________________
पद
पैशांचा व्यवहार
पण तरी व्यवसायात मात्र कुशल होतो. कोणत्यातरी मुद्दावर कोणी चार महिन्यापासून गोंधळत असेल, तर त्या अडचणीचा तोड मी एका दिवसात काढून देत होतो. कारण कुणाचेही दुःख मला सहन होत नव्हते. अरे! कोणास नोकरी मिळत नसली, तर शेवटी चिठ्ठी लिहून देत होतो. असे-तसे काहीही करून उपाय शोधून काढायचो.
मी जेव्हा व्यवसाय करीत होतो तेव्हा आमच्या भागीदारासोबत मी एक नियम नक्की केला होता. की जर मी नोकरी करत असेन, तर त्यात मला जितका पगार मिळेल, तेवढेच पैसे तुम्ही माझ्या घरी पाठवायचे. त्याहून जास्त पैसे पाठवू नका. म्हणजे ते पैसे अगदी चोखच असणार. दुसरे उरलेले पैसे या धंद्यातच राहू द्यायचे, ऑफिसात. तेव्हा त्यांनी मला विचारले, की 'मग त्या पैशांचे काय करायचे?' तेव्हा माझे उत्तर असे की इन्कमटॅक्सवाल्याने सांगितले की 'दीढ लाख भरा' दादाच्या नावाचे, तर तेव्हा तुम्ही ते भरुन टाकायचे. म्हणजे मला पत्र लिहण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता : आम्ही कोणाला पैसे दिले असतील आणि तो जर पैसे परत करत नसेल, तर अशा वेळी ते पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही? की मग आपले देणे चुकते झाले असे समजून संतोष मानून बसून राहायचे?
दादाश्री : तसे नव्हे, तो परत करू शकेल, अशी जर त्याची स्थिती असेल तर प्रयत्न करावा आणि जर पैसे परत करण्याची त्याची ऐपत नसेल, तर प्रयत्न सोडून द्यावा.
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रयत्न करायचे की मग असे समजायचे की तो देणार असेल तर आपल्याला घर बसल्या देऊन जाईल आणि जर तो आला नाही, तर आपले देणे होते ते चुकते झाले, असे समजून गप्प बसायचे?
दादाश्री : नाही, नाही. इथपर्यंत मानून घ्यायची गरज नाही. आपण स्वाभाविकपणे प्रयत्न करावा. आपण त्याला सांगायचे की 'बाबा, मला सद्या पैशांची फार अडचण आहे, तेव्हा जर आपल्यालाकडे सोय होत असेल तर कृपया पाठवून द्या.' अशा प्रकारे विनयपूर्वक, विनम्रपणाने