Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 30
________________ पैशांचा व्यवहार अशाता भोगत राहील. अर्थात् तो जे शाता की अशाता वेदनीय कर्म भोगत आहे, हे त्याच्या पैशांवर अवलंबून नसते. १९ आता आपल्याजवळ थोडी कमाई आहे. अगदी शांती-समाधान आहे, कोणतीही अडचण नाही, तर तेव्हा म्हणायचे की 'चला, आपण देवदर्शनाला निघूया!' आणि हे जे सर्व, पैसे कमविणाच्या नादात असलेले, त्यांनी अकरा लाख रुपये मिळवले, त्यास हरकत नाही, परंतु जर पन्नास हजारचा तोटा येण्याची वेळ आली तर त्यांना अशाता वेदनीय उत्पन्न होणार. 'अरे, अकरा लाखातून पन्नास हजार वजा करून टाक ना!' तर म्हणतो कसा, छे! पण तसे केले तर एकूण रक्कम कमी होईल ना ! अरे शहाण्या, रक्कम तू कशाला म्हणतोस ? कुठून आली ही रक्कम ? ती तर जबाबदारीवाली रक्कम होती, त्यामुळे कमी झाली तर आता आरडाओरड करू नकोस. रक्कम वाढली तर तू खुष होतोस आणि कमी झाली तर ? अरे, खरी पुंजी तर 'आतमध्ये' दडलेली आहे, आणि तू कशाला हार्टफेल करून घेऊन ती सर्व पुंजी उधळून टाकायला निघाला आहेस ? हार्टफेल झाला तर सर्व पुंजी वायाच गेली, नाही का ? दहा लाख रुपये बापाने मुलाला दिले असतील आणि बाप म्हणेल की 'मी आता आध्यात्मिक जीवन जगेन !' तर इथे मुलगा नेहमी दारु पिण्यात, मांसाहार करण्यात शेयरबाजारात, या सगळ्यात ते पैसे गमावून टाकतो. कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे कधीच स्वत:जवळ राहत नाही. अरे, आज तर सच्ची कमाई, खऱ्या मेहनतीचे पैसे सुद्धा टिकत नाही, तर खोटी कमाई कशी बरे टिकणार ? म्हणून पुण्याईचे पैसे हवेत, जे अप्रमाणिकतेने गोळा केले नसतील. आणि चोख दानत असेल अशी संपत्ति असेल तरच ती सुख देऊ शकेल. नाहीतर सध्याच्या दुषमकाळातील पैसे, तेही पुण्याईचेच म्हटले जातात, परंतु पापानुबंधी पुण्याईचे, त्याने निव्वळ पापाच बांधले जाते ! एक मिनिटसुद्धा जगणे कठीण, असा हा संसार ! जबरदस्त पुण्याई असली तरीपण अंतरदाह शांत होत नाही. अंतरदाह निरंतर जळतच असतो! चोहीकडून सगळे फर्स्ट क्लास संयोग असतात, तरीपण अंतरदाह चालूच

Loading...

Page Navigation
1 ... 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100