Book Title: Non Violence Ahimsa (Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 12
________________ अहिंसा प्रयाण, 'अहिंसा परमोधर्म' प्रती प्रश्नकर्ता : 'अहिंसेच्या मार्गावर धार्मिक, आध्यात्मिक प्रगती' याविषयी कृपया समजवा. दादाश्री : अहिंसा हाच धर्म आहे आणि अहिंसा हीच अध्यात्माची उन्नती आहे. परंतु अहिंसा म्हणजे मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये याकडे लक्ष असले पाहिजे, आपल्या श्रद्धेत असले पाहिजे, तेव्हा ते शक्य होते. प्रश्नकर्ता : 'अहिंसा परमोधर्म' हा मंत्र जीवनात कशा प्रकारे उपयोगी पडतो? दादाश्री : ते तर सकाळी घराबाहेर निघताना 'प्राप्त मन-वचनकायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो' अशी भावना पाच वेळा केल्यानंतरच घराबाहेर निघावे. मग जर कोणाला दुःख झाले असेल, तर ते लक्षात ठेवून त्याचा पश्चाताप करावा. प्रश्नकर्ता : कोणलाही दुःख होणार नाही असे जीवन आपण या काळात कसे जगू शकतो? दादाश्री : तुम्हाला तशी भावनाच करायची आहे आणि त्यासाठी दक्षता घ्यावी. आणि तरी देखील दुःख झालेच तर त्याचा पश्चाताप करावा.

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 ... 128