________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
veedeeeeeeeMMMMMMM
सोमसेनकृतं वर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६५१. इत्येवमयं धनुशिष्य पुत्रं । ज्येष्ठं त्यजेन्मोहकृतं विकारम् ॥ १८ ॥ दीक्षामुपादातुमतो जनोऽसौ । गृहं स्वकीयं स्वयमुत्सृजेच ॥
कामार्थचित्तं परिहाय धर्म-ध्यानेन तिष्ठेत्कतिचिद्दिनानि ॥ १९॥ अर्थ--गृहस्थाश्रमांत आपण कृतार्थ झालो आहोत अशी आपली प्रौढी ज्याला वास्तविक भासत असेल इत्या श्रावकानें गृहाच्या त्यागाचा पुढील विधि सिद्धपतिमेच्या अग्रभागी करावा. आपल्याला मान्य : असलेल्या गावांतील शिष्टमंडळींना बोलावून आणून त्यांच्या समक्ष आपल्या पुत्राला आपल्या घरांतील सर्व संपत्ति दाखवून घरांतच ठेवावी. आणि त्याला सांगावे की, बावारे! ही. आमची कुलपरं-१ परेची वहिवाट आमच्या मागे देखील तूं चालवावी. ह्या सर्व द्रव्याचे तीन विभाग केलेले आहेत. त्यांतील एका विभागाची योजना धर्मकृत्याकडे कर; एक विभाग संसाराकडे खर्च कर ह्मणजे त्या विभागांतून तुझ्या बंधुभगिनींचे पोषण व त्यांची उपनयन विवाह वगैरे कृत्ये कर. आणि एक विभाग हा तुझ्या बंधूशी सह तूं सारखा वाटून घे. तूं माझा ज्येष्ठपुत्र आहेस; ह्मणून तुझ्याशी एकोप्याने असलेल्या ह्या माझ्या संततीचे तूं रक्षण कर.. तुला शास्त्र, उपजीविकेचे साधन, धर्मक्रिया आणि मंत्र हे सर्व मी शिकविले असल्याने तूं विधि समजणारा व उद्योगी आहेस: प्रश्न आमचा हा कुलाचार असाच पुढे चालीव. गुरु आणि देव ह्यांची पूजा कर! ह्याप्रमाणे ज्येष्ठपुत्राला उपदेश करून श्रावकाने आपल्या अंतःकरणांतील मोह
For Private And Personal Use Only