. समजून-उमजून फसवणूक पत्करणारे लोक फार कमी असतात ना? लहानपणापासून माझे प्रिन्सिपल (सिद्धांत) होते की समजून फसवणूक होऊ द्यायची. बाकी, मला कुणी मूर्ख बनवू शकेल आणि फसवू शकेल, या गोष्टीत काही तथ्य नाही. अशाप्रकारे समजून फसण्याचा परिणाम काय झाला, की ब्रेन टॉप वर पोहोचले. मोठमोठ्या जजीसचे ब्रेन जिथे चालणार नाही, तिथेही आमचे ब्रेन काम करू लागले. श्रीमद राजचंद्र यांनी लिहीले आहे की, ज्ञानी पुरुषाची तन, मन, आणि धनाने सेवा करा. तेव्हा कुणी विचारले की 'ज्ञानी पुरुषाला धनाचे काय काम? त्यांना तर कोणत्याही वस्तूची इच्छा नसते. तर ते म्हणाले,' नाही. तुम्ही तन-मनपूर्वक सेवा करत आहात पण तुम्हाला असे सांगितले की या सुयोग्य जागी धन देऊन टाका, तेव्हा तसे केल्याने तुमची लोभाची ग्रंथि तुटून जाईल. नाहीतर आपले चित्त लक्ष्मीच्याच ध्यानात राहील. एक माणूस मला भेटला. तो म्हणाला 'माझा लोभ काढून द्या. माझी लोभाची गाठ फार मोठी आहे! ती काढून टाका.' मी म्हटले, 'ती काढल्याने जाणार नाही. ती तर नशीबाने पन्नास लाखाचा तोटा आला की आपोआपच निघून जाईल.' म्हणेल, 'नको रे बाबा, आता पैसेच नकोत!' ___म्हणजे ही लोभाची गाठ तर नुकसान झाल्यावर निघून जाईल. मोठे नुकसान झाले की लोभाची गाठ पटकन तुटून जाते. नाहीतर एक ही लोभाची गाठ मात्र तुटत नाही. दुसऱ्या सर्व गाठी वितळतात. लोभी माणसाचे दोन गुरु, एक धूर्त माणूस आणि दूसरा तोटा. मोठा तोटा झाला की लोभाची गाठ पटकन वितळते आणि दुसरे, म्हणजे लोभ्याला त्याचा गुरु भेटतो, धूर्त ! हातात चंद्र दाखवून लुबाडणारे असे धूर्त असतात तेव्हा

Loading...

Page Navigation
1 ... 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100