Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 78
________________ पैशांचा व्यवहार ___६७ व्यावहारिक कायदा कसा आहे ! शेयर बाजारात झालेले नुकसान शेयर बाजारानेच परत फेडायचे. किराणा मालाचे दुकान उघडून नव्हे! खूप सारे डास असले तरी रात्रभर झोपू देत नाहीत आणि दोन असले तरी रात्रभर झोपू देणार नाहीत. तर आपण असे म्हणायचे की 'हे! डासमय दुनिया! दोघे झोपू देत नाहीत तर सगळेच या की!' हे नफानुकसान म्हणजे डासच म्हणायचे. डास तर येत राहतील. आपण त्यांना उडवत रहायचे आणि झोपायचे. आतमध्ये अनंत शक्ति आहे. ते शक्तिवाले काय म्हणतात, की 'हे चंदुभाऊ! तुमचा काय विचार आहे ?' तेव्हा आतून बुद्धी म्हणते की, 'या धंद्यात इतका तोटा झाला आहे. आता काय करणार? आता नोकरी करून नुकसान भरपाई करा.' तेव्हा आतून अनंत शक्तिवाले काय म्हणतात, 'आम्हाला विचारा ना, बुद्धीचा सल्ला का घेता? आम्हाला विचारा, आमच्याजवळ अनंत शक्ति आहे. जी शक्ति नुकसान घडवून आणते त्याच शक्तिजवळ फायदा शोधा! तोटा घडून येतो तो एका शक्तिमुळे आणि फायदा शोधत आहात दुसरीकडे! तेव्हा ताळमेळ कसा बसेल? आत तर अनंत शक्ति आहे. तुमचा 'भाव' जर बदलला नाही, तर या जगात अशी कोणतीही शक्ति नाही की जी तुमच्या इच्छेनुसार करणार नाही. अशी अनंत शक्ति आपल्या सर्वात आहे. पण कुणाला दुःख होणार नाही, कुणाची हिंसा होणार नाही, असे आपले लॉ (कायदे) असले पाहिजेत. आपल्या भावनांचा कायदा इतका कडक असला पाहिजे की, देह संपला तरी, आपली 'भावना' तुटणार नाही. देह पडला तर, एक वेळ पडू दे. त्यात घाबरायचे कारण नाही. असे घाबरल्याने तर या लोकांचे हाल होतील. मग कुणी सौदा करणारच नाही ना! आम्ही तर असे मोठे दलाल पाहिले आहेत की जे चाळीस लाख रुपयांची वसुलीची गोष्ट करतात आणि परत असेही म्हणतात की दादाजी, बरीच माणसं उलटे बोलू लागली आहेत, (घाबरवत आहेत) तर आता कसे होईल? तेव्हा मी म्हटले, जरा धीर धरावा लागेल. पाया मजबूत असला पाहिजे. रस्त्यावर या गाड्या इतक्या वेगाने धावत असतात, तरीही सर्व सलामत राहतात, तर काय धंद्यातून सेफ (सलामत) नाही निघू शकणार? रस्तावर

Loading...

Page Navigation
1 ... 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100