________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. NNNNNTE DETERR
पान १८५.
तत आचम्य च प्राणायामं कुर्यात् ततः स्तुतिम् ॥ अनेरावाहनं कृत्वा पूजयेदष्टधाऽर्श्वनैः ॥ २७ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ - नंतर आचमन करून प्राणायाम करावा. मग अग्नीची स्तुति करून त्याचे आवाहन करावें आणि त्याचें अष्टधार्चन करावें. (१ जल, २ गंध, ३ अक्षता, ४ पुष्प, ५ चरु, ६ दीप, ७ धूप आणि ८ फल ह्या द्रव्यांनीं पूजन करणे ह्याला अष्टधार्चन ह्मणतात. )
गार्हपत्याग्निमादाय ज्वालंयेसूसरेऽनलम् ॥
उत्तरात्रं तु संगृह्य ज्वालयेद्दक्षिणेऽनलम् ॥ २८ ॥
अर्थ – ह्याप्रमाणें अग्नीचें पूजन झाल्यावर त्या कुंडांतील थोडासा अग्नि घेऊन उत्तरेकडच्या कुंडांत घालून प्रज्वलित करावा. मग त्या कुंडांतील अभि घेऊन दक्षिणेकडील कुंडांत ( वर्तुलाकृति कुंडांत ) घालून प्रज्वलित करावा.
मेखलासु तिथिदेवान् ग्रहानिन्द्राँस्ततः क्रमात् ॥ पूजयेदुपरिष्टातु भक्त्या युक्त्या समन्त्रतः ॥ २९ ॥
अर्थ - नंतर कुंडांच्या मेखलांच्या ठिकाणी तिथिदेवता, नवग्रह, इंद्र यांची पूजा क्रमानें भक्तियुक्त अंतःकरणानें युक्तीनें मंत्र पठण करीत करावी.
For Private And Personal Use Only