Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 26
________________ पैशांचा व्यवहार काही वकील तर शौचालयात बसून दाढी करतात. त्यांची धर्मपत्नी मला सांगत होती की आमच्याबरोबर कधी बोलत सुद्धा नाहीत. म्हणजे ते केवढे एकलकोंडे झाले आहेत. एकच बाजू, एकच कोपरा, आणि परिणामी रेसकोर्स(घोडदौड) असते ना! जी लक्ष्मी येते, ती परत तिथे जाऊन टाकून येतात! घ्या आता! इथे गाईचे दूध काढून तिथे गाढवाला पाजतात! या कलियुगात पैशांचा लोभ करून स्वतःचा जन्म वाया घालवतात आणि मनुष्यपणात आर्तध्यान-रौद्रध्यान करीत राहतात, त्याने मनुष्यपणा सुद्धा गमावतात. मोठमोठ्या राज्याचा भरपूर उपभोग घेऊन आले आहेत हे लोक. हे काही भिकारी नव्हते, पण आता मात्र मन भिकाऱ्यासारखे होऊन गेले आहे. त्यामुळे हे पाहिजे आणि ते पाहिजे, अशी हाव सुटत राहते. नाहीतर ज्याचे मन संतुष्ट असेल त्याला काहीच दिले नाही, तरीही तो राजश्री (समाधानी) असतो. पैसा ही अशी वस्तू आहे की त्यामुळे माणसाची दृष्टी लोभा प्रति जाते. लक्ष्मी तर वैरभाव वाढवणारी वस्तू आहे. त्यापासून जितके दूर राहता येईल तितके उत्तम! आणि जर खर्च करायचा असेल तर चांगल्या कामासाठी खर्च केले तर ती चांगली गोष्ट आहे. पैसे तर जितके येण्याचा योग असेल तितकेच येतील. धर्मात पडले तरी तेवढेच येतील आणि अधर्मात पडले तरी तेवढेच येतील. परंतु अधर्मात पडले तर दुरुपयोग होऊन दुःख पदरी पडेल, आणि धर्मात सदुपयोग होईल व सुख मिळेल, शिवाय मोक्षाला जाता येईल हा मोठा फायदा. बाकी पैसे तर मिळायचे असतील तेवढेच मिळतील. ___ पैशासाठी सारखा विचार करत राहणे, ही एक वाईट सवय आहे, ही सवय वाईट का म्हणायची? तर समजा एका माणसाला खूप ताप आला असेल. त्याला घाम सुटावा म्हणून आपण त्याला वाफ देऊन त्याचा ताप उतरवितो. वाफ देण्यामुळे पुष्कळ घाम सुटतो. पण मग रोज असे करून त्याचा घाम काढतच राहिलो तर त्याची काय स्थिती होईल? त्याला काय वाटते, की या उपचाराने एक दिवस मला चांगला फायदा झाला होता. माझे अंग हलके झाले होते. तर हे असे मी रोज करीन. आता रोजच्या रोज असा उपचार करून घाम काढतच राहिला तर काय परिस्थिती होईल?

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100