Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 13
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ९ अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण साधयेत् । प्रकृतिभ्यः परं यत्तु तदचिन्त्यस्य लक्षणम् ॥ ६।५।१२ मनाला अचिंत्य असलेल्या अशा ज्या गोष्टी त्यांचा निर्णय केवळ युक्तिवादाने होणे शक्य नाही. प्रकृतीच्या--म्हणजे पंचमहाभुते, मन, बुद्धि व अहंकार या मूलतत्त्वांच्या पलीकडे असलेल्या वस्तूला (आत्मतत्त्वाला ) अचिंत्य असे म्हणतात. १० अज्ञश्वाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥६२८४० __ अज्ञ असून श्रद्धा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख. ११ अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः। ज्ञानाञ्जनशलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम् ॥ १।११८४ अज्ञानांधकाराने डोळ्यांवर झापड येऊन धडपडणाऱ्या लोकांच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारें [ असें हैं महाभारत आहे. ] १२ अज्ञानेनावृतो लोकः ।। ३।३१३१८२ लोक अज्ञानांत गुरफटलेले आहेत. १३ अञ्जलिः शपथः सान्त्वं शिरसा पादवन्दनम् । आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता ॥ १११४०६७ हात जोडणे, शपथ घेणे, मधुर भाषण करणे, पायांवर डोके ठेवणे, लालूच दाखविणे या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषाने केल्या पाहिजेत. १४ अतिक्रान्तं हि यत्कार्य पश्चाच्चिन्तयते नरः। । तचास्य न भवेत्कार्य चिन्तया च विनश्यति ॥८।३१२९ गोष्ट होऊन गेल्यानंतर तिच्याविषयों जो मागाहून चिंता करीत बसतो त्याचे तें कार्य तर होत नाहीच, पण चिंतेने नाश मात्र होतो. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 ... 463