Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 51
________________ ४० पैशांचा व्यवहार म्हणालो की या शाळेसाठी दान द्या, तर ती व्यक्ति आपल्याला मनापासून वेगळे ठेऊन व्यवहार करते. करते की नाही? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : तसेच यात (आत) सर्व वेगळे राहू शकते. यात वेगळे ठेवायचे मार्ग असतात सर्व. आत्माही वेगळा आहे आणि हे चंदुभाऊ पण वेगळे आहेत. व्यवसायात मी चित्त ठेवले नाही. व्यवसायात आयुष्यभर चित्त ठेवले नाही. व्यवसाय केला आहे हे खरे. मेहनत केली असेल, काम केले असेल, पण त्यात चित्त गुंतवले नाही. प्रश्नकर्ता : धंद्यात चिंता होते, फार अडचणी येतात. दादाश्री : चिंता झाली की समजून जायचे काम जास्त बिघडणार. चिंता झाली नाही तर समजायचे की काम बिघडणार नाही. चिंता कार्याची अवरोधक आहे. चिंतेमुळे तर धंद्याचे मरण ओढावेल. ज्यात चढ-उतार असतो त्याचेच नाव धंदा. पुरण-गलन आहे ते. पुरण झाले की गलन झाल्याशिवाय राहतच नाही. या पुरण-गलनमध्ये आपली काही मिळकत नाही, आणि जी आपली मिळकत आहे, त्यातून काहीच पुरण-गलन होत नाही. असा चोख व्यवहार आहे ! तुमच्या घरात तुमची बायको-मुले सर्व भागीदार आहेत ना? प्रश्नकर्ता : सुख-दुःखाच्या भोगात तर आहेत. दादाश्री : तुम्ही तुमच्या बायको-मुलांचे पालक समजले जाता. तर एकट्या पालकानेच का चिंता करावी? आणि घरची माणसे तर उलट म्हणत असतात की तुम्ही आमची काळजी करू नका. प्रश्नकर्ता : चिंतेचे स्वरुप काय आहे? जन्म झाला तेव्हा तर चिंता नव्हती, मग आली कुठून? दादाश्री : जसजशी बुद्धी वाढते तसतशी बेचैनी वाढते. जन्म झाला तेव्हा बुद्धी होती? व्यापार-धंद्यासाठी विचार करण्याची आवश्यकता असते

Loading...

Page Navigation
1 ... 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100