Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 41
________________ तरी आपण त्यास हळूवार समजवावे. आपल्या शेजाऱ्यांनाही असे कटू वचन बोलतो का आपण? प्रश्नकर्ता : पण इतका धीर असला पाहिजे ना? दादाश्री : आता डोंगरावरून जर एखादा दगड घरंगळत आला आणि तो तुमच्या डोक्याला लागला तेव्हा तुम्ही वर पाहता आणि मग कोणावर रागावता? त्यावेळी शांत राहता ना? तिथे कोणी दिसत नाही म्हणून आपण समजतो की हा दगड कोणी टाकलेला नाही, म्हणजे आपोआपच पडला आहे. तेव्हा कोणाचाही दोष मानत नाही. तसेच इथेही आपोआपच पडत असते. फक्त इथे टाकणारा दिसतो, बाकी आपोआपच पडत असते. हा तुमचाच हिशोब चुकता होत आहे. या जगात सर्व हिशोबच चुकते होत आहेत. नवीन हिशोब बांधले जात आहेत आणि जुने हिशोब चुकते होत आहेत. समजले ना? म्हणून मुलांबरोबर सरळ बोला, चांगली भाषा बोला. प्रेमाने वाढवावे रोपट्याला प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे करत असेल तेव्हा त्याला टोकावे लागते, त्यामुळे त्याला दुःखं होते, तर मग तिथे काय करावे? दादाश्री : टोकण्यास हरकत नाही, पण आपल्याला टोकता आले पाहिजे ना! सांगता आले पाहिजे ना! प्रश्नकर्ता : ते कसे सांगावे? दादाश्री : तुम्ही मुलाला म्हणाल 'तुला अक्कलच नाही, गाढव आहेस,' असे म्हटल्यावर काय होईल! त्याला सुद्धा अहंकार आहे की नाही? तुम्हालाच जर तुमचा बॉस म्हणेल की 'तुम्हाला अक्कल नाही, गाढव आहात,' असे म्हणेल तर काय होईल? असे बोलू नये, टोकता आले पाहिजे. प्रश्नकर्ता : मग कशाप्रकारे टोकावे? दादाश्री : त्याला जवळ बसवावे, मग म्हणावे आपण हिंदुस्तानातील

Loading...

Page Navigation
1 ... 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76