Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 62
________________ पैशांचा व्यवहार ५१ आता ते तुमची गय करणार नाहीत, मजूरांचे शोषण करण्याची पद्धत ठेऊच नका. तर मग तुमचीही पाळी येणार नाही. अरे, भयंकर कलियुगातही कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही! घरात सुद्धा तेजी-मंदी येते. तेव्हा मंदीच्या काळात आपण बायको वर रुबाब मारला असेल, तर नंतर तेजी येते तेव्हा ती आपल्यावर रुबाब जमवते. म्हणून तेजी-मंदीत एकसमान राहावे. एकसमान राहिल्याने सर्व छान चालेल. _हे जग एकक्षणही न्यायाबाहेर जात नाही. क्षणोक्षणी न्यायच होत असतो! अन्याय सहनच करू शकत नाही. जो अन्याय केला आहे, तो पण न्यायच होत राहिला आहे ! प्रश्नकर्ता : धंद्यात मोठे नुकसान झाले आहे तर काय करू? हा धंदा बंद करून टाकू, की दुसरा नवीन धंदा सुरु करू? फार देणे झाले आहे. दादाश्री : कापसाच्या धंद्याची नुकसान भरपाई किराणामालाचे दुकान काढून होणार नाही. धंद्यात आलेल्या तोट्याची भरपाई धंद्यानेच होऊ शकेल. नोकरी केल्याने ती भरपाई होणार नाही 'कॉन्ट्रॅक्ट' च्या कामाचे नुकसान, पान-बीडीचे दुकान उघडून भरली जाणार काय? ज्या बाजारात घाव लागला असेल, त्या बाजारातच तो बरा होईल. तिथेच त्याचे औषध असते. ____ आपला मनोभाव असा असावा की आपल्यामुळे कोणत्याही जीवाला किंचित्मात्रही दु:ख होऊ नये. संपूर्ण कर्ज फेडले जावे, असा आपला शुद्ध भाव असावा. लक्ष्मी तर अकरावा प्राण आहे. त्यामुळे कुणाचीही लक्ष्मी आपल्याजवळ राहता कामा नये. आपली लक्ष्मी कुणाकडे राहिली त्यास हरकत नाही. पण ध्येय निरंतर हेच असावे की मला पै पै चुकती करायची आहे. ध्येय लक्षात ठेऊन मगच तुम्ही खेळ खेळा. पण खेळाडू होऊ नका. खेळाडू झालात तर तुम्ही संपलेच समजा! प्रश्नकर्ता : आता हे सांगा की माणसाची दानत कोणत्या कारणाने बिघडते?

Loading...

Page Navigation
1 ... 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100