Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ पाप-पुण्य कमी आहेत. आहेत मात्र नक्की परंतु त्यांनाही दुषमकाळ नडत आहे. कारण की हे पाप नडत आहे. पाप अर्थात काय तर संसार व्यवहार चालविण्यामध्ये अडचणी येतात त्याला पाप म्हटले जाते. म्हणजे बँकेत पैसे वाढविण्याची गोष्ट तर दूरच राहिली पण इथे रोजचा व्यवहार चालविण्यासाठी सुद्धा कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहतात. ह्या अडचणी येतात तरीही मंदिरात जातो, विचारही धर्माचे येतात, यालाच पुण्यानुबंधी पाप म्हणतात. पुण्य बांधले पण हा दुषमकाळ असा आहे ना की या पापामुळे जरा अडचणी येतात, त्यामुळे खरोखर जसे हवे तसे पुण्य बांधता येत नाही. हल्ली तर संसर्ग लागतोच ना! मंदिराबाहेर चपला काढल्या असतील ना तर दुसऱ्याला विचारतो की, का भाऊ चपला इथे का काढल्या? तेव्हा तो सांगतो की, त्या बाजूने चपला चोरीला जातात, म्हणून इथे काढल्या. तेव्हा आपल्या मनातही विचार येतो की, तिथून तर चपला चोरीला जातात, म्हणून दर्शनाच्या वेळीही चित्त एकाग्र होत नाही. __पापानुबंधी पुण्य पूर्वी केलेल्या पुण्याने आज सुख भोगतो, परंतु भयंकर पापाचे अनुबंध बांधतो. आता सर्वत्र पापानुबंधी पुण्य आहे. कोण्या शेठजींचा असा छान बंगला असेल तरीही बंगल्यात सुखाने नाही राहू शकत. शेठ पूर्ण दिवस पैशांसाठी बाहेर असतो. आणि शेठाणी मोह बाजारात सुंदर साडीच्या मागे लागलेली असते आणि शेठची मुलगी मोटार घेऊन फिरायला गेलेली असते. घरात फक्त नोकरच असतात आणि पूर्ण बंगल्याचे हाल होतात. (घराला घरपण रहात नाही) पुण्याच्या आधारावर सर्व काही मिळाले, बंगला मिळाला, मोटार मिळाली, फ्रीज मिळाले. असे पुण्य असूनही पापाचे अनुबंध बांधेल अशी करतूत असते. लोभ-मोह याच्यात वेळ जातो आणि (पुण्य) उपभोगू पण शकत नाही. पापानुबंधी पुण्यवाले लोक तर विषयांची लुटबाजीच करतात. म्हणून तर बंगला आहे, गाड्या आहेत, वाईफ आहे, मुलं आहेत, सर्व काही आहे तरीही पूर्ण दिवस हाय, हाय, हाय, हाय पैसे कुठून आणू? अर्थात पूर्ण दिवस फक्त पापच बांधत राहतो. या जन्मात पुण्य भोगतो आणि

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90