Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
८१ आपदः क्षणमायान्ति क्षणमायान्ति संपदः।
क्षणं जन्म क्षणं मृत्युमुने किमिव न क्षणम् ॥ १।२८।३१ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) क्षणांत आपत्ति, क्षणांत संपत्ति; क्षणांत जन्म, क्षणांत मृत्यु अशा त-हेने हे मुने, जगांतील सर्व गोष्टी क्षणिक आहेत. ८२ आपदो या दुरुत्तारा याश्च तुच्छाः कुयोनयः।
तास्ता मौख्यात्प्रसूयन्ते खदिरादिव कण्टकाः॥२।१३।१६ खैराच्या झाडापासून कांटे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे सर्व त-हेच्या अधम योनि आणि दुस्तर आपत्ति मूर्खपणापासून उत्पन्न होतात. ८३ आपातमात्ररम्येभ्यो भोगेभ्यः किमवाप्यते ।
सत्सङ्गचिन्तामणितः सर्वसारमवाप्यते ॥ ६॥२०१३९ विचार करी पर्यंतच रम्य वाटणान्या भोगांपासून काय मिळणार? कांहीं नाही. पण सत्संगरूप चिंतामणीपासून सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेले पद प्राप्त होते. ८४ आयुः पल्लवकोणाग्रलम्बाम्बुकणभङ्गुरम् ।
उन्मत्तमिव संत्यज्य यात्यकाण्डे शरीरकम् ॥ ११४।१ झाडावरील पानाच्या टोकावर लोंबणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे जीवित क्षणभंगुर आहे. उन्मत्त मनुष्याप्रमाणे जीवित शरीराचा त्याग करून केव्हांच निघून जात. ८५ आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।
नीयते तद्वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥ ७।१७५।७८ आयुष्याचा एक क्षण सुद्धा रत्नांच्या राशी दिल्यानेही मिळणार नाही, हे जर निश्चित आहे, तर आयुष्य व्यर्थ घालविणे हा मोठा बेसावधपणा नव्हे काय ?
यो. वा. २
For Private And Personal Use Only