Book Title: Non Violence Ahimsa (Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 8
________________ संपादकीय हिंसेच्या समुद्रात हिंसाच असते, परंतु हिंसेच्या समुद्रात अहिंसा प्राप्त करायची असेल तर परम पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेली अहिंसेची वाणी वाचून, मनन करून, फोलो करण्यात आली तरच अहिंसा होऊ शकेल असे आहे. बाकी, खोलवरची स्थूल अहिंसा पाळणारे तर पुष्कळ आहेत. पण सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम अहिंसा समजणे हेच कठीण आहे. मग तिच्या प्राप्तीचा प्रश्नच कुठे राहिला? स्थूल जीवांची हिंसा तसेच सूक्ष्मातीसूक्ष्म जीवांची हिंसा, जसे की, वायुकाय-तेउकाय इत्यादीपासून ते थेट भावहिंसा, भावमरणापर्यंतची खरी यथार्थ समज जर नसेल तर ती परिणामकारक होत नाही आणि फक्त शब्दातच किंवा क्रियेतच अहिंसा अडकून राहते. हिंसेच्या यथार्थ स्वरूपाचे दर्शन तर जे हिंसेला संपूर्णपणे ओलांडून अहिंसक पदावर बसलेले आहेत तेच करू शकतात आणि दुसऱ्यांनाही करवू शकतात! 'स्वतः' 'आत्मस्वरूपात' स्थित होतात, तेव्हा ते एकच असे स्थान आहे की जिथे संपूर्ण अहिंसा वर्तत असते! आणि तिथे तर तीर्थंकर आणि ज्ञानींचीच वर्तना!!! हिंसेच्या सागरात संपूर्ण अहिंसकपणे वर्ततात अशा ज्ञानी पुरुषांकडून प्रकाशमान झालेले हिंसा संबंधीचे, स्थूल हिंसा-अहिंसेपासून ते थेट सूक्ष्मतम हिंसा-अहिंसेपर्यंतचे अचूक दर्शन येथे संकलित करून ते या अंतरआशयाने प्रकाशित करण्यात आले आहे, की जेणेकरून घोर हिंसेत सापडलेल्या या काळातील मनुष्याची दृष्टी थोडीफार तरी बदलेल आणि या भव-परभवाचे श्रेय त्यांच्यामार्फत साधले जाईल. बाकी, द्रव्य हिंसेपासून कोण वाचू शकेल? स्वतः तीर्थंकरांनी सुद्धा निर्वाण होण्यापूर्वी जो शेवटचा श्वास सोडला तेव्हा कितीतरी वायुकाय जीव मेले होते! त्यांना जर अशा हिंसेचा दोष लागला असता तर त्यांना त्या पापासाठी पुन्हा कोणाच्या तरी घरी जन्म घ्यावाच लागला

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 ... 128