Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 28
________________ पैशांचा व्यवहार बंगला आहे, दोन मोटारी आहेत, आणि बँक बॅलेन्सही चांगले आहे. तर माझ्याजवळ किती असावे ? १७ मी म्हटले, 'हे बघ, प्रत्येकाची आवश्यकता किती असावी याचा अंदाज, त्याच्या स्वत:च्या जन्माच्यावेळी काय स्थिती होती, त्यावरुन संपूर्ण जीवन जगण्यासाठीचे प्रमाण तू नक्की कर. हाच सर्व सामान्य नियम आहे. हे सर्व तर एक्सेस (अति) म्हणायचे. आणि एक्सेस तर विष असते, मरशील !' प्रत्येक व्यक्तिला आपल्या घरात आनंद वाटतो. झोपडीत राहणाऱ्याला बंगल्यात आनंद वाटत नाही आणि बंगल्यात राहणाऱ्याला झोपडीत आनंद वाटत नाही. याचे कारण आहे, त्याच्या बुद्धीचा आशय. जो जसे आपल्या बुद्धीच्या आशयात भरुन घेऊन आला असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होते. बुद्धीच्या आशयात जे भरलेले असते त्याचे दोन फोटो निघतात. एक पापफळ आणि दुसरे पुण्यफळ. बुद्धीच्या आशयाचे प्रत्येकाने विभाजन केले, तर १०० टक्क्यातून बहुतेक टक्के मोटार, बंगला, मुलं-मुली आणि बायको, या सर्वांसाठी भरले. ते सर्व मिळवण्यात पुण्य खर्च झाले आणि धर्मासाठी जेमतेम एक किंवा दोन टक्के बुद्धीच्या आशयात भरले. जर कोणी बुद्धीच्या आशयात लक्ष्मीची प्राप्ती करायची आहे असे भरुन आला, तर त्याचे पुण्य खर्च होऊन लक्ष्मीचा ढीग होईल. दुसरा कोणी बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त व्हावी असे घेऊन तर आला पण त्याला पुण्याचा खप होण्याऐवजी पापफळ समोर आले, म्हणून लक्ष्मीजींनी तोंडच फिरवून घेतले. खरेतर, हा इतका रोख-ठोक हिशोब आहे की कुणाचे काहीही चालू शकत नाही. तिथे हे दुर्भागी असे मानतात की मी दहा लाख रुपये मिळवले. अरे शहण्या, ही तर पुण्याई खर्च झाली आणि ती सुद्धा चुकीच्या मार्गाने. त्यापेक्षा तुझा बुद्धीचा आशय बदल. धर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. या जड वस्तू मोटार, बंगला, रेडियो, यांची भजना करून त्यांच्यासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा नाही. धर्मासाठी, आत्मधर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. तुम्हाला जे प्राप्त आहे ते असू द्या, परंतु या पुढे मात्र आशय बदलून संपूर्ण १०० टक्के धर्मासाठीच ठेवा. सद्या

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100