Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
ramin
४९९ स्फटिका प्रतिबिम्बेन यथा याति न रञ्जनम् ।
तज्ज्ञः कर्मफलेनान्तस्तथा नायाति रञ्जनम् ॥६।१२२।६ स्फटिकमणि प्रतिबिंबाच्या योगाने जसा रंगीत होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अंतःकरणांत कर्मफलाच्या योगाने काहीएक विकार पावत नाही. ५०० स्वधर्मेण च हिंसैव महाकरुणया समा ॥ ३८२।४६
स्वधर्माप्रमाणे केलेली हिंसा ही मोठ्या दयेसारखीच आहे. ५०१ स्वया वासनया लोको यद्यत्कर्म करोति यः ।
स तथैव तदामोति नेतरस्येह कर्तृता ॥ ४।१३।११ जगामध्ये आपल्या वासनेप्रमाणे लोक जें जें कर्म करितात, त्या त्या कर्माचेच फळ ते भोगतात, त्यांत इतरांच्या कर्तृत्वाचा मुळीच संबंध नाही. ५०२ स्ववासनानुसारेण सर्व आस्पदमीहते ॥ ३७३।२९
प्रत्येक प्राणी आपापल्या वासनेप्रमाणेच स्थानाची इच्छा करितो. ५०३ हरिवक्षोगता लक्ष्मीरपि शोभार्थमेव यत् ।
बिभर्ति कमलं हस्ते कान्याशंसाधिका भवेत् ७।११७।२१ कमल हे इतकें सुंदर आहे की, प्रत्यक्ष विष्णूच्या वक्षःस्थळाच्या ठिकाणी बसणारी, सर्व सौंदर्याची अधिदेवता जी लक्ष्मी तिने शोभा येण्यासाठी आपल्या हातांत कमल धारण केले आहे. दुसरा कोणी यापेक्षा कमलाची अधिक प्रशंसा काय करणार आहे ? ५०४ हस्तं हस्तेन संपीड्य दन्तैर्दन्तान्विचूर्ण्य च ।
अङ्गान्यङ्गरिवाक्रम्य जयेच्चेन्द्रियशात्रवान् ॥४।२३।५८ हातावर हात चोळून, दांतांनी दांत चावून, गात्रांनी गात्रे आवळून धरून, अर्थात् वाटतील ते दृढ प्रयत्न करून इंद्रियरूपी शजूंना जिंकून टाकावें.
For Private And Personal Use Only