________________
अहिंसा
ढेकूण मारणारे, तुम्ही ढेकूण मेकर आहात का?
प्रश्नकर्ता : पण घरात ढेकूण-मच्छर-झुरळ त्रास देत असतील तर आपण त्यावर काही उपाय केले पाहिजे का?
दादाश्री : घरात ढेकूण-मच्छर-झुरळ होऊ नये म्हणून आपण साफसफाई करून घर स्वच्छ ठेवले पाहिजे. आणि जी झुरळे झाली असतील त्यांना पकडून बाहेर कुठेतरी, खूप दूर, गावाच्या बाहेर दूर जाऊन टाकून यावे. परंतु त्यांना मारायला तर नकोच.
एक खूप मोठा कलेक्टर सारखा माणूस होता. त्याने मला त्याच्या घरी बोलावले होते. मला म्हणाला, 'ढेकूण तर मारूनच टाकले पाहिजेत.' मी म्हणालो, 'असे कुठे लिहिले आहे ?' तेव्हा तो म्हणाला, 'पण ते आपल्याला चावतात ना, आणि आपले रक्त पितात.' त्यावर मी म्हणालो, 'तुम्हाला मारण्याचा अधिकार किती आहे हे मी तुम्हाला नियमानुसार समजावतो. मग तुम्ही मारा किंवा नका मारू, त्याबद्दल मी काही सांगत नाही. या जगातील कुठल्याही मनुष्याने स्वतः एक जरी ढेकूण बनवून दिला तर मग मारा. जे तुम्ही 'क्रिएट' (निर्माण) करू शकता त्याचा तुम्ही नाश करू शकता. तुम्ही क्रियेट करत नाहीत, त्याचा तुम्ही नाश करु शकत नाही.
__ म्हणजे जो जीव तुम्ही बनवू शकता, त्याला मारण्याचा अधिकार आहे. जे तुम्ही बनवू शकत नसाल, 'क्रिएट' करू शकत नसाल तर त्याला मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ही खुर्ची तुम्ही बनवू शकता म्हणून तिला तोडू शकता, कप-बशी बनवू शकता म्हणून तिला तोडू शकता पण जे तुम्ही बनवू शकत नाही, त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
प्रश्नकर्ता : मग ते चावायला का येतात?
दादाश्री : त्यांचाशी तुमचा हिशोब आहे म्हणून येतात. हा देह काही तुमचा नाही, तुमच्या मालकीचा नाही. हा सगळा माल तुम्ही