Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 57
________________ ४६ पैशांचा व्यवहार ह्या सर्व बाबी वेगळ्या ठेवा. धंद्यात तोटा झाला तर असे म्हणा की धंद्याला तोटा झाला. कारण आपण (स्वतः) नफा किंवा तोट्याचे मालक नाही. मग तोटा आपल्या डोक्यावर का घ्यावा? आपल्याला नफा किंवा तोटा यांचा स्पर्शच होत नाही. आणि जर तोटा झाला आणि इन्कमटॅक्सवाला आला, तर धंद्याला सांगावे हे धंद्या! तुला पैशांची भरपाई करायची आहे. तुझ्याजवळ असतील तर तू चुकते कर. ___ आम्हाला कुणी विचारले की, 'या वर्षी तोटा झाला आहे का?' तर आम्ही म्हणतो, 'नाही बाबा, आमचा तोटा नाही झाला, धंद्याचा तोटा झाला आहे. आणि फायदा झाला तर सांगतो की, 'धंद्याचा फायदा झाला आहे.' आम्हाला नफा-नुकसान कधी नसतेच. काही वेळी कुणी शेठजी आग्रह धरतात की 'नाही, तुम्हास तर प्लेनने कलकत्त्यास यावेच लागेल. मी 'नाही, नाही' म्हटले तरी त्यांचा आग्रह चालूच राहतो. तेव्हा मग तिथे कमी-जास्तचा हिशोब करायचाच नाही. ज्या दिवशी तोटा होतोय असे वाटत असेल, त्या दिवशी आपण पाच रुपये 'अनामत' नावाने जमा करून टाकायचे. म्हणजे आपल्याजवळ शिल्लक, अनामत शिल्लक राहील. कारण या खातेवह्या काय कायमच्या आहेत? दोन-चार किंवा आठ वर्षाने फाडून नाही का टाकत? जर खऱ्या असतील तर कुणी फाडेल काय? हे सर्व तर मनाचे समाधान करण्याचे साधन आहेत. तर ज्या दिवशी आपल्याला दीडशेचे नुकसान झाले असेल त्या दिवशी आपण पाचशे रुपये अनामत खात्यात जमा करून टाकले की साडे तीनशेची शिल्लक आपल्याजवळ राहील. म्हणजे दिडशेच्या तोट्याऐवजी साडेतीनशेची शिल्लक आपल्याला दिसणार. असे आहे. हे सर्व जग गप गुणिले गप एकशे चव्वेचाळीस आहे, बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस नाहीत. बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस झाले असते तर तो एक्जेक्ट सिद्धांत म्हटला गेला असता. संसार म्हणजे गप्पगप्पे एकशे चव्वेचाळीस(थापेबाजी नुसती)? आणि मोक्ष म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस. समभाव कशास म्हणतात? समभाव फायदा आणि तोटा यांना

Loading...

Page Navigation
1 ... 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100