________________
अहिंसा प्रयाण, 'अहिंसा परमोधर्म' प्रती प्रश्नकर्ता : 'अहिंसेच्या मार्गावर धार्मिक, आध्यात्मिक प्रगती' याविषयी कृपया समजवा.
दादाश्री : अहिंसा हाच धर्म आहे आणि अहिंसा हीच अध्यात्माची उन्नती आहे. परंतु अहिंसा म्हणजे मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये याकडे लक्ष असले पाहिजे, आपल्या श्रद्धेत असले पाहिजे, तेव्हा ते शक्य होते.
प्रश्नकर्ता : 'अहिंसा परमोधर्म' हा मंत्र जीवनात कशा प्रकारे उपयोगी पडतो?
दादाश्री : ते तर सकाळी घराबाहेर निघताना 'प्राप्त मन-वचनकायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो' अशी भावना पाच वेळा केल्यानंतरच घराबाहेर निघावे. मग जर कोणाला दुःख झाले असेल, तर ते लक्षात ठेवून त्याचा पश्चाताप करावा.
प्रश्नकर्ता : कोणलाही दुःख होणार नाही असे जीवन आपण या काळात कसे जगू शकतो?
दादाश्री : तुम्हाला तशी भावनाच करायची आहे आणि त्यासाठी दक्षता घ्यावी. आणि तरी देखील दुःख झालेच तर त्याचा पश्चाताप करावा.