Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 50
________________ पैशांचा व्यवहार हे दोन नंबरचे लुटारु आहेत. तुम्हाला असे नाही का वाटत की हे दोन नंबरचे लुटारु आहेत ! हे सुधारलेले लुटारु आणि ते बिनसुधारलेले लुटारु ! हे सिविलाइज्ड लुटारु आणि ते अनसिविलाइज्ड लुटारु!!! प्रश्नकर्ता : दादाजी आपण तर भगवत् प्राप्तीचा मार्ग पत्करला आहे. त्याचबरोबर आपण मोठ्या व्यवसायात सुद्धा गुंतलेले आहात. तर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? दादाश्री : चांगला प्रश्न आहे की 'हसणे आणि पीठ खाणे' हे कसे शक्य आहे? काय म्हणता की, एकीकडे व्यवसाय करीत आहात आणि एकीकडे भगवत् प्राप्तीचा मार्ग पण पत्करला आहे, हे दोन्ही कसे शक्य झाले? पण ते शक्य आहे. बाहेरचे वेगळे चालत असते आणि आतले वेगळे चालत असते, असे आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्याच आहेत. हे 'चंदुभाऊ' (वाचकांनी स्वत:चे नाव समजावे) आहेत ना, ते चंदुभाऊ वेगळे आहेत आणि आत्मा वेगळा आहे. आत दोन्ही वेगळे होऊ शकतील असे आहे. दोघांचे गुणधर्म सुद्धा वेगळे आहेत. जसे इथे सोने आणि तांबे दोन्ही एकत्रित झाले असतील, तर त्यांना परत वेगळे करायचे असेल तर करता येईल की नाही? प्रश्नकर्ता : येईल. दादाश्री : त्याचप्रमाणे या दोघांना ज्ञानीपुरुष वेगळे करू शकतात, ज्ञानीपुरुष जे पाहिजे ते करू शकतात. आणि तुम्हालाही जर वेगळे करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या येथे, लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर या. व्यवसाय चालत राहतो, पण व्यवसायात एक क्षणसुद्धा आमचा उपयोग नसतो. केवळ नाव असते तिथे. परंतु आमचा उपयोग एक क्षणसुद्धा तिथे नसतो. महिन्यातून एकदा दोन तासासाठी कदाचित मला जावे लागते आणि तेव्हा जातो सुद्धा परंतु आमचा उपयोग त्यात नसतो. उपयोग नसतो म्हणजे काय, ते समजले का तुम्हाला? हे लोक दान मागण्यासाठी जातात ना? तर कुणाकडे दान घेण्यासाठी गेलो, व आपण

Loading...

Page Navigation
1 ... 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100