________________
पाप-पुण्य
पुण्यानुबंधी पुण्य एक असे पुण्य जे भटकवणारे नाही, तसे पुण्य या काळात खूपच कमी आहे आणि ते सुद्धा आता काही काळानंतर संपून जाईल. त्यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. जे काही पुण्याचे कर्म केले, चांगले कर्म आणि त्यात सांसारिक हेतू नसेल, सांसारिक कोणतीही इच्छा नसेल, त्यावेळी जे पुण्य बांधेल, ते पुण्यानुबंधी पुण्य.
पुण्य भोगतात आणि सोबत आत्मकल्याणासाठी अभ्यास, क्रिया करतात. पुण्य भोगतो आणि नवीन पुण्य बांधत असतो, ज्यामुळे अभ्युदयाने मोक्ष फळ मिळते. पुण्यानुबंधी पुण्य कशाला म्हणतात की आज पुण्य आहे, मस्त सुख भोगत आहे, कोणतीही अडचण येत नाही आणि परत धर्माचे आणि धर्माचेच पूर्ण दिवस करत राहतो, हे पुण्यानुबंधी पुण्य आहे, असेच विचार येतात, फक्त धर्माचे आणि धर्माचेच, सत्संगातच राहण्याचे विचार येतात. आणि ज्या पुण्याने सुख-सुविधा जास्त नाहीत, पण उच्च विचार येतात की, कसे करून कोणालाही दुःख होणार नाही असा व्यवहार करू, असे वर्तन करू, भले स्वत:ला थोडी अडचण येत असेल, त्यात हरकत नाही, पण कोणाला उपाधी (दु:ख) होऊ देणार नाही. ते पुण्यानुबंधी पुण्य म्हटले जाते. म्हणून नवे अनुबंधही पुण्याचेच होतात.
प्रश्नकर्ता : पुण्यानुबंधी पुण्याचे उदाहरण द्या.
दादाश्री : आज एका माणसा जवळ गाडी-बंगला वगैरे सर्व साधने आहेत, पत्नी चांगली आहे, मुले चांगली आहेत, नोकर चांगले आहेत, तर हे जे काही चांगले मिळाले आहे, त्यास काय म्हटले जाते? लोकं म्हणतात, की 'पुण्यशाली आहे.' आता हा पुण्यशाली काय करत आहे, हे आम्ही पाहिले तर, दिवसभर साधू-संतांची सेवा करतो, दुसऱ्यांची सेवा करतो आणि मोक्षासाठी तयारी करतो. असे-तसे करता करता त्याला मोक्षाचे साधनही मिळून जाते. आजही पुण्य आहे आणि नवीन पुण्य बांधत आहे आणि जरी पुण्य कमी मिळाले, तरी पण विचार तर परत तसेच येतात की, 'मोक्षाला जायचे आहे' हे पुण्यानुबंधी पुण्य. तुम्ही मला भेटलात हे तुमचे