Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ पैशांचा व्यवहार तर सहजपणे त्यांच्याकडे येत असे. ते स्वतः तर असे म्हणत असत की, 'हे प्रभू! ही राजलक्ष्मी मला स्वप्नात पण नको.' आणि तरी पण ती येतच राहायची. ते काय म्हणत असत की आत्मलक्ष्मी असू दे, पण ही राजलक्ष्मी आम्हास स्वप्नात सुद्धा नको.' पण तरी ती येतच राहायची. हे पुण्यानुबंधी पुण्य. आम्हाला पण संसार रुचत नव्हता. माझेच सांगायचे, तर मला स्वतःला कोणत्याही (संसारी) गोष्टीत रुचीच नव्हती. पैसे मिळाले तरी ओझे वाटत असे. माझे स्वतःचे पैसे दिले तरी ओझे वाटायचे. पैसे घेऊन जाताना पण ओझे वाटायचे, घेऊन येताना पण ओझे वाटत होते. प्रत्येक बाबतीत ओझे वाटत होते, हे ज्ञान होण्यापूर्वी असे वाटायचे. प्रश्नकर्ता : आमचे विचार असे आहेत की धंद्यात इतके ओतप्रोत आहोत की लक्ष्मीचा मोह सुटतच नाही, त्यातच बुडून गेलो आहोत. दादाश्री : आणि तरी सुद्धा पूर्ण संतोष होत नाही ना! असेच वाटते ना की पंचवीस लाख मिळवू, पन्नास लाख गोळा करू, सतत असेच वाटत राहते ना? असे आहे, पंचवीस लाख तर मी पण जमा करण्याच्या नादात राहिलो असतो, पण मी तर हिशोब मांडून बघितला की इथे तर आयुष्याचे एक्सटेन्शन मिळत नाही. शंभर ऐवजी हजारेक वर्ष जगायला मिळत असतील तर मेहनत केलेली कामाची. पण इथे तर आयुष्याचा काही नेम नाही. एक स्वसत्ता आहे, दुसरी परसत्ता आहे. स्वसत्ता की ज्यात स्वतः परमात्मा होऊ शकतो. जेव्हा की पैसे कमावून घेण्याची सत्ता तुमच्या हातात नाही, ती परसत्ताच आहे, तर पैसे कमावणे चांगले की परमात्मा होणे चांगले ? पैसे कोण देत आहे हे मी जाणून आहे. पैसे मिळवण्याची सत्ता जर स्वतःच्या हातात असती तर भांडण करून सुद्धा कुठूनही मिळवले असते. पण ती परसत्ता आहे. त्यामुळे सगळे मुसळ केरात. काहीही निष्पन्न होत नाही. एका माणसाने मला विचारले की लक्ष्मी कशासारखी असते? तेव्हा मी म्हणालो झोपेसारखी. काही जणांना अंथरुणात पडल्याबरोबर झोप

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100