Book Title: Noble Use Of Money Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 12
________________ दान कमवलेले चांगले. इथे वषभ पैसे सदुपयोगासाठी वापरले जातील याकडे विशेष काळजी घ्या. नाहीतर तुमच्याजवळ जर जास्त पैसे असतील तर ते तुम्हाला अधोगतीत घेऊन जातील. म्हणून त्या पैशांचा कुठेही सदुपयोग करुन टाका. धर्माचार्यांनी मात्र पैसे घेऊ नये. वळवा लक्ष्मी, धर्माकडे पैसे सांभाळणे हे तर खूपच कठीण आहे, त्यापेक्षा तर कमी कमवलेले चांगले. इथे वर्षभरात दहा हजार कमवले आणि एक हजार देवाजवळ ठेवले, तर काही अडचण नाही. कोणी लाखो दिले आणि कोणी हजार दिले, दोन्ही समान आहे, पण निदान हजार तरी दिले पाहिजे. माझे काय म्हणणे आहे की काहीच द्यायचे नाही, असे करु नका, कमी असेल तरी त्यातले काहीतरी द्या आणि जर जास्त असतील आणि ते पैसे धर्माकडे वळवले, तर मग आपली जबाबदारी राहत नाही. अन्यथा जोखीम आहे. ती तर खूप उपाधी आहे. पैसे सांभळणे म्हणजे फार कठीण आहे. गाई-म्हशींना सांभाळणे बरे, त्यांना खुंटीला बांधले तर सकाळपर्यंत कुठे जाणार तर नाही. परंतु पैसे सांभाळणे हे फार कठीण आहे. कठीण, उपाधी आहे सगळी..... लक्ष्मी टिकत का नाही? प्रश्नकर्ता : मी दहा हजार रुपये महिना कमावतो, पण माझ्याकडे लक्ष्मीजी (पैसे) टिकत का नाही? । दादाश्री : सन १९४२ च्या नंतरची लक्ष्मी टिकत नाही. ती जी लक्ष्मी आहे ती पापाची लक्ष्मी आहे, म्हणून टिकत नाही. आता पुढच्या दोन-पाच वर्षा नंतरची लक्ष्मी टिकेल. आम्ही ज्ञानी आहोत, तरीपण लक्ष्मी येते, पण टिकत नाही. इथे इन्कमटेक्स भरता येईल इतकी लक्ष्मी आली तरी झाले! प्रश्नकर्ता : लक्ष्मी टिकत नाही, तर काय करावे?

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70