________________
प्रेम
तर अहंकार सुद्धा नसतो. सात्विक प्रेमात फक्त अहंकारच असतो. त्यात लोभ नसतो, कपट नसते, त्यात फक्त मानच असतो. अहम् - मी आहे, बस एवढेच! म्हणजे स्वतःला अस्तित्वाचे भान असते, आणि शुद्ध प्रेमात तर स्वतः (आत्म्यात) अभेद स्वरूप झालेला असतो.
६०
प्रश्नकर्ता : परंतु असे आहे का की कोणत्याही क्रियेमध्ये, मग ती सात्विक क्रिया असो, रजोगुणी क्रिया असो किंवा कुठल्याही प्रकारची क्रिया असो, त्या क्रियेत अहंकाराचे तत्व नसते. हे तार्किक रित्या खरे आहे का?
दादाश्री : ते शक्य नाही. अरे, असे करायला गेलो तर ती चूक आहे. कारण अहंकाराशिवाय क्रिया होतच नाही. सात्विक क्रिया सुद्धा होत नाही.
प्रश्नकर्ता : शुद्ध प्रेम ठेवायला तर हवे ना ? मग ते अहंकाराशिवाय धारण कसे काय होईल ? अहंकार आणि शुद्ध प्रेम दोन्ही एकत्र राहू शकत नाही ?
दादाश्री : अहंकार आहे तोपर्यंत शुद्ध प्रेम उत्पन्नच होत नाही ना! अहंकार आणि शुद्ध प्रेम दोन्ही एकत्र राहू शकत नाही. शुद्ध प्रेम केव्हा येते? अहंकार विलय होऊ लागतो तेव्हापासून शुद्ध प्रेम येऊ लागते आणि अहंकार संपूर्ण विलय झाला की मग शुद्ध प्रेमाची मूर्ती बनतो. शुद्ध प्रेमाची मूर्ती परमात्मा आहे. तिथे आपले सर्व प्रकारे कल्याण होते. ते निष्पक्षपाती असते. कोणताही पक्षपात नसतो. शास्त्रांच्या पलीकडे असते. चार वेद शिकून झाल्यावर वेद 'इट सेल्फ' बोलतात की धिस इज नॉट दॅट, धिस इज नॉट वॅट, तर 'ज्ञानी पुरुष' म्हणतात की धिस इज दॅट, बस! ज्ञानी पुरुष तर शुद्ध प्रेमवाले, म्हणून, ताबडतोब आत्मा देतात.
त्यांच्यात फक्त दोन गुण आहेत. शुद्ध प्रेम आहे आणि शुद्ध न्याय आहे. त्यांच्यात हे दोन गुण आहेत. आणि या जगात जेव्हा शुद्ध न्याय असेल, तेव्हा समजायचे की ही भगवंताची कृपा अवतरली. शुद्ध न्याय ! नाही तर हे दुसरे न्याय तर सापेक्ष न्याय आहेत.