Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 76
________________ पैशांचा व्यवहार नाही, पण तरीही मला करावे लागत आहे.' तुम्ही पश्चाताप जाहीर केला म्हणजे तुम्ही गुन्ह्यातून सुटलात. आणि हे तर आपली इच्छा नसूनही अनिवार्यपणे करावे लागते. तेव्हा त्याचे प्रतिक्रमण करावे लागणार. 'असेच करायला पाहिजे' असे जर म्हणाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल. असे करून खुष होणारी माणसे सुद्धा असतातच ना! हे तर तुम्ही हळुकर्मी (मंदकर्मी) आहात म्हणून तुम्हाला पश्चाताप होतो. नाहीतर माणसांना पश्चाताप सुद्धा होत नाही. जास्त पैसे असले तर देवाच्या किंवा सीमंधर स्वामींच्या मंदिरात देणे योग्य आहे. दुसरे एकही स्थान नाही आणि कमी पैसे असतील तर महात्म्यांना जेवू घातल्यासारखे दुसरे काहीच नाही! आणि त्याहीपेक्षा कमी पैसे असतील तर कुणी दुःखी माणसाला द्यावे आणि ते सुद्धा नकद पैसे नव्हे, तर खाण्या-पिण्याचे सामान पोहोचते करून! तर आता कमी ऐपतीत सुद्धा दान करायचे असेल तर झेपेल की नाही? (४) ममता रहीतता आपल्या पापात कुणीही भागीदारी करीत नाही. आपण जर मुलाला विचारले की, 'बाबा, मी चोरी करून हे पैसे कमावतो.' तर तो काय म्हणतो, तुम्हाला कमावायचे असतील तर कमवा, आम्हाला तसले पैसे नको.' तर बायको देखील म्हणते, 'जन्मभर उलट-सुलट केले, आता तरी सोडून द्या तो नाद! पण तरी हा मूर्ख सोडायला तयार होत नाही. जेव्हापासून द्यायला शिकला तेव्हापासून सद्बुद्धी उत्पन्न झाली, अनंत जन्मापासून द्यायचे शिकलाच नाही. खरकटे द्यायचे सुद्धा आवडत नाही, असा हा मनुष्य स्वभाव! ग्रहण करण्याचीच सवय आहे ना त्याला! जेव्हा जनावर होता तेव्हा सुद्धा ग्रहण करण्याचीच सवय, द्यायची सवयच नाही! तो जेव्हा द्यायचे शिकतो तेव्हा मोक्षाच्या वाटेवर वळतो. चेक मिळाला की समजतो की याला कॅश केला (वटवला) म्हणजे

Loading...

Page Navigation
1 ... 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100