________________
अहिंसा
३७
लोकांना तर प्रत्येक वस्तू हवी आहे. म्हणून सांगतात की, 'भगवंताला फुले वाहा.' आपल्या तीर्थंकर भगवंतांच्या मुर्तीवर फुले वाहतात की नाही? हे तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नाही का? मूर्तिपूजा करण्यास गेलेच नाही ना?! तिथे मूर्तीवर फुले वाहतात.
देवाने साधूंना सांगितले होते की तुम्ही भावपूजा करा आणि जैन लोक द्रव्यपूजा सुद्धा करतात. द्रव्यपूजा केल्याने त्यांच्या अडचणी दूर होतात. म्हणून आम्ही काय सांगतो की, ज्यांना अडचण असेल त्यांनी ज्ञानी पुरुषांना फुले वाहावी आणि अडचण नसेल त्यांना काही गरज नाही. सगळ्यांचेच काही सारखे असते का? कित्येकांना बऱ्याच अडचणी असतात! त्या सर्व दूर होतात. आणि 'ज्ञानी पुरुषांना' तर यात काही अडतही नाही आणि नडतही नाही.
तरी कित्येक लोक मला म्हणतात की, 'पुष्प पांखडी जिथे दुखावते जिनवरांची तिथे आज्ञा नाही. देवाची आज्ञा नाही ना?' मी म्हणालो की, 'ही तर कालेजच्या तिसऱ्या वर्षाची गोष्ट आहे, तिला आता शाळेच्या दुसरीच्या वर्गात कशासाठी आणता? कॅालेजच्या तिसऱ्या वर्षी या गोष्टींकडे लक्ष द्यावे. मग तुम्ही हे सर्व शाळेच्या दुसरीच्या वर्गात कशाला आणता?' तेव्हा तो म्हणाला, 'ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.' मी म्हणालो की, 'मग विचार करा. हे दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात आणण्याची गरज नाही. तुम्ही शेवटच्या वर्षात याल तेव्हा करा ना!' तेव्हा म्हणाला 'याची लिमिट किती असते?' मी म्हणालो की 'शेवटच्या जन्मात महावीर भगवंतांनी लग्न केले होते हे तुम्हाला माहीत नाही का?' तेव्हा म्हणतो की,' हो, लग्न केले होते.' मी विचारले, 'किती वर्षांपर्यंत संसारात राहिले? तेव्हा म्हणे, 'तीस वर्षांपर्यंत.' मी विचारले की, 'संसारात राहिले याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे?' तेव्हा म्हणाला की, 'त्यांना मुलगी होती ना! मी म्हणालो, संसारात राहिले म्हणून ते स्त्रीचे अपरिग्रही तर नव्हतेच ना? ते परिग्रही होते. परीग्रही असतील तरच मुलगी असेल ना? नाही तर पुरावा कसा असेल? म्हणजे