________________
अहिंसा
५५
मी विमानाने येत होतो. माझ्या सीटवर मी एकटाच होतो, माझ्याजवळ दुसरे कोणीही नव्हते. एक मोठा मुसलमान शेठ होता, तो त्याच्या सीटवरून उठून माझ्या शेजारी बसला, मी काही बोललो नाही. नंतर तो हळूच मला म्हणाला की, 'मी मुसलमान आहे आणि आम्ही नॉनव्हेज खातो. तर तुम्हाला याबद्दल काही दुःख होत नाही?' मी म्हणालो, 'नाही, नाही. मी तुमच्या सोबत जेवायला बसू शकतो. फक्त इतकेच की मी ते घेत नाही. तुम्ही जे करत आहात ते तुमच्यानुसार योग्यच करत आहात. त्यात आमचे काहीच घेणेदेणे नाही.' तेव्हा शेठ म्हणाले,' तरीही आमच्याविषयी तुम्हाला अभाव होत असेल ना?' मी म्हणालो 'नाही, नाही. तुमची ही मान्यता सोडून द्या. कारण तुम्हाला ते जन्मजात मिळालेले आहे. तुमच्या आईने नॉनव्हेजिटेरियन खाल्ले आहे आणि तुमचे रक्तच नॉनव्हेजिटेरियनवाले आहे. मग आता हरकत कोणासाठी आहे? तर ज्याच्या रक्तात नॉनव्हेज नसेल, ज्यांच्या आईच्या दुधात नॉनव्हेज नसेल, त्याला मात्र खाण्याची सूट नाही. आणि तुम्ही खाता ते फायदेकारक-नुकसानकारक याचा विचार केल्याशिवाय खाता. फायदा-नुकसान समजून घेत नाहीत.'
म्हणून मांसाहार जे खात असतील, त्यांच्यावर चिडण्यासारखे नाही. ही तर फक्त आपली कल्पनाच आहे. बाकी, ज्या लोकांचा स्वत:चा असा आहार आहे, त्यास आमची हरकत नाही.
स्वतः कापून खाल?
प्रश्नकर्ता : पण आज तर सोसायटीत राहायला गेले म्हणून मांसाहार करत असतात.
दादाश्री : हा तर शौक म्हटला जातो. आपल्या आईच्या दुधात आलेले असेल तर तुम्हाला नेहमीसाठी खाण्यास हरकत नाही.
प्रश्नकर्ता : आई मांसाहार करत नसेल तर काय करावे?