________________
पैशांचा व्यवहार
हे 'मी करत आहे.' त्याला अहंकार असतो. तर उपभोग करणाऱ्याला तसा अहंकार नसतो. पण तेव्हा त्याला भोक्तेपणाचा रस प्राप्त होतो. मेहनत करणाऱ्यांना अहंकाराचा गर्वरस मिळत असतो.
४
एक शेठ मला म्हणतात, 'या माझ्या मुलाला काही सांगा ना त्याला मेहनत करायची नाही आणि नुसती चंगळ करीत राहतो.' मी म्हटले ‘त्याला काहीही सांगण्यासारखे नाही. तो स्वतःच्या वाट्याचे पुण्य उपभोगत आहे. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची ?' तर ते मला म्हणाले, 'त्यालाही समंजस नाही का बनवायचे' ? मी म्हटले, 'जगात जो उपभोगत आहे त्याला समंजसच म्हणावा. बाहेर फेकून देईल त्याला वेडा म्हणावा. मेहनत करीत राहतो तो तर मजूर म्हटला जातो. पण मेहनत करतो त्याला अहंकाराचा रस मिळतो ना! लांब कोट चढवून हिंडू लागला की लोक म्हणतात 'या शेठ, शेठ आले,' असे स्वागत झाले की धन्य ! आणि उपभोग घेणाऱ्याला तशी मोठेपणाची पर्वा नसते. आपण आपले भोगले तेवढे खरे.
जगाचा नियम असा आहे की, हिंदुस्तानात जोवर बिन बरकतीचे असे लोक गोळा होत राहतील, तोपर्यंत लक्ष्मी वाढत राहील. आणि बरकत असलेल्याकडे पैसे जाऊ देणार नाही. थोडक्यात बिन बरकतीच्या माणसांना लक्ष्मी प्राप्त झाली आहे. म्हणजे योग्यता नाही अशा माणसांकडे लक्ष्मी गोळा झाली आहे, आणि डायनिंग टेबलावर बसून जेवण मिळते. परंतु खायचे-प्यायचे कसे ते मात्र त्यांना जमत नाही.
या काळातील जीव हे भोळे असतात. कुणी गंडवले, तरी हरकत नाही. उच्च जाति, नीच जाति, कसलीच पर्वा नाही. असे भोळे आहेत त्यामुळे लक्ष्मी खूप मिळते. लक्ष्मी तर, फार जागृत असेल त्यालाच मिळत नाही. जो फार जागृत असेल तो कषाय ( क्रोध - मान - माया - लोभ) पण फार करीत राहतो. दिवसभर कषायच करीत राहतो. आणि हे ( भोळे) तर जागृत नाहीत आणि कषाय सुद्धा नाहीत, म्हणून मग काही भानगडच नाही ना! त्यांच्याकडे लक्ष्मी येते परंतु लक्ष्मीचा वापर कसा करावा हे त्यांना माहित नसते. बेभानपणे सगळी निघून जाते.
आजच्या युगात हे जे धन आहे ना, ते सर्व खोटेच आहे. फारच