Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 90
________________ पैशांचा व्यवहार माणसाची अशी समजूत असते की पैसे संग्रह करून ठेवले तर मला सुख मिळेल. आणि मग दुःखी होण्याची वेळ कधीही येणार नाही. पण पैसे साठवत साठवत नकळत तो स्वतःच लोभाचा शिकार बनून लोभी बनतो. काटकसर करायची, इकॉनोमी करायची, पण लोभ करायचा नाही. लोभ कुठून शिरतो? लोभीपणाची सुरवात कुठून होते? पैसे जवळ नसतात तेव्हा लोभ नसतो पण जेव्हा नव्याण्णव होतात तेव्हा मनात येते की आज घरात खर्च करण्याऐवजी एक रुपया वाचवून शंभर पूर्ण करून टाकूया! याला म्हणतात नव्याण्णवाचा धक्का! एकदा का माणसाला हा धक्का लागला, तर मग पाच करोड झाले तरी तो लोभ सुटणार नाही. ज्ञानी पुरुषांनी धक्का मारला तरच ती लोभवृत्ती सुटू शकेल. लोभी माणूस सकाळी उठल्यापासून लोभाच्या आहारी जातो. सबंध दिवस त्याचा लोभाच्या हिशोबात जातो. म्हणेल भेंडी फार महाग आहेत. केस कापून घेण्यात सुद्धा लोभ! म्हणेल, अजून काय बावीस दिवसच झालेत, महिना पूर्ण होऊ दे की, काही बिघडत नाही. आले का लक्षात? हा स्वभाव आहे त्याचा. म्हणून ही गाठ त्याला सतत असे दाखवित असते. आणि कषाय होत राहतात. कपट आणि लोभ दोन्हीही दुःखदायक आहेत. पाच-पन्नास रुपये हाताशी असले तरीही खर्च करणार नाही, रिक्षा करणार नाही. पायाची तक्रार असेल, तरी सुद्धा! तेव्हा मी त्यांना म्हटले, 'असे करू नका. थोडे पैसे, दहा-दहा रुपये, रिक्षासाठी खर्च करायला सुरवात करा.' त्यावर ते म्हणाले, ते तर माझ्याने होऊ शकत नाही. द्यायचे झाले की अन्नाचा घास सुद्धा घश्याखाली उतरत नाही. 'आता हिशोबाने पाहिले तर मला सुद्धा कळते, की हे चुकीचे आहे. पण काय करणार? प्रकृती नकार देते.' तेव्हा एकदा मी त्यांना सांगितले, थोडे सुट्टे पैसे (चिल्लर) सोबत घ्या आणि ते रस्त्यात टाकत टाकत या! तर त्यांनी एक दिवस थोडे पैसे टाकले, नंतर बंद केले. ___ आता अशाप्रकारे दोन-चारदा टाकत आलो तर आपले मन काय म्हणेल की 'हा (चंदुभाऊ) तर आपल्या ताब्यात राहिला नाही. आमचे ऐकत नाही.' तर असे केल्याने आपले मन-बिन सगळे बदलते. आपल्याला

Loading...

Page Navigation
1 ... 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100