Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
॥ ७/१५८११९
दाखविणे हेच सत्पुरुषाचे
४९ अनय
४७ अनुकम्प्यो नरः पन्या पुष्टो रक्षित एव च ।
प्रपतेद्यशसोदीप्तात्स च लोकान्न चाप्नुयात्॥१४॥९०४७ बायकोच्या जिवावर पोसलेल्या व जगलेल्या पुरुषाची कीवच केली पाहिजे ! असा पुरुष उज्ज्वल कीर्तीपासून च्युत होतो, व स्वर्गलोकहि गमावून बसतो.
४८ अनुक्त्वा विक्रमेयस्तु तद्वै सत्पुरुषव्रतम् ॥ ७१५८।१९ न बोलतां पराक्रम करून दाखविणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय. ४९ अनुग्रहं च मित्राणाममित्राणां च निग्रहम् । ___ संग्रहं च त्रिवर्गस्य श्रेय आहुर्मनीषिणः ॥ १२॥२८७१६ मित्रांवर उपकार करणे, शत्रूचा पाडाव करणे आणि ( धर्म, अर्थ व काम या) तीनहि पुरुषार्थांची प्राप्ति करून घेणे हे श्रेयस्कर आहे असे ज्ञाते लोक सांगतात.
५० अनृतं जीवितस्यार्थे वदन्न स्पृश्यतेऽनृतैः ॥ ७/१९०४७ जीव वाचविण्याकरितां असत्य भाषण करणाराला असत्य भाषण केल्याचा दोष लागत नाही. ५१ अन्त्येषु रेमिरे धीरा न ते मध्येषु रेमिरे ।
अन्त्यप्राप्तिं सुखामाहुदुःखमन्तरमन्त्ययोः॥१२॥१७४।३४ ज्ञाते लोक कोणती तरी एक तड पतकरतात, मधल्या स्थितीत आनंद मानीत नाहीत. कारण कोणती तरी शेवटची स्थिति ही सुखकारक आहे, आणि मधली स्थिति ही दुःखदायक आहे. ५२ अन्नपानानि जीयन्ते यत्र भक्षाश्च भक्षिताः।
तस्मिन्नेवोदरे गर्भः किं नान्नामिव जीयते ॥१२॥३३१।२४ अन्नपान व भक्षण केलेले इतर पदार्थ ज्या उदरांत जिरतात त्याच उदरांत असलेला गर्भ अन्नादिकांप्रमाणे कसा जिरून जात नाही ? ५३ अन्यत्र राजन्हिसाया वृत्तिर्नेहास्ति कस्यचित् ।।
अप्यरण्यसमुत्थस्य एकस्य चरतो मुनेः।। १२।१३०१२८ (भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे राजा, दुसऱ्याला मुळीच पीडा न देता जगांत कोणाचीही जीवितयात्रा चालू शकत नाही. मग तो अरण्यांत जन्मलेला व एकटाच राहणारा एकादा मुनि का असेना ?
For Private And Personal Use Only