Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३३
.८२७ राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम् ।
राजन्यसति लोकस्य कुतो भार्या कुतो धनम्॥१२॥५७१४१ मनुष्यांनी प्रथमतः राजा प्राप्त करून घ्यावा. तदनंतर स्त्री व त्यानंतर धन. कारण राजाच जर नसेल तर लोकांना स्त्री तरी कोटून मिळणार ? आणि धन तरी कोठून मिळणार ? .८२८ राजा लोकस्य रक्षिता ॥ १२।९०१३
राजा हाच लोकांचा पालनकर्ता होय. ८२९ राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशकः ।
धर्मात्मा यःस कर्ता स्यादधर्मात्मा विनाशकः॥१२।९१९ प्राण्यांचे कल्याण करणारा राजाच आणि त्यांचा नाश करणारहि पण राजाच. कारण, तो धर्माने वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्माने वागेल तर नाश करणारा ठरतो. ८३० राजैव युगमुच्यते ॥ १२।९११६
राजालाच युग म्हणतात. [म्हणजे जसा राजा असेल तसें बरे वाईट युग उत्पन्न होतें] ८३१ राज्ञः प्रमाददोषेण दस्युभिः परिमुष्यताम् ।
अशरण्यः प्रजानां यःस राजा कलिरुच्यते ॥ १२।१२।२९ राजाच्या हलगर्जीपणामुळे चोरांकडून लुबाडल्या जाणाऱ्या प्रजेला जो राजा अभय देऊ शकत नाही तो (मूर्तिमंत ) कलिच होय.. ८३२ राज्ञां हि चित्तानि परिप्लुतानि
सान्त्वं दत्त्वा मुसलैर्घातयन्ति ॥२॥६४।१२. राजांचें चित्त नेहमी कलुषित असल्यामुळे ते प्रथमतः गोड बोलतात आणि मागाहून डोक्यांत मुसळ घालून प्राण घेतात. ८३३ राज्ञा हि पूजितो धर्मस्ततः सर्वत्र पूज्यते ॥ १२।७५।४ राजाने अगोदर धर्माचा मान ठेवला म्हणजे सर्व लोक धर्माचा मान ठेवतात.
For Private And Personal Use Only