Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 86
________________ पाप-पुण्य ७५ मग स्वत:जवळ जे आले असेल ते परक्यांसाठी लुटवतात! याला जीवन जगता आले असे म्हटले जाईल. वेडे म्हणून नाही, तर समंजसपणे परक्यांसाठी लुटवतात. वेड्यासारखे दारू पीत असेल त्यात कधी फायदा होत नाही. कधीही व्यसन करत नाही आणि स्वत:जवळचे दुसऱ्यांसाठी वापरतात त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. याहीपेक्षा पुढील पुण्यानुबंधी पुण्य कसे असते? कुठल्याही क्रियेत मोबदल्याची इच्छा ठेवत नाही, समोरच्या व्यक्तीला सुख देते वेळी त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा ठेवत नाही याचे नाव पुण्यानुबंधी पुण्य! ज्ञानच सोडवते भटकंतीपासून लोकांनी जे जाणले आहे ते लौकिक ज्ञान आहे. खरे ज्ञान तर वास्तविक असते आणि जे वास्तविक ज्ञान असते ते कोणत्याही प्रकारची अशांती होऊ देत नाही. आत कुठल्याही प्रकारचे पझल (कोडे) निर्माण होऊ देत नाही. या भ्रांतीज्ञानाने तर नुसती कोडीच उभी रहातात. आणि ही कोडी पुन्हा सुटतही नाही. गोष्ट खरी आहे, पण ती लक्षात यायला हवी ना? यथार्थ अर्थ समजून तो फिट झाल्याशिवाय कधीही हल (तोडगा) निघणार नाही. यथार्थ समज फिट करावी लागेल. समज फिट करण्यासाठी पापं धुवावी लागतात. पापं धुतली जात नाहीत तोपर्यंत ठिकाणा लागणार नाही. ही सर्व पापंच गोंधळ उडवतात. पापरूपी आणि पुण्यरूपी अडथळा आहे त्यामध्ये. तोच माणसाला गोंधळात टाकतो! अनंत जन्मांपासून सतत भटकत राहून या भौतिक सुखाच्या मागेच लागून राहिलो आहोत. या भौतिक सुखाने अंतरशांती होत नसते. पैश्यांचे अंथरून जरी अंथरले तरी झोप लागते का? यात तर स्वत:ची अनंत शक्ति वाया गेली! ज्ञानी पुरुष पापं धुऊन टाकतात. कृष्ण भगवंतांनी गीतेत सांगितले आहे, ज्ञानी पुरुष पापाचे गाठोडे करून नष्ट करून टाकतात. ही पापं जेव्हा नष्ट होतात तेव्हा आत्मा प्रकट होतो, नाही तर इतर कोणत्याही प्रकारे आत्मा

Loading...

Page Navigation
1 ... 84 85 86 87 88 89 90