________________
११४
अहिंसा
असू शकते का? म्हणून मग भीती शिरते आणि भीती शिरली की मग कार्य होत नाही. भीती निघाली तरच कार्य होईल ना!
ते आत्मस्वरूप तर इतके सूक्ष्म आहे की अग्नीच्या आरपार निघून गेले तरीही काही होणार नाही. बोला आता, तिथे मग हिंसा कशी स्पर्शेल? हे तर स्वतःचे स्वरूप स्थूल आहे, असा ज्याचा देहाध्यास असलेला स्वभाव आहे म्हणून त्याला हिंसा स्पर्शेल. म्हणजे जर असे होत असेल की, आत्मस्वरुपाला हिंसा स्पर्शत असेल मग तर कोणी मोक्षालाच जाणारच नाही. पण मोक्षाची तर खूप सुंदर व्यवस्था आहे. हे तर आता तुम्ही ज्या जागेवर बसला आहात तिथून या सर्व गोष्टी समजणार नाहीत, स्वतः आत्मस्वरूप झाल्यानंतर सर्व समजते, विज्ञान उघड होते!
जय सच्चिदानंद