________________
५द
माझ्याबरोबर, तर ती काही येणार नाही. ती म्हणेल हे तर नाटकापुरतेच होते. कळतंय का तुम्हाला?
प्रश्नकर्ता : हो कळतंय.
दादाश्री : म्हणजे मुलाला म्हणावे 'ये बेटा, बैस इथे.' तुझ्याशिवाय माझे आहे तरी कोण? आम्ही तर हिराबांना(दादाश्रींची पत्नी) म्हणत होतो की मला तुमच्याशिवाय करमत नाही. मी परदेशी जातो पण तुमच्याशिवाय मला करमत नाही.
प्रश्नकर्ता : हिराबांनाही ते खरेच वाटायचे. दादाश्री : हो, ते खरेच असते. पण त्यास आम्ही आत शिवू देत
नाही.
प्रश्नकर्ता : पूर्वीच्या काळी आई-वडिलांना मुलांवर प्रेम करण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी वेळच नसायचा आणि प्रेम देतही नव्हते. जास्त लक्ष देत नसत. हल्ली तर आई-वडील मुलांना फार प्रेम देतात, खूपच काळजी घेतात, सर्व काही करतात तरी सुद्धा मुलांना आई-वडिलांवर जास्त प्रेम का नसते?
दादाश्री : हे प्रेम तर, आजकाल बाहेरचा मोह इतका जागृत झाला आहे की त्यातच त्यांचे सगळे चित्त जाते. पूर्वी मोह फार कमी होता आणि आज तर मोहाचे पुष्कळ स्थान झाले आहेत.
प्रश्नकर्ता : हो, आणि आई-वडील सुद्धा प्रेमाचे भुकेले असतात की ही आमची मुले आहेत, त्यांनी विनय वगैर ठेवावा.
दादाश्री : प्रेमच, जग प्रेमाधीन आहे, मनुष्यास जितकी भौतिक सुखाची पर्वा नाही तितकी प्रेमाची पर्वा आहे. परंतु प्रेमात संघर्ष होतच राहतात. काय करणार? प्रेमात संघर्ष होता कामा नये.
प्रश्नकर्ता : मुलांना आई-वडिलांवर खूपच प्रेम आहे. दादाश्री : मुलांना सुद्धा खूप प्रेम आहे ! पण तरीही संघर्ष होतातच.