________________
पैशांचा व्यवहार
७७
लोभी हरखून जातो! आणि नंतर तो गुरु त्याची सर्व पुंजीच हडप करून टाकतो!
मला लोक विचारतात की 'समाधि सुखाचा अनुभव केव्हा होईल?' मी म्हटले, 'ज्याला काहीच नको असते, लोभाच्या सर्व ग्रंथी पूर्णपणे सुटतील तेव्हा होईल. लोभाची ग्रंथी एकदा सुटली की मग सुख सहजपणे अनुभवास येते. बाकी आत ग्रंथी बाळगून आहे त्याला सुख मिळतच नाही ना! म्हणून दुसऱ्यांसाठी पैसे खर्च करा. जितके दुसऱ्यांसाठी खर्च कराल, तितके तुमच्या पदरी जमा झाले.
जेवढे पैसे मिळतील तेवढे चांगल्या मार्गाने वापरतो, तो सुखी. तेवढे धन तुमच्या खात्यात जमा होते. नाहीतर गटारीत तर जाणारच आहेत. कुठे जातील? गटारीत जात असतील? या मुंबईचे सारे पैसे कुठे जात असतील? तिथे दांडगा प्रवाह गटारीतच वाहत राहतो! जेवढे चांगल्या मार्गाने वापरले तेवढे पैसे आपल्यासोबत येतील. दुसरे काहीही सोबत येणार नाही.
जिथे तिरस्कार आणि निंदा आहे, तिथे लक्ष्मी राहत नाही. लक्ष्मी केव्हा तोंड फिरवते? तर लोकांची निंदा-नालस्ती करणे चालू असते तेव्हा.
हा आपला देश केव्हा धनवान होणार? केव्हा लक्ष्मीवान आणि सुखी होईल? जेव्हा निंदा आणि तिरस्कार बंद होतील तेव्हा! हे दोन्ही बंद झाले की देशात पैसे आणि लक्ष्मी यांची रेलचेल होईल.
(६)
लोभाची समज, सूक्ष्मतेने प्रश्नकर्ता : कोणत्या प्रकारचे दोष भारी असतात की जे कित्येक जन्मापर्यंत चालू राहतात? ज्यायोगे कित्येक जन्म काढावे लागतात असे दोष कोणते?