Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१९९ ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थ न सेव्यते ॥१८।५।६२ [ महर्षि व्यास म्हणतात. ] मी बाहू उभारून मोठ्याने ओरडून सांगतो आहे पण कोणीच माझे ऐकत नाही. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात त्या धर्माचे आचरण तुम्ही कां करीत नाही ? २०० ऊर्ध्व प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥ ५॥३८१ कोणी वृद्ध पुरुष जवळ येऊ लागला की, तरुणाचे प्राण वर जाऊं लागतात. त्याला सामोरे जाऊन वंदन केल्याने ते पुनः तरुणाला प्राप्त होतात. २०१ ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।
पुनः पुनःप्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत् ॥१२॥१४०५८ ऋण, अग्नि व शत्रु यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुनः पुनः वाहू लागतो. यास्तव त्यांचा काही अवशेष ठेवू नये. २०२ ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम् ।
प्रभवो नाधिगन्तव्यः स्त्रीणां दुश्चरितस्य च ॥५॥३५/७२ ___ ऋषि, नद्या व थोर लोकांचे कुल, त्याचप्रमाणे स्त्रियांचे दुश्चरित्र यांचे मूळ शोधण्याच्या भरीस पडूं नये. २०३ एक एव चरेद्धर्म नास्ति धर्मे सहायता ।
केवलं विधिमासाद्य सहायः किं करिष्यति।।१२।१९३३३२ केवळ धर्मविधीचा आश्रय करून स्वतः एकट्यानेच धर्माचे आचरण करावें. धर्माचरणांत दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षाच नाही.. मग साहाय्यकर्त्यांचा उपयोग काय ?
For Private And Personal Use Only