Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 14
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir 20 सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि १५ अति धर्माद्धलं मन्ये बलाद्धर्मः प्रवर्तते । बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जङ्गमम् १२।१३४।६ बल हे धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण, बलापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधाराने राहतात, त्याप्रमाणे बलाच्या आधारानेच धर्म राहतो. १६ अतियोगमयोगं च श्रेयसोऽर्थी परित्यजेत् ॥१२॥२८७।२४ कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने [ आहारविहारादिकांचें ] अतिशय सेवन करणे व मुळीच सेवन न करणे या दोहोंचाहि सर्वथा त्याग करावा. १७ अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः।। शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा ।।१३।१०८।१० द्रव्य नष्ट झाले असतां जे शोक करीत नाहीत, व प्राप्त झाले असता त्याच्या ठिकाणी जे आसक्त होत नाहीत, आणि ज्यांच्या अंतःकरणांत लोभ उत्पन्नच होत नाही ते अत्यंत शुचिभूर्तच होत. १८ अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विद्यते । यत्र दुर्जनमित्याह दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥ १।७४।९५ स्वतः दुर्जन असलेल्याने उलट सन्जनालाच दुर्जन म्हणावें, यापेक्षा जगांत अधिक हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल ! १९ अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते । श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसपेति ॥ ३।८११ ( व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात ) हे राजा, प्राणी जन्मतःच जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाही असें ऐकण्यांत येते. २० अथवा वसतो राजन्वने वन्येन जीवतः । द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते ॥ १२।१३।१० (सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमूळांवर उपजीविका करीत असतांनाहि ऐहिक वस्तूंविषयी ज्याला ममत्वबुद्धि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबड्यांत पडला आहे असे समजावें. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 ... 463