Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 19
________________ पैशांचा व्यवहार येते. आणि काही प्रयत्न करून दमतात तरी झोप लागत नाही, तर काहींना झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. थोडक्यात, लक्ष्मी ही तुमच्या सत्तेची बाब नाही, ती परसत्ता आहे. त्यामुळे परसत्तेची उपाधी आपण का करावी? म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की वाटेल तेवढी धडपड केली तरीही पैसे मिळतील असे नाही. ही गोष्ट ‘इट हॅपन्स' (आपोआप होत आहे) आहे. एवढे खरे की तुम्ही त्यात निमित्त आहात. कोर्ट-कचेरीत येणे-जाणे हे निमित्त आहे. तुमच्या तोंडून जी वाणी निघते, ते सर्व निमित्त आहे, तेव्हा तुम्ही त्यात जास्त लक्ष देऊ नका. आपोआपच लक्ष द्यायचे तिथे दिले जाईल आणि त्यात आपल्याला काही अडचण येणार नाही. हे तर मनातल्या मनात धरुन चालता की जर मी नसेन तर चालणारच नाही. या कोर्ट-कचेऱ्या सर्व बंद पडतील. असे तुम्ही मानता. खरेतर त्यात काही तथ्य नाही. ही लक्ष्मी प्राप्त होणे, म्हणजे त्यासाठी कितीतरी कारणे एकत्रित होतात तेव्हा लक्ष्मी प्राप्त होते. एखाद्या डॉक्टराच्या वडिलांच्या गळ्यात कफ चिकटून बसला, आणि आपण डॉक्टरांना सांगितले की तुम्ही तर इतकी मोठमोठी ऑपरेशन्स केली आहेत, तर हा जाम झालेला कफ खेचून काढा ना! तर तेव्हा म्हणेल, 'नाही. काढायला जाण्यापूर्वीच मृत्यू ओढावेल. अर्थात् अशा गोष्टीत आपले काहीच चालत नाही. सर्वकाही एव्हिडन्स एकत्र होऊन घडते! मला ज्ञान प्राप्त झाले तेही सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सच्या आधाराने ! हे जे करोडपति बनले आहेत ते स्वत:च्या हुशारीने नाही घडले. परंतु ते आपल्या मनातल्या मनात मानतात की मी (करोडपती) झालो. एवढीच भ्रांती आहे. आणि ज्ञानीपुरुषाला ही भ्रांती नसते. 'जसे आहे तसे' सांगतात! की बाबा, असे घडले होते. 'मी सूरतच्या स्टेशनवर बसलो होतो, आणि हे असे घडले.' तेव्हा हा मानतो की मी दोन करोड मिळवले! खरेतर हे सर्व तम्ही सोबत घेऊन आला आहात... पण तुम्ही असे मानून बसले आहात की 'हे सर्व मी केले' एवढेच. इगोईजम (अहंकार) आहे. आणि हा इगोईजम काय करतो? इगोईजमच्या आधारे तुम्ही तुमच्या पुढील जन्माची योजना आखत आहात.

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100