Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
आहार दान
औषधदान
अभयदान
ज्ञानदान
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
646
OCOM
दादा भगवान कथित
दान
मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबेन अमीन
अनुवाद : महात्मागण
१OOP
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्तिः
3,000
ऑक्टोबर 2016
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
_ 'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : 10 रुपये
मुद्रक
:
अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
मित्र
વર્તમાનતીર્થકર દે.ચીફીમંધરવામાં नमो अरिहंताणं नमो सिसाणं नमो मायरियाणं नमो उवझायाणं नमो लोए सब्बसाहूणं एसो पंच नमुखारो, सव्य पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसिं,
पखम इवाइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जब सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चूक
११. पाप-पुण्य २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार ३. जे घडले तोच न्याय
१३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार ४. संघर्ष टाळा
१४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ५. मी कोण आहे ?
१५. मानव धर्म ६. क्रोध
१६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ७. चिंता
१७. सेवा-परोपकार ८. प्रतिक्रमण
१८. दान ९. भावना सुधारे जन्मोजन्म १९. त्रिमंत्र १०. कर्माचे विज्ञान
२०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति
२१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध
२३. दान ५. मैं कौन हूँ?
२४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ९. टकराव टालिए
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय
२९. क्लेश रहित जीवन ११. चिंता
३०. गुरु-शिष्य १२. क्रोध
३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण
३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ?
३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार
३४. पाप-पुण्य १६. अंतःकरण का स्वरूप
३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ?
३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र
३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे. * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण ?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल | मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून | व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एका तासात विश्वदर्शन | लाभले ! मी कोण ? भगवंत कोण ? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे | काय ? मुक्ती कशाला म्हणतात ? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण ?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए. एम. | पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, | सर्वांमध्ये आहेत ! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत | संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत ! माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो. "
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी | आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही | पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना | यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
___ - दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.
पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे.
अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.
वाचकांना...
ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'दान' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.
जिथे जिथे 'चंदुभाऊ ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.
पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय पुण्य प्राप्त करण्याचे अनेक मार्ग शास्त्रकारांनी आणि धर्मगुरुंनी दर्शविले आहेत. त्यातील एक आहे दान. दान म्हणजे दुसऱ्याला आपले काहीतरी देऊन त्याला सुख देणे.
दान देण्याची प्रथा मनुष्याच्या जीवनात लहानपणापासूनच अंगिकारण्यात आली आहे. लहान मुल असेल, त्याला सुद्धा देवळात घेऊन जातात तेव्हा बाहेर गरीब लोकांना त्याच्या हातून पैसे देतात, खाऊ घालतात, देऊळातील दानपेटीत त्याला पैसे टाकायला सांगतात. अशा प्रकारे लहानपणापासूनच दान देण्याचे संस्कार मिळत राहतात.
दान देताना आतील अजागृति असेल तर दान देऊनही कशा प्रकारे खोट खाल्ली जाते त्याचे सूक्ष्म निरुपण परम पूज्य दादाश्रींनी केले आहे. दान देताना कोणती जागृति ठेवावी? सर्वात उच्च प्रकारचे दान कोणते? दान कोणकोणत्या प्रकारे होऊ शकते? दानाचे प्रकार कोणकोणते ? त्यामागील भावना कशी असावी? दान कोणाला द्यावे? वगैरे, वगैरे. दान संबंधी असलेल्या अनेक गोष्टी, ज्या दादाश्रींच्या ज्ञानवाणी द्वारे निघालेल्या आहेत. ते प्रस्तुत पुस्कात संकलित करुन प्रकाशित करण्यात आले आहे. जे सुज्ञ वाचकास दान देण्यासाठी उत्तम मार्गदर्शिका म्हणून उपयोगात येईल.
- डो. नीरूबहन अमीन
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
दान
दान कशासाठी ?
प्रश्नकर्ता: दान कशासाठी के55ले जाते ?
दादाश्री : असे आहे की दान देऊन तो स्वतः काही घेऊ इच्छीतो. सुख देऊन सुख प्राप्त करु इच्छीतो. मोक्षासाठी दान देत नाही. लोकांना तुम्ही सुख दिले तर तुम्हाला सुख मिळेल. जे तुम्ही देता ते तुम्ही मिळवता. म्हणजे हा तर नियम आहे, दिल्याने आपल्याला मिळते, प्राप्त होते, आणि घेतल्याने ते निघून जाते.
प्रश्नकर्ता : उपवास करणे चांगले की काही दान करणे चांगले ?
दादाश्री : दान देणे म्हणजे शेतात पेरणे. शेतात पेरले म्हणजे मग त्याचे फळ मिळेल. आणि उपवास केल्याने आतील जागृती वाढेल. परंतु शक्तिनुसार उपवास करायला देवाने सांगितले आहे.
दान म्हणजेच सुख देणे
दान म्हणजे दुसऱ्या कोणत्याही जीवाला, मग ते मनुष्य असो किंवा दुसरे प्राणी असो, त्यांना सुख देणे, याचे नाव दान. आणि सर्वांना सुख दिले तर त्याच्या ‘रिएक्शन' ने आम्हाला सुखच मिळते. सुख दिले तर लगेचच तुम्हाला घरी बसल्या सुख मिळेल. तुम्ही दान देता, तेव्हा तुम्हाला आतुन सुख वाटते. स्वत:च्या घरचे पैसे काढून देता तरी सुख वाटते. कारण चांगले काम केले. चांगले काम केले म्हणजे सुख वाटते आणि वाईट काम केले तेव्हा दुःख वाटते. या वरुन आम्हाला कळते की कोणते काम चांगले व कोणते वाईट ?
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
दान
आनंद प्राप्तीचे उपाय प्रश्नकर्ता : मानसिक शांति मिळवण्यासाठी माणसाने एखाद्या गरीबाची, एखाद्या अशक्त माणसाची सेवा करावी की देवाची भजना करावी किंवा मग कोणाला दान द्यावे? काय केले पाहिजे?
दादाश्री : मानसिक शांती हवी असेल तर आपली वस्तू दुसऱ्यास खाऊ घालावी. उद्या आईस्क्रीमचे पिंप भरुन आण आणि या सर्वांना खायला घाल. मग त्यावेळी तुला किती आनंद होतो, ते तू मला सांग. ह्या लोकांना आईस्क्रीम खायचे नाही पण तू तुझ्या शांतीचा प्रयोग करुन बघ. या थंडीत कोणी रिकामा नाही आईस्क्रीम खायला. या प्रमाणे तू जिथे असशील तिथे जी जनावरे असतील, ही माकडे असतात, त्यांना चणे दिले तर ते खुश होऊन उड्या मारतात. तेव्हा तुझ्या आनंदाची सीमा राहणार नाही. ते खात राहतील आणि तुझ्या आनंदाची सीमा राहणार नाही. या कबुतरांना तू दाणे टाकशील त्या आधीच ते खुश होऊन उड्या मारु लागतात. आणि तू टाकले, तुझी वस्तू दुसऱ्यास दिली की आतून आनंद वाटू लागतो. आता एखादा मनुष्य जर रस्त्यात पडला आणि त्याचा पाय मोडला आणि रक्त वाहत असेल, तेव्हा तू स्वतःचे धोतर फाडून तिथे बांधतो त्यावेळी तुला आनंद वाटतो. ते धोतर जरी शंभर रुपयाचे असले, ते फाडून तू बांधलेस, पण त्यावेळी तुला खूप आनंद होईल.
दान कुठे द्यावे? प्रश्नकर्ता : काही धर्मात असे सांगितले जाते की जे काही तुम्ही कमावता, त्यातून काही टक्के दान करा, पाच-दहा टक्के दान करा, तर ते कसे आहे?
दादाश्री : धर्मामध्ये दान करण्यास हरकत नाही, पण ज्या धार्मिक संस्थामध्ये लक्ष्मीचा धर्मासाठी सदुपयोग होत असेल तेथे द्या. जेथे दुरुपयोग होत असेल तेथे देऊ नका, दुसरीकडे द्या.
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
दान
कमवलेले चांगले. इथे वषभ
पैसे सदुपयोगासाठी वापरले जातील याकडे विशेष काळजी घ्या. नाहीतर तुमच्याजवळ जर जास्त पैसे असतील तर ते तुम्हाला अधोगतीत घेऊन जातील. म्हणून त्या पैशांचा कुठेही सदुपयोग करुन टाका. धर्माचार्यांनी मात्र पैसे घेऊ नये.
वळवा लक्ष्मी, धर्माकडे पैसे सांभाळणे हे तर खूपच कठीण आहे, त्यापेक्षा तर कमी कमवलेले चांगले. इथे वर्षभरात दहा हजार कमवले आणि एक हजार देवाजवळ ठेवले, तर काही अडचण नाही. कोणी लाखो दिले आणि कोणी हजार दिले, दोन्ही समान आहे, पण निदान हजार तरी दिले पाहिजे. माझे काय म्हणणे आहे की काहीच द्यायचे नाही, असे करु नका, कमी असेल तरी त्यातले काहीतरी द्या आणि जर जास्त असतील आणि ते पैसे धर्माकडे वळवले, तर मग आपली जबाबदारी राहत नाही. अन्यथा जोखीम आहे. ती तर खूप उपाधी आहे. पैसे सांभळणे म्हणजे फार कठीण आहे. गाई-म्हशींना सांभाळणे बरे, त्यांना खुंटीला बांधले तर सकाळपर्यंत कुठे जाणार तर नाही. परंतु पैसे सांभाळणे हे फार कठीण आहे. कठीण, उपाधी आहे सगळी.....
लक्ष्मी टिकत का नाही? प्रश्नकर्ता : मी दहा हजार रुपये महिना कमावतो, पण माझ्याकडे लक्ष्मीजी (पैसे) टिकत का नाही? ।
दादाश्री : सन १९४२ च्या नंतरची लक्ष्मी टिकत नाही. ती जी लक्ष्मी आहे ती पापाची लक्ष्मी आहे, म्हणून टिकत नाही. आता पुढच्या दोन-पाच वर्षा नंतरची लक्ष्मी टिकेल. आम्ही ज्ञानी आहोत, तरीपण लक्ष्मी येते, पण टिकत नाही. इथे इन्कमटेक्स भरता येईल इतकी लक्ष्मी आली तरी झाले!
प्रश्नकर्ता : लक्ष्मी टिकत नाही, तर काय करावे?
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
दान
दादाश्री : लक्ष्मी तर टिकेल अशी नाहीच, पण त्याचा मार्ग बदलून टाकला पाहिजे. ती ज्या मार्गाने जात असेल त्याचा प्रवाह बदलून टाकावा आणि धर्माच्या मार्गावर वळवावी. ती जेवढी सुमार्गावर जाईल तेवढी खरी. भगवंत येतील तेव्हा लक्ष्मी टिकेल, त्याशिवाय लक्ष्मी टिकणारच कशी? भगवंत असतील तेथे क्लेश होत नाही आणि फक्त लक्ष्मीजी असेल तर क्लेश आणि भांडणे होतात. लोक लक्ष्मी भरपूर कमवतात, पण ती वाया जाते. एखाद्या पुण्यशाली माणसाच्या हातून लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते. लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते, हे एक मोठे पुण्य म्हटले जाते.
सन १९४२ नंतर लक्ष्मीमध्ये काही सारच नाही. हल्ली लक्ष्मी योग्य ठिकाणी वापरली जात नाही. योग्य जागी खर्च झाली, तर फारच चांगले म्हटले जाईल.
सात पिढ्यांपर्यंत टिकते लक्ष्मी प्रश्नकर्ता : जसे की भारतात कस्तूरभाई लालभाई ची पिढी आहे, तर दोन-तीन-चार पिढ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत. पण इथे अमेरिकेत कसे आहे की पिढी असते, पण फार तर सहा आठ वर्षात सर्वकाही संपून जाते. एक तर पैसे असले तर जातात आणि नसले तर पैसे येतात सुद्धा. तर त्याचे कारण काय असेल?
दादाश्री : असे आहे ना, तेथील जे पुण्य आहे ना, इंडियाचे पुण्य, ते इतके चिकट असते की सारखे धुतच राहिलो, तरीही जात नाही आणि पाप सुद्धा इतके चिकट असते की धुवतच राहिलो, तरी जात नाही. म्हणजे तो वैष्णव असो की जैन असो, पण त्याने पुण्य इतके मजबूत बांधलेले असते की धुवतच राहिले तरी संपत नाही. जसे की पेटलाद चे दातार सेठ, रमणलाल शेठच्या सात-सात पिढ्यांपर्यंत संपन्नता टिकून राहिली. खोऱ्याने उपसून उपसून धन देत असत लोकांना, तरीही कधी कमी पडले नाही. त्यांनी पुण्य जबरदस्त बांधले होते, एकदम सचोटीने. आणि पापही
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
दान
असेच सचोटीने बांधत असत, सात-सात पिढ्यापर्यंत गरिबी जात नव्हती. अत्यंत दु:ख भोगत. अर्थात् एक्सेस (अति) पण होत असे आणि मिडीयम (मध्यम) पण राहत असे.
इथे अमेरिकेत तर उतू पण जाते आणि परत बसतेही. एकदा बसल्यावर पुन्हा उतूही जाते. इथे वेळच लागत नाही. आणि तिथे भारतात एकदा बसल्यावर पुन्हा उतू जाण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणूनच तेथे तर सात-सात पिढ्यांपर्यंत चालत असे. आता सगळे पुण्य कमी झाले आहे. कारण काय होते, की कस्तूर भाऊच्या येथे जन्म कोण घेणार? तेव्हा म्हणा असेच पुण्यवान, की जे त्यांच्या सारखेच असतील, तेच तेथे जन्म घेतील? मग त्यांच्या घरी कोण जन्माला येतो? तर तसाच पुण्यशाली तेथे जन्माला येतो. यात कस्तूरभाईचे पुण्य काम करत नाही. ते मग तसाच कोणी दुसरा आला असेल त्याचे पुण्य. म्हणून तर ती म्हटली जाते कस्तूरभाईची पिढी, आणि सध्या तर असे पुण्यशाली आहेतच कुठे? आता गेल्या पंचवीस वर्षात तर खास असे कोणी नाहीच.
नाहीतर गटारात वाहून जाईल... ___पूर्वी तर लक्ष्मी पाच पिढ्यांपर्यंत तरी टिकायची, तीन पिढ्यांपर्यंत तरी टिकायची. आता तर लक्ष्मी एक पिढी सुद्धा टिकत नाही. या काळाची लक्ष्मी कशी आहे? तर एक पिढी सुद्धा टिकत नाही. त्यांच्या उपस्थितीतच येते आणि त्यांच्या उपस्थितीतच जाते, अशी ही लक्ष्मी आहे. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. त्यात जर थोडी-फार पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असेल, तर ती तुम्हाला येथे (सत्संगात) येण्यासाठी प्रेरणा देते. इथे तुमची भेट घालून देते आणि इथे तुमच्याकडून खर्चही करवते. चांगल्या मार्गाने लक्ष्मी जावी, नाहीतर सर्व धुळीत मिळून जाईल. सर्व गटारात वाहून जाईल... ही मुले आपलीच लक्ष्मी उपभोगतात ना. आणि आपण जर मुलांना म्हटले की तुम्ही आमची लक्ष्मी उपभोगता, तर ते म्हणतील तुमची कशी? 'आम्ही तर आमचीच भोगतोय,' असे बोलतील. म्हणजे गटारीतच गेले ना सगळे!
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
दान
अतिरिक्त वाहू द्या, धर्मासाठी हा तर लोकसंज्ञेमुळे दुसऱ्यांचे पाहून शिकतो. पण जर ज्ञानींना विचारले तर ते म्हणतील. नाही, हे का म्हणून असे खड्ड्यात पडतात. या दुःखाच्या खड्ड्यातून निघाला, की परत पैशांच्या खड्ड्यात पडला? अतिरिक्त असेल तर धर्मकार्यात वापरुन टाक, येथूनच. तेच तुझ्या हिशोबात जमा होतात. हे बँकेचे पैसे काही जमा होत नाही. आणि तुला कधी अडचणही येणार नाही. जो धर्मासाठी देतो त्याला कधी अडचण येत नाही.
त्याचा प्रवाह बदला
कसोटीच्या वेळी तर एक मात्र धर्मच आपल्या मदतीसाठी उभा राहतो, म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजीला जावू द्यावे. फक्त एक सुषमकाळातच (जेव्हा तीर्थंकर भगवंत हजर असतात तो काळ) लक्ष्मीचा मोह करण्या योग्य होता. त्या लक्ष्मीजी तर आल्या नाहीत, आणि या सेठ लोकांना हार्ट फेईल आणि ब्लडप्रेशर कोण करवते? तर या काळाची लक्ष्मीच करवते.
पैशांचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. म्हणजे येतात व एक दिवस परत निघून जातात. म्हणून पैसे लोकांच्या हितासाठी वापरावेत. जेव्हा तुमचा वाईट कर्माचा उदय आला असेल, तेव्हा लोकांना जे दिले असेल तेच तुम्हाला मदत करेल. म्हणून आधीच समजून जावे. पैशांचा सदुपयोग तर केलाच पाहिजे ना?
चारित्र्याने समंजस झाला तर समजा संपूर्ण जग जींकले. मग भले जे खायचे असेल ते खाऊ दे, पिऊ दे आणि अधिक असेल तर इतरांना खाऊ घालू दे. दुसरे करण्यासारखे काय आहे? सोबत घेऊन जाता येते का? जे धन परक्यांसाठी खर्च केले, तेवढेच धन आपले, तेवढीच तुमच्या पुढच्या जन्मासाठी जमापुंजी. म्हणून जर कोणाला पुढील जन्मासाठी जमापुंजी जमवायची असेल तर धन पराक्यांसाठी वापरावे. परका जीव, त्यात कुठलाही जीव, मग तो कावळा का असेना, तो इतकेसे जरी चाखून
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
गेला तरीही ते तुमची जमा रक्कम. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी खाल्ले ती सर्व तुमची जमा रक्कम नव्हे. ते सर्व गटारीत गेले, पण तरीही गटारीत जाणे थांबवू शकत नाही, कारण ते तर अनिवार्य आहे. त्यात काही सुटका आहे का? पण त्याचबरोबर समजले पाहिजे की परक्यांसाठी खर्च केले नाही, ते सगळे गटारीतच जाते. ___माणसाला जरी खाऊ घातले नाही पण शेवटी कावळ्याला घातले, चिमण्यांना घातले, या सर्वांना खाऊ घातले तरी देखील ते इतरांसाठी खर्च केलेले मानले जाईल. माणसाच्या ताटाची किंमत तर आता फार वाढली आहे ना? पण चिमण्यांच्या ताटाची किंमत तर खास नाही ना? तेव्हा तुमचे जमा पण तेवढे कमीच होईल ना?
मन बिघडले आहे म्हणून.... प्रश्नकर्ता : काही काळापर्यंत मी माझ्या कमाईतून तीस टक्के धार्मिक कार्यासाठी देत होतो, पण आता ते सगळे थांबले आहे. जे-जे काही देत होतो, ते आता देऊ शकत नाही.
दादाश्री : ते तर तुम्हाला करायचे आहे तर ते दोन वर्षानंतरही येईलच! तेथे काही तोटा नाही. तेथे तर भरपूर आहे. तुमचे मन बिघडले असेल तर मग काय होईल?
आल्यानंतर देऊ की दिल्यानंतर येतील? मी एका माणसाच्या बंगल्यात बसलो होतो, तेव्हा तेथे चक्रीवादळ आले. म्हणून दारे खडखड-खडखड आपटू लागली. त्याने मला विचारले, 'हे चक्रीवादळ आले आहे, सगळी दारे बंद करु का? मी म्हणालो सगळी दारे बंद करु नकोस, आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा उघडा ठेव आणि बाहेर निघण्याचे दरवाजे बंद करुन टाक, मग आत किती हवा येईल? भरलेली रिकामी होईल तेव्हाच हवा आत येईल ना? नाहीतर कितीही मोठे चक्रीवादळ असले तरी आत येणार नाही.' नंतर त्याला अनुभव घडवून दिला. तेव्हा तो म्हणाला, 'आता आत शिरत नाही.'
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
दान
तर या वादळाचे असे आहे. लक्ष्मीला जर तुम्ही अडवली तर येणार नाही, जेवढी असेल तेवढी भरलेलीच राहील. आणि एकीकडून जाऊ
द्याल तर दुसरीकडून येत राहील. आणि अडवून ठेवली तर तेवढीच्या तेवढीच राहील. लक्ष्मीचे काम हे सुद्धा असेच आहे. म्हणून आता कोणत्या मार्गाने जाऊ द्यावी हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे की बायको मुलांच्या मौज-मजेसाठी जाऊ द्यावी की कीर्तीसाठी जाऊ द्यावी, किंवा ज्ञानदानासाठी जाऊ द्यावी, किंवा मग अन्नदानासाठी जाऊ द्यावी? कशासाठी जाऊ द्यावी ते तुमच्यावर अवलंबून आहे, पण जाऊ द्याल तर दुसरी येईल. जाऊ दिली नाही, तर त्याचे काय होईल? जाऊ दिली तर दुसरे नाही का येणार? हो येईल.
बदललेल्या प्रवाहाच्या दिशा किती प्रकारचे दान आहेत हे माहित आहे का तुम्हाला? दानाचे चार प्रकार आहेत. बघा, एक आहारदान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान.
पहिले आहारदान
पहिल्या प्रकारचे जे दान आहे ते आहे अन्नदान. या दानासाठी तर असे म्हटले जाते की, भाऊ, एखादा मनुष्य आमच्या घरी येऊन म्हणेल की 'मला काही खायला द्या, मी उपाशी आहे.' तेव्हा म्हणावे 'बैस येथे जेवायला. मी तुला वाढतो.' हे झाले आहारदान. तेव्हा अक्कलवाले काय म्हणतील? या तगड्या माणसाला आता खाऊ घालाल पण मग परत संध्याकाळी खायला कसे घालाल? तेव्हा भगवंत म्हणतात तु अशी अक्कल वापरु नकोस. या व्यक्तिने त्याला खाऊ घातले तर तो आजचा दिवस तरी जगेल. मग उद्या जगण्यासाठी परत त्याला कोणी तरी दुसरे भेटेल. उद्याचा विचार आपण करायचा नाही. आपल्याला दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही, की उद्या तो काय करेल? उद्या त्याला परत मिळेल. यात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की आपण नेहमी देऊ शकू की नाही.
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
दान
तुमच्याकडे आला आहे तेव्हा तुम्ही त्याला द्या. जे काही देता येईल ते
द्या, आज तरी तो जगला, बस! मग उद्या त्याचा दुसरा काही उदय असेल. तुम्हाला फिकीर करण्याची गरज नाही.
प्रश्नकर्ता : अन्नदान श्रेष्ठ मानले जाते?
दादाश्री : अन्नदान श्रेष्ठ मानले जाते परंतु अन्नदान किती देऊ शकता? नेहमीसाठी देत नाहीत ना लोकं. एक प्रहर खाऊ घातले तरी फार झाले. दुसऱ्या प्रहरी परत दुसरे मिळेल. पण आजचा दिवस, एक प्रहर तरी जिवंत राहिला ना? आता यातही लोक उरले-सुरलेच देतात की, नवे बनवून देतात?
प्रश्नकर्ता : उरलेलेच देतात. स्वत:चा पिच्छा सोडवतात. उरलेच आहे तर आता काय करावे?
दादाश्री : तरीही त्याचा सदुपयोग करतात, माझ्या भावा! पण जर नवीन बनवून दिले तर मी म्हणेल की ते करेक्ट आहे. वीतरागांकडे काही नियम असतील की थापा मारलेल्या चालतील?
प्रश्नकर्ता : नाही, नाही असे थापा मारुन कसे चालेल? दादाश्री : वीतरागांकडे तसे चालत नाही, इतर ठिकाणी चालेल.
औषधदान
आणि दुसरे आहे औषधदान, ते आहारदाना पेक्षा उत्तम मानले जाते. औषधदानाने काय होते? साधारण परिस्थिती असलेला मनुष्य जर आजारी पडला, तर तो इस्पितळात जातो. आणि तेथे कोणी तरी म्हणतो की, 'अरे डॉक्टरांनी सांगितले आहे, पण माझ्याजवळ औषध आणायला पन्नास रुपये नाहीत. म्हणून मी औषध कसे काय आणू? तेव्हा आपण म्हणायचे की, हे घे पन्नास रुपये औषधसाठी आणि दहा रुपये आणखी घे. किंव्हा मग कुठून तरी औषध आणून आपण त्याला मोफत द्यावे. आपण स्वतः पैसा खर्च करुन औषधे आणून त्याला फ्री ऑफ कॉस्ट
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
10
दान
(मोफत) द्यावी. मग त्याने ते औषध घेतले तर तो बिचारा चार-सहा वर्ष जगेल. अन्नदानाच्या तुलनेने औषधदानाने अधिक फायदा आहे, समजले का तुम्हाला? कशात फायदा अधिक ? अन्नदान चांगले की औषधदान ?
प्रश्नकर्ता : औषधदान.
दादाश्री : औषधदानाला अन्नदानापेक्षा अधिक मूल्यवान मानले आहे कारण तो दोन महिने पण जिवंत ठेवतो. मनुष्याला थोडे जास्त काळ जिवंत ठेवतो. वेदनेतून थोडी फार मुक्ती करवितो.
बाकी अन्नदान आणि औषधदान तर आपल्याकडे बायका, मुले सर्व सहज करत असतात. ते काही फार मूल्यवान दान नाही. पण तरी केले पाहिजे. जर असा कोणी आम्हाला भेटला, आमच्याकडे कोणी असा दुःखी मनुष्य आला, तर आपल्याकडे जे काही तयार असेल ते लगेच त्याला देऊन टाकावे.
उच्च ज्ञानदान
मग त्याच्या पुढे ज्ञानदान म्हटले आहे. ज्ञानदानात पुस्तके छापावी, लोकांना समजावून खऱ्या मार्गावर आणावे, आणि लोकांचे कल्याण व्हावे अशी पुस्तके छापून घ्यावी इत्यादी, हे झाले ज्ञानदान. ज्ञानदान दिले तर चांगल्या गतीत, उच्च गतीत जातो किंवा मग मोक्षालाही जातो.
म्हणून मुख्य वस्तू ज्ञानदान असे भगवंतांनी म्हटले आहे. आणि जिथे पैशांची गरज नाही तेथे अभयदानाची गोष्ट सांगितली आहे. जेथे पैशांची देवाण - घेवण आहे तेथे हे ज्ञानदान म्हटले आहे. आणि साधारण परिस्थिती, नरम परिस्थितीच्या लोकांना औषधदान व आहारदान द्यायला सांगितले आहे.
प्रश्नकर्ता : पण पैसे उरले असतील, तर त्याचे दान तर करावे
ना ?
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
दान
11
दादाश्री : दान तर उत्तम आहे. जेथे दुःख असेल तेथे दुःख कमी करा आणि दुसरे सन्मार्गावर खर्च करा. लोक सन्मार्गावर जातील असे ज्ञानदान करा. या दुनियेत उच्च असे ज्ञानदान आहे ! तुम्ही जरी एक वाक्य जाणले (शिकले) तरी किती लाभ होतो! तेव्हा हे पुस्तक लोकांच्या हातात आले तर कितीतरी लाभ होईल.
प्रश्नकर्ता : आता नीट लक्षात आले....
दादाश्री : हो, म्हणून ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, त्याने मुख्यतः ज्ञानदान केले पाहिजे.
तर आता हे ज्ञानदान कसे असावे ? लोकांना हितकारी होईल असे ज्ञान असावे. हो, पण लुटारुंच्या कथा ऐकण्यासाठी नव्हे. ते तर खाली पाडतात. ते वाचल्यावर आनंद तर होतो, पण खाली अधोगतीत जात राहतात.
सर्वात उच्च अभयदान
आणि चौथे आहे अभयदान. अभयदान म्हणजे आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र त्रास होऊ नये. अशा प्रकारे वागावे. तेच अभयदान.
प्रश्नकर्ता : अभयदान जरा सविस्तर समजवा.
दादाश्री : अभयदान म्हणजे आमच्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये. त्याचे एक उदाहरण देतो. मी सिनेमा बघायला जात असे, लहान वयात, बावीस पंचविसाव्या वर्षी. तर परत येतांना रात्रीचे बारा-साडेबारा वाजत असत. पायी चालत येत होतो तर बुटांचा आवाज होत असे. आम्ही बुटांना घोड्याची लोखंडी नाळ लावून घेत असत म्हणून खटखट आवाज होत असे. रात्री आवाज जास्त येत असे. रात्री कुत्री बिचारी झोपलेली असत, आरामात झोपलेली असत, ते कान टवकारुन बघत. तेव्हा आम्ही समजून जात असत की तो बिचारा आमच्यामुळे
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
12
दान
दचकला. आम्ही असे कसे जन्माला आलो या मोहोल्यात की आमच्या मुळे कुत्रेही भितात. म्हणून आधिच, लांबूनच बुट काढून हातात घेऊन असे गुपचूप यायचो. पण त्याला दचकू देत नसत. हा लहान वयातील आमचा प्रयोग. आपल्यामुळे तो दचकला ना?
प्रश्नकर्ता : हो त्याच्या झोपेतही विक्षेप पडला ना?
दादाश्री : हो तो दचकला की मग स्वतःचा स्वभाव सोडणार नाही. कधीतरी भुंकतो सुद्धा, स्वभावाच आहे त्याचा. त्यापेक्षा त्याला झोपू दिले तर काय वाईट? त्यात मोहल्यात राहणाऱ्याला तर भुंकणार नाही.
म्हणूनच अभयदान, कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये, असा भाव आधी ठेवावा आणि नंतर तो प्रयोगात येतो. भाव केले तर प्रयोगात येतात, परंतु भावच केले नसेल तर? म्हणूनच याला मोठे दान म्हणटले आहे भगवंतानी. यात पैशांची काही गरज नाही, सर्वात उच्च दान हेच आहे. श्रीमंत असले, तरी सुद्धा असे करु शकत नाहीत. म्हणून श्रीमंतानी लक्ष्मी देऊन (दान) पूर्ण केले पाहिजे.
म्हणजे ह्या चार प्रकारच्या दानाशिवाय आणखी कुठल्या प्रकारचे दान नाही, असे भगवंत सांगतात. बाकी सर्व प्रकारच्या दानाची जी गोष्ट करतात ती सर्व कल्पना आहे. ह्या चार प्रकारचेच दान आहेत, आहारदान, औषधदान, मग ज्ञानदान आणि अभयदान. शक्यतो अभयदानाची भावना मनात करुन ठेवावी.
प्रश्नकर्ता : पण अभयदानातूनच हे तिन्ही दान निघतात? या भावनेतून?
दादाश्री : नाही, असे आहे की अभयदान तर उच्च मनुष्य करु शकतो. ज्याच्याकडे लक्ष्मी नसेल असा साधारण मनुष्य सुद्धा हे करु शकतो. उच्च पुरुषांकडे लक्ष्मी असो वा नसो. म्हणजे लक्ष्मीशी त्यांचा व्यवहार नाही, परंतु अभयदान तर ते अवश्य करु शकतात. पूर्वी लक्ष्मीपती
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
दान
(श्रीमंत) अभयदान करत असत, परंतु आता त्यांच्याकडून हे होत नाही, ते कच्चे आहेत. लक्ष्मीच कमवून आणली ना, आणि ते सुद्धा लोकांना घाबरवून, घाबरवून.
प्रश्नकर्ता : भयदान केले आहे ?
दादाश्री : नाही, असे म्हणू नये. असे करुनही ज्ञानदानात तर खर्च करतात ना? तेथे वाटेल तसे करुन आलेत, पण येथे ज्ञानदानात खर्च करतात ते उत्तम आहे, असे भगवंतानी म्हटले आहे.
ज्ञानीच देतात 'हे' दान म्हणून श्रेष्ठ दान अभयदान, दुसऱ्या क्रमांकावर ज्ञानदान. अभयदानाची प्रशंसा भगवंतांनीही केली आहे. पहिले, कोणीही तुमच्यामुळे भयभीत होऊ नये, असे अभयदान द्यावे. दुसरे ज्ञानदान, तिसरे औषधदान, आणि चौथे आहारदान.
ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ अभयदान! परंतु लोक अभयदान देऊ शकत नाही ना! ज्ञानी एकटेच अभयदान देतात. ज्ञानी आणि ज्ञानीचा परिवार असतो, ते अभयदान देतात. ज्ञानीचे फोलोअर्स (अनुयायी) असतात ते अभयदान देतात. कोणालाही भय वाटू नये असे राहतात. समोरचा भयरहित राहू शकेल असे वागतात. कुत्राही घाबरणार नाही असे त्यांचे वर्तन असते. कारण कोणालाही दुःख दिले ते दुःख स्वत:च्या आत पहोचते. समोरच्याला दुःख दिले तर आपल्या आत ते पोहोचते. म्हणून आपल्यापासून कोणत्याही जीवाला किंचितमात्र भय वाटू नये असे वागावे.
'लक्ष्मी' तीन्हीमध्ये येते प्रश्नकर्ता : मग काय लक्ष्मीदानाचे स्थानच नाही?
दादाश्री : लक्ष्मीदान, हे ज्ञानदानात आले. आता तुम्ही पुस्तके छापून घेतलीत ना, तर लक्ष्मी त्यात आलीच, ते ज्ञानदान.
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
14
दान
प्रश्नकर्ता : लक्ष्मी मुळेच सगळे शक्य होते ना? अन्नदान देखील लक्ष्मीमुळेच देता येते ना?
दादाश्री : औषध द्यायचे असेल तरीही आपण शंभर रुपयांचे औषध आणून त्याला देऊ तेव्हाच ना? अथात् लक्ष्मी तर सगळ्यात खर्च करायचीच आहे, परंतु लक्ष्मीचे अशा प्रकारे दान झाले तर ते सर्वात उत्तम !
ती कशा प्रकारे द्यावी? प्रश्नकर्ता : म्हणूनच दानात लक्ष्मीचे सरळ वर्णन नाही.
दादाश्री : हो, लक्ष्मी सरळ देऊही नये. अशा प्रकारे द्या की ज्ञानदानाच्या रुपात अर्थात् पुस्तके छापून द्या किंवा मग खाऊ घालण्यासाठी जेवण तयार करुन द्या. सरळ लक्ष्मी द्यायला कोठेही सांगितलेले नाही.
स्वर्ण दान
आपल्या धर्मात वर्णन आहे की पूर्वी सुवर्णमुद्रेचे दान देत असत, ती सुद्धा लक्ष्मीच म्हटली जाते ना?
दादाश्री : हो, ते सुवर्णमुद्रेचे दान होते ना, ते तर ठराविक लोकानांच दिले जात होते. सर्वानांच दिले जात नव्हते. सुवर्णदान तर अमुक श्रमण ब्राम्हणांना, त्या सर्वांना ज्यांच्या मुलींची लग्ने खोळंबली असतील. आणि दुसरे, संसार चालविण्यासाठी त्यांना देत असत. बाकी इतर सर्वांना सुवर्णदान दिले जात नव्हते. जे व्यवहारात असतील श्रमण असतील त्यांनाच दयायला पाहिजे. श्रमण म्हणजे ते कोणाकडून मागू शकत नव्हते. त्या काळी फार चांगल्या मार्गाने धन खर्च होत असे. हे तर आता ठीक आहे. देवाचे जे मंदिर बनवतात ना, ते सुद्धा ऑनच्या पैश्याने बनवतात. या युगाचा हा परिणाम आहे ना!
ज्ञानीच्या दृष्टीने प्रश्नकर्ता : विद्यादान, धनदान या सगळ्या दानांमध्ये तुमच्या
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
दान
15
दृष्टीने कोणते दान श्रेष्ठ आहे ? कित्येक वेळा मनात दुविधा उत्पन्न होते.
दादाश्री : विद्यादान उत्तम मानले जाते. लक्ष्मी असेल त्याने विद्यादान, ज्ञानदान यासाठी लक्ष्मी दिली पाहिजे. ज्ञानदान म्हणजे पुस्तके छापणे किंवा असे काही करणे. ज्ञानाचा प्रसार कसा व्हावा? त्यासाठीच पैसा खर्च केला पाहिजे. लक्ष्मी असेल त्याने व लक्ष्मी नसेल त्याने अभयदानाचा उपयोग केला पाहिजे. कोणालाही भय वाटू नये त्याप्रमाणे आम्हाला जपून चालले पाहिजे. कोणालाही दुःख वाटू नये, भीती वाटू नये, त्यास अभयदान म्हणतात.
दानाच्या बाबतीत लोक नाव कमवण्यासाठी दान देतात, ते योग्य नाही. नाव कमवण्यासाठीच तर स्मृतीस्तंभ उभारतात ना! स्तंभ तर कुणाचे राहिले नाही, आणि इथे दिलेले सोबत केव्हा येते? विद्या पसरेल, ज्ञान पसरेल असे काही कराल, तर ते आपल्या सोबत येते.
___ उपयोगी पडेल ते पुस्तक कामाचे प्रश्नकर्ता : लाखो धार्मिक पुस्तके छापली जातात पण कोणी वाचत
नाही.
दादाश्री : ते ठीक आहे. तुमची गोष्ट खरी आहे, कोणी वाचत नाही. पुस्तके तशीच्या तशी पडून राहतात सगळी. वाचले जाईल असे पुस्तक असेल तर ते कामाचे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. आता कोणतेही पुस्तक वाचले जात नाही. नुसती धार्मिक पुस्तके छापली जातात. ते महाराज काय म्हणतात, माझ्यानावाने पुस्तक छापा. महाराज स्वतःचे नाव टाकतात. स्वत:च्या दादागुरुचे नाव टाकतात. म्हणजे, हे आमचे आजोबा होते, त्यांच्या आजोबांचे आजोबा व त्यांचे आजोबा... तिथपर्यंत पोहोचतात. लोकांना कीर्ती कमवायची आहे. आणि त्यासाठी धर्माची पुस्तके छापतात. धर्माची पुस्तके अशी असली पाहिजे की, ज्ञान आपल्या उपयोगी व्हावे. अशी पुस्तके असली तर ते लोकांसाठी उपयोगी ठरतात. अशी पुस्तके
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
दान
छापली गेली तर ती कामाची, नाहीतर असेच भटकत राहण्यात काय अर्थ? आणि ते सुद्धा सगळे लोक वाचतही नाही. एकदा वाचून ठेवून देतात. परत काही वाचत नाहीत. अरे, एकदा सुद्धा संपूर्ण वाचत नाही. लोकांना उपयोगी पडेल असे पुस्तक छापले तर आमच्या पैशांचा सदुपयोग होतो आणि ते सुद्धा पुण्य असेल तेव्हाच ना. पैसे चांगले असले तेव्हाच छापू शकतो, नाहीतर छापूही शकत नाही ना! तशा मेळ बसतच नाही ना! पैसे तर येतील आणि जातील. आणि क्रेडीट हे नेहमीच डेबिट झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या इथे कसा नियम आहे ? क्रेडीटच होत राहते की डेबिट पण होते?
प्रश्नकर्ता : दोन्हीकडे आहे. दादाश्री : म्हणजे नेहमी क्रेडीट-डेबिटच होत राहते. प्रश्नकर्ता : तेच झाले पाहिजे.
दादाश्री : पण त्याचे दोन मार्ग आहेत. डेबिट एक तर चांगल्या मार्गाने जाते किंवा गटारीत जाते, पण या पैकी एका मार्गाने तर जातो. अख्ख्या मुंबईचे धन गटारीतच जात आहे. सगळेच धन गटारीत जाते....
मुंबई म्हणजे पुण्यवंतांची जत्रा प्रश्नकर्ता : मोठे-मोठे दान मुंबईतच होतात. लाखो-करोडो रुपये दानात दिले जातात.
दादाश्री : हो, पण ते सर्व दान तर कीर्तीदान आहे. आणि कित्येक चांगल्या वस्तूही आहेत. औषधदान होते, अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे इतरही बरेच काही आहे मुंबईत.
प्रश्नकर्ता : त्या सर्वांना लाभ मिळतो की नाही?
दादाश्री : पुष्कळ लाभ मिळतो. ते तर सोडत नाही ना हा लाभ! पण या मुंबईत केवढे सारे धन आहे ? या करणा मुळेच तर इथे कितीतरी
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
दान
17
इस्पितळे आहेत! या मुंबईचे धन भरपूर, समुद्रा एवढे धन आहे. आणि
जाते.
ते
समुद्रातच
प्रश्नकर्ता : मुंबईतच लक्ष्मी प्राप्त होते, त्याचे कारण काय ?
दादाश्री : मुंबईतच लक्ष्मी प्राप्त होते ? नियमच असा आहे की मुंबईत उच्चाहून उच्च प्रकारची वस्तू खेचली जाते.
प्रश्नकर्ता : ते भूमिचे गुण आहे ?
दादाश्री : भूमिचेच तर आहे. मुंबईत सर्वात उच्च वस्तू खेचल्या जातात. मिरच्याही उत्तम, महान पुरुष, तेही मुंबईतच होतात आणि सर्वात नीच, नालायक माणसे, ते सुद्धा मुंबईतच होतात. मुंबईत दोन्ही क्वॉलिटी असतात. म्हणजे गावात जर हे शोधायला जाल तर मिळणार नाही.
प्रश्नकर्ता : मुंबईत समदृष्टी असलेले लोक आहेत ना ?
दादाश्री : सगळी पुण्यावानांची जत्रा आहे. एका प्रकारे ही पुण्यवानांची जत्राच आहे. आणि सर्व पुण्यवान एकत्र खेचले जातात.
मुंबईचे लोक सर्वकाही निभावून घेतात. ते तसे दुसरे काही करत नाही. आणि स्वत:च्या पायावर दुसऱ्याच्या पायाचा बूट पडला ना, तर प्लीज, प्लीज करतात, मारत नाही, आणि गावात तर मारतात. म्हणून हे मुंबईचे लोक डेवलप ( विकसित ) म्हटले जातात.
धन चालले गटारीत
लोकांचे धन गटारीतच जात आहे ना. चांगल्या मार्गाने तर एखाद्या पुण्यवानाचेच जाते ना! धन गटारीत जाते का ?
प्रश्नकर्ता : जातच आहे ना सगळे ?
दादाश्री : या मुंबईच्या गटारीत तर पुष्कळ धन, ढीगभर धन चालले
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
18
दान
गेले आहे. नुसत्या मोहाचे, मोहाचा बाजारच आहे ना! झपाट्याने धन निघून जाते. धनच खोटे आहे ना, धन पण खरे नाही. खरे धन असले तर ते चांगल्या मार्गाने खर्च होते.
सध्या संपूर्ण जगाचे धन गटारीत जात आहे. या गटारीचे पाईप रुंद केले आहे. ते कशासाठी, तर धन जाण्यासाठी जागा पाहिईजे ना? कमावलेले सर्व धन खाऊन-पिऊन गटारीत वाहून जाते. एक पैसाही खऱ्या मार्गावर जात नाही, आणि जे पैसे खर्च करतात, कॉलेजमध्ये दान दिले, अमके दिले ते सर्व इगोइजम (अहंकार) आहे. इगोइजमशिवाय पैसा दिला जाईल तर तो खरा म्हटला जातो. बाकी हे तर अहंकाराला पोषण मिळत राहते; कीर्ती मिळत राहते. आरामात! पण कीर्ती मिळाल्यानंतर त्याचे फळ मिळते. मग ती कीर्ती जेव्हा उलटते तेव्हा काय होते? अपकीर्ती होते. तेव्हा उपाधीच उपाधी होते. त्याऐवजी कीर्तीची अपेक्षाच ठेवू नये. कीर्तीची अपेक्षा ठेवली तर अपकीर्ती येईल ना? ज्याला कीर्तीची अपेक्षाच नाही त्याला अपकीर्ती येईलच कशी?
चांगल्या मार्गाने खर्च करा पैसे तर संपतातही आणि घटक्याभरात भरुनही निघतात. चांगल्या कामासाठी वाट बघू नये. चांगल्या कामात खर्च करा, नाहीतर गटारीत तर गेलेच आहे लोकांचे धन. मुंबईत करोडो रुपये गटरीत गेले, लोकांचे. घरात खर्च केला पण परक्यांसाठी खर्च केला नाही तो सर्व गटारीत गेला. तर आता पश्चाताप करत आहेत. मी म्हणतो की गटारीत गेले, तेव्हा म्हणतात की, 'होय, असेच झाले.' मग मुर्खा! आधीच सावध रहायला हवे होते ना? आता परत येईल तेव्हा सावध रहा. तेव्हा म्हणतील, 'हो, आता मात्र कच्चा पडणार नाही.' परत तर येणारच आहे ना. धन तर कमी जास्त होत राहील. कधी दोन वर्ष वाईट गेले, तर परत पाच-सात वर्ष चांगले येतील, असे चालतच राहते. पण चांगल्या मार्गाने खर्च केले ते तर कामी येणारच ना? तेवढेच आपले, बाकी सगळे परके.
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
दान
एवढे सारे कमावले, पण कुठे गेले ? गटारीत !! धर्मासाठी दिले ? तेव्हा म्हणाले ते पैसे तर मिळतच नाही, गोळा होताच नाही, तर देऊ कसे ? तेव्हा धन कोठे गेले? हे तर कोण पिकवतो आणि कोण खातो ? जो कमावतो, त्याचे धन नाही. जो खर्च करतो त्याचे धन. म्हणून नवीन ओवरड्राफ्ट पाठवाल तेवढे तुमचे. नाही पाठवले तर तुमचे तुम्ही बघा. दान म्हणजेच पेरुन मग कापा
19
प्रश्नकर्ता : आत्मा आणि दान, यांचा काहीही संबंध नाही, तर मग दान करणे आवश्यक आहे की नाही ?
दादाश्री : दान म्हणजे काय, तर दिलेले घेणे. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे. म्हणून जसे तुम्ही कराल तसा प्रतिध्वनी ऐकायला मिळेल; त्याच्या व्याजासकट मिळेल. म्हणून तुम्ही द्या व घ्या. हे सगळे मागच्या जन्मी दिले, चांगल्या कार्यासाठी पैसे खर्च केले होते, असे जे केले होते त्याचे आम्हाला फळ मिळाले. आणि आता परत तसे केले नाही, तर सगळे धुळीत जाईल. आपण शेतातून चारशे मण गहू तर आणले पण त्यातले पन्नास मण जर पेरायला गेलो नाही तर काय होणार ?
प्रश्नकर्ता : तर उगवणार नाहीत.
दादाश्री : असे आहे हे सर्व, म्हणून द्यावे. त्याचा प्रतिध्वनी उमटेलच, परत येईल अनेक पटीने येईल. मागत्या जन्मी दिले होते म्हणून तर अमेरिकेला आलात, नाहीतर अमेरिकेला येणे सोपे आहे का ? किती पुण्य केलेले असते तेव्हा विमानात बसायला मिळते. कित्येक लोकांनी तर विमान बघितलेले सुद्धा नाही.
लक्ष्मी तिथेच परत येते
पूर्वी तुमचे घर श्रीमंत होते ना ?
प्रश्नकर्ता : असे सगळे पूर्वकर्माचे पुण्य !
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
20
दान
दादाश्री : कितीतरी लोकांना मदत केली असेल तेव्हा लक्ष्मी आमच्याकडे येते, नाहीतर लक्ष्मी येणारच नाही ना ! ज्याला घेण्याचीच इच्छा असेल, त्याच्याकडे लक्ष्मी येत नाही. आली तरी निघून जाते, टिकत नाही. कसेही करुन घेऊच इच्छितो, त्याच्याकडे लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असणाऱ्यांकडेच येते. जो इतरांसाठी झीजतो, ठगला जातो, नोबिलीटी राखतो, तेथे येते. तशी लक्ष्मी निघून गेली असे वाटते पण येऊन परत तेथेच उभी राहते.
बघा, दान देण्याचे चुकू नका
ते तर येईल तेव्हाच दिले जाईल ना. आणि जवळ काही नसेल तेव्हा मनात काय विचार करतो माहित आहे ? जेव्हा माझ्याजवळ येतील तेव्हा देऊनच टाकायचे आहे. आणि आले की लगेच थप्पी एकीकडे ठेवून देतो. मनुष्याचा स्वभाव कसा आहे की असे वाटते. देऊया आता, आता माझ्याकडे दीड लाख आहे. दोन लाख पूर्ण होतील तेव्हा देईन. आणि असे करत करत ते राहून जाते. अशा कामात तर डोळे मिटून देऊन टाकले तेच खरे सोने.
प्रश्नकर्ता : दोन लाख जमा होतील तेव्हा खर्च करु, असे म्हणणारा मनुष्य असे म्हणत म्हणतच निघून गेला तर ?
दादाश्री : तो निघूनही जाईल आणि राहूनही जाईल. राहिला तरी काही होऊ शकत नाही. जीवाचा स्वभावच असा आहे. जेव्हा नसतील तेव्हा म्हणेल, ‘माझ्याकडे येतील तर मला लगेचच द्यायचे आहे. ' आले की लगेचच द्यायचे आहे. आणि जेव्हा येतात तेव्हा ही माया त्याला गोंधळून टाकते.
आता समजा एखाद्या माणसाने साठ हजार रुपये परत नाही केले, तेव्हा म्हणेल, चालेल आता. चला जे काही असेल ते पण माझ्या नशीबात नव्हते. तेथे पैसे सुटतात, पण येथे सुटत नाहीत. मनुष्याचा स्वभावच असा आहे. माया त्याला गुरफटून टाकते. त्यात तर हिम्मत केली तरच दिले
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
दान
21
जातात. म्हणून आम्ही असे म्हणतो की, 'काहीतरी कर' मग त्याला माया गुरफटवत नाही. फुल नाही, तर फुलाची पाकळी! फक्त एका बोटाचा आधार देण्याचीच गरज आहे, आणि तेही आपापल्या क्षमतेनुसार. आजारी माणसालाही असा आधाराचा हात लावण्यास काय हरकत आहे ?
खरा दानवीर
कधीही कमी पडत नाही त्याचे नाव लक्ष्मी. खोऱ्याने उपसून उपसून धर्मासाठी दान देत राहिले, तरीही कमी पडत नाही त्याला लक्ष्मी म्हणतात. हे तर धर्मात दिले तर बारा महिन्यात दोन दिवस दिले असेल, त्यास लक्ष्मी म्हणतच नाही. एक दानवीर शेठ होते. त्यांचे नाव दानवीर कसे पडले ? त्यांच्याकडे पिढ्यांपासून धन दिलेच जात होते. खोऱ्याने उपसूनच देत असत. जो येईल त्याला देत. आज अमका आला की मला मुलीचे लग्न करायचे आहे, तर त्याला दिले. कोणाला दोन हजारांची गरज असेल तर त्याला दिले. साधू-संतासाठी जागा बनवली होती आणि तेथे साधूसंताच्या भोजनाची व्यवस्था केली. अर्थात् जबरदस्त दान चालत असे, म्हणून तर दानवीर म्हणून ओळखले गेले. हे सारे आम्ही पाहिले होते. प्रत्येकाला देत राहत आणि तसे तसे धन वाढत होते.
धनाचा स्वभाव कसा आहे ? एखाद्या चांगल्या ठिकाणी दान दिले तर फारच वाढते, असा धनाचा स्वभाव आहे. आणि जर खिसे कापले तर तुमच्या घरी काहीही उरणार नाही. या सगळ्या व्यापाऱ्यांना गोळा करुन त्यांना आम्ही विचारले की भाऊ ! कसे काय चालले आहे ? बँकेत दोन हजार तर असतील ना ? तेव्हा म्हणतील साहेब वर्षभरात लाख रुपये आले पण हातात काहीही राहिले नाही. म्हणूनच अशी म्हण आहे की चोराची आई कोठीत तोंड घालून रडते. कोठीत काहीच नसते तेव्हा
रडणारच ना!
लक्ष्मीचा प्रवाह दान आहे; आणि जो सच्चा दानी आहे तो साहजिकच एकस्पर्ट(हुशार ) असतो. तो त्या मनुष्याला बघूनच समजून
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
दान
जातो की हा भाऊ जरा असाच आहे. म्हणून तो म्हणेल की भाऊ, मुलीच्या लग्नासाठी नगद पैसे मिळणार नाही, तुला जे कपडेलत्ते हवे असेल, आणखी जे काही हवे असेल ते सर्व घेऊन जा. आणि म्हणेल की मुलीला येथे घेऊन ये. मग मुलीला कपडे-दागिने सगळे देणार. नातेवाईकांना मिठाई आपल्या घरुन पाठवून सगळा व्यवहार सांभाळून घेणार. पण समजून जातात की हा बेशर्म आहे. रोख पैसे हातात देण्या लायक नाही. म्हणजे दान देणारेही फार एक्स्पर्ट असतात.
दान कोणाला द्यावे? तुम्ही गरिबाला पैसे दिले आणि नंतर तपास केला तर कळेल की त्यांच्याजवळ तर पाऊण लाख रुपये असतील. कारण ते लोक गरिबीच्या नावाखाली पैसे गोळा करतात. सगळा व्यापारच चालतो. दान तर कुठे द्यावे? तर जे लोक मागत नाही आणि आतल्या आत दु:खी होत राहतात; आणि दबून दबून चालतात, जे सामान्य लोक आहेत, तेथे द्यायचे आहे. त्या मध्ममवर्गीय लोकांना फार समस्या आहेत.
दान, समजदारीपूर्वक एका माणसाच्या मनात ज्ञान झाले. काय ज्ञान झाले? हे लोक थंडीने मरत असतील. इथे घरातही थंडीत राहवले जात नाही. अरे हिमवर्षा होणार आहे आणि या फुटपाथ वर राहणाऱ्यांचे काय होईल? असे त्याला ज्ञान झाले, हे एका प्रकारचे ज्ञानच म्हणावे ना! ज्ञान झाले आणि त्याचा योग चांगला होता. बँकेत पैसा होता, म्हणून शंभर सव्वाशे कांबळ्या घेऊन आला, हलक्या क्वॉलिटीचे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता जाऊन सगळ्यांना पांघरुण घातले, ते लोक जेथे झोपले होते तेथे जाऊन पांघरुण घातले. पाच-सात दिवसानंतर तो तेथे परत गेला तर कांबळ्याबिम्बळ्या काही दिसत नव्हत्या, कारण सगळ्या नवीन कांबळ्या. विकून पैसे मिळवले त्या लोकांनी!
म्हणून मी म्हणतो की असे देऊच नये. असे दिले जाते का कधी?
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
दान
23
त्यांना तर रविवारच्या बाजारात जुने कांबळे मिळतात ना, ते आणून द्या. मग ते तर कोणी बापही त्यांच्याकडून विकत घेऊ शकत नाही. आपण त्यांच्यासाठी सत्तर रुपयांचे बजेट ठेवले असेल तर सत्तर रुपयांचे एक कांबळे आणण्या ऐवजी, सत्तर रुपयांचे जुने तीन मिळत असतील तर तीन द्यावे. तीन पांघरुन झोपून जा, मग कोणी बापही घेणारा मिळणार नाही.
अर्थात् या काळात दान द्यायचे असेल तर फार समजून उमजून द्यावे. पैसा मूळातच स्वभावाने खोटा आहे. दान देण्यासाठीही फार विचार कराल तेव्हा दान देऊ शकाल, नाहीतर दानही देऊ शकणार नाही. पूर्वी खरा रुपया होता ना, तेव्हा जेथे देऊ तेथे खरे दानच होत असे.
आता नगद रुपया देऊ शकत नाही, पण कुठूनही खाण्याची वस्तू विकत घेऊन वाटावी. मिठाई आणली तर मिठाई वाटावी. मिठाईचे पॅकेट दिले तर ते मिठाईवाल्याला म्हणतील ह्याची अर्धी किंमत देऊन टाक. आता या जगाचे काय करावे ? आपण आरामात चिवडा आहे, कुरमुरे आहेत, सफरचंद आहे, असे सर्व, आणि भजी आणून ती त्यांना तोडून वाटावी. घे भाऊ! त्यात काय हरकत आहे ? आणि हे दही घेऊन जा, भजी अशी तोडून का दिली? असे विचारले तर त्याला शंका येऊ नये म्हणून दही पण सोबत घेऊन जा, म्हणजे तुझ्यासाठी दहीवडे बनतील. अरे! पण काय करावे मग ? असे काहीतरी तर असावे ना ?
याचा तर काही पार येईल असे नाही. हो, आणि मागायला येतील तेव्हा पण द्या. पण नगद देऊ नका; नाहीतर दुरुपयोग होत आहे ह्या सगळ्याचा. आपल्या देशातच हे असे आहे. जगात या इंडियन पझलला (भारतीय कोड्याला) कोणी सोडवू शकत नाही.
हे कसे ? हे काय आहे ? हे कोडे सोडवायला पाठवा की भाऊ, हे आमच्याकडे असे काय आहे ? कांबळ्या दानात दिल्या होत्या त्या कुठे गेल्या ? त्या शोधून काढा. तेव्हा ते म्हणतील की सी.आई.डी ला बोलवा. अरे, हे सी. आई.डी. चे काम नाही. आम्ही तर हे सी. आई.डी. शिवायही पकडून टाकू. ही इंडियन पझल आहे. तुमच्याकडून सोल्व होणार नाही.
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
24
दान
तुमच्या देशात सी.आई.डी.कडून पकडवून आणता. आमच्या देशात लोक काय करतात ते सर्व आम्ही सर्व जाणतो रे बाबा! दुसऱ्या दिवशी जाऊन बघा व्यापाऱ्याकडे.
तेव्हा पैशात बरकत केव्हा येईल? काही नियम असले पाहिजे किंवा नीती असली पाहिजे. साधारण तर असलीच पाहिजे ना? काळ जरा विचित्र आहे, तेव्हा साधारण नीती तर असलीच पाहिजे ना? असेच काही चालते का?
सगळे विकून खातात, तेव्हा पैश्यांसाठी मुलींना देखील विकल्या. इथपर्यंत पोहोचलेत ते शेवटी! अरे, असे करु नये.
दान देतांना नगदी रुपये देऊ नये. त्याला मेन्टेनन्स (व्यवस्थापना) साठी मदत करावी. काम-धंद्यावर चढवावे. हिंसक मनुष्याला रुपये दिले तर तो जास्त हिंसा करेल.
दान, परंतु उपयोगपूर्वक पैसा खर्च होऊन जाईल, अशी जागृती ठेऊच नये. ज्या वेळी जो खर्च होईल ते खरे. म्हणूनच पैसा खर्च करायला सांगितले, जेणे करुन लोभ सुटेल व वारंवार देऊ शकू.
उपयोग तीच जागृती आहे. आम्ही शुभ कार्य करु, दान देऊ, ते दान कसे? तर जागृतीपूर्वकचे की लोकांचे कल्याण होवो. कीर्ती, नाम, आम्हाला प्राप्त होवो त्यासाठी नाही. म्हणून गुप्त रुपाने देत असतो. हे जागृतीपूर्वकचे म्हटले जाईल ना? यालाच उपयोग म्हणतात आणि दुसरे तर, त्यांचे नाव छापले नाही तर दुसऱ्यांदा दान देत नाहीत.
असे आहे, शुभमार्गातही जागृती केव्हा मानली जाईल? या जन्मात व दुसऱ्या जन्मात लाभदायी ठरेल, असे शुभ असेल तेव्हा ती जागृती म्हणवते. नाहीतर, तो दान करत असेल, सेवा करत असेल पण त्याला पुढची जागृती आजिबात राहत नसते. जागृतीपूर्वक सगळ्या क्रिया केल्या
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
दान
तर पुढच्या जन्माचे हित होईल, नाहीतर सर्व झोपेत जाईल. हे जे दान दिले ते सगळे झोपेत गेले. जागृत अवस्थेत चार आणे जरी गेले तरी फार झाले. दान दिले व आतून इथल्या कीर्तीची इच्छा असेल, तर सगळे झोपेत गेले समजावे. पुढच्या जन्माच्या हितासाठी जे दान इथे दिले जाते तो जागृत म्हटला जातो. हिताहीतचे भान म्हणजे स्वतःचे हित कशात आहे व स्वत:चे अहित कशात आहे त्याप्रमाणे जागृती असणे ते! पुढच्या जन्माचा काही ठिकाणा नसेल आणि इथे दान देत असेल त्याला जागृत कसे म्हणावे?
असे अंतराय पडतात हा भाऊ कोणाला दान देत असेल, तेथे कोणी बुद्धीवान म्हणेल की, अरे, याला का देताय? तेव्हा तो भाऊ म्हणेल, 'आता देऊ द्या ना, गरीब आहे.' असे म्हणून दान देतो आणि तो गरीब घेतो. पण तो बुद्धिवान जो बोलला त्यामुळे त्याने अंतराय टाकला. म्हणून मग त्याला त्याच्या दुःखातही कोणी दाता भेटणार नाही. जिथे स्वतः अंतराय टाकतो, त्याच जागेवर तो अंतराय काम करतो.
प्रश्नकर्ता : वाणीने अंतराय टाकले नसेल, पण मनाने अंतराय टाकले असतील तर?
दादाश्री : मनाने टाकलेल्या अंतरायाचा जास्त परिणाम होतो. ते तर दुसऱ्या जन्मात परिणाम करतात. आणि हे वाणीने बोललेल्याचा परिणाम या जन्मात होतो. वाणी निघाली की नगदी झाले, कॅश झाले. म्हणून मग फळ सुद्धा नगद येते आणि मनाने जे चित्रण केले ते तर पुढच्या जन्मी रुपक होऊन येणारच.
आणि असे दूर होतात अंतराय प्रश्नकर्ता : अर्थात् अशी जागृती ठेवावी की थोडासा पण उलटसुलट विचार करु नये.
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
26
दान
दादाश्री : असे होणे शक्य नाही. असे विचार आल्याशिवाय राहणारच नाही. त्यांना आपण मिटवून टाकू, तेच आपले काम. असे विचार येऊ नये असे आपण ठरवले, तो निश्चय मानला जातो. परंतु विचारच येणार नाही, असे तेथे चालत नाही. विचार तर येतील पण बंध पडण्यापूर्वी त्यांना मिटवून टाकावे. तुम्हाला विचार आला की ‘याला दान द्यायचे नाही.' परंतु तुम्हाला ज्ञान दिले आहे तेव्हा तुम्हाला जागृती येईल की मी मध्ये अंतराय का टाकले ? मग त्याला तुम्ही असे मिटवून टाकता. पत्र पोस्टात टाकण्यापूर्वी त्याला मिटवून टाकले तर हरकत नाही ना! पण ते तर ज्ञानाशिवाय कोणी मिटवत नाही ना, अज्ञानी तर मिटवतच नाही ना ? उलट आपण त्याला असे विचारले की असा उलट विचार का केला? त्यावर तो, म्हणेल की असे तर करायलाच हवे होते, यात तुम्हाला समजणार नाही. अशा प्रकारे त्याला उलट दुप्पट करुन जाड करतो. अहंकार असा वेडेपणाच करतो, नुकसान करतो, त्याचेच नाव अहंकार. स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारतो, त्याचे नाव अहंकार.
आता तर आपण पश्चाताप करुन सगळे मिटवू शकतो आणि मनात निश्चय करावा की असे बोलू नये. आणि हे जे बोललो 'त्या बद्दल क्षमा मागतो' तर सर्व मिटून जाईल. कारण हे पत्र अजून पोस्टात गेलेले नाही. त्या अगोदरच आपण परिवर्तन करुन टाकावे की पूर्वी आम्ही मनात जो विचार केला होता की दान नाही दिले पाहिजे तो विचार खोटा आहे, पण आता आम्ही विचार करतो की ' हे दान करणे चांगले आहे.' म्हणून पूर्वीचे तुमचे मिटून जाईल.
दान करणे, लोकांवर उपकार करणे, ओब्लाईजिंग नेचर ठेवणे, लोकांची सेवा करणे, या सर्वाला रिलेटीव धर्म म्हटले आहे. त्यात पुण्य बांधले जाते. आणि शिव्या दिल्याने, मारामारी करण्याने, लुटण्याने पाप बांधले जाते. पुण्य आणि पाप जेथे आहेत तेथे रियल धर्म नाहीच. पापपुण्यरहित धर्म हे रियल धर्म आहे.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
दान
27
पाचवा हिस्सा परक्यांसाठी प्रश्नकर्ता : पुढच्या जन्माच्या पुण्याच्या उपार्जनासाठी या जन्मात काय करावे?
दादाश्री : या जन्मात जो पैसा येईल त्याचा पाचवा हिस्सा देवळात देवाजवळ देऊन टाकावे किंवा लोकांच्या सुखासाठी खर्च करावा. त्यामुळे तेवढा तरी ओव्हरड्राफ्ट तेथे पोहोचला! हे मागच्या जन्माचे ओवरड्राफ्टच तर उपभोगत आहात. या जन्माचे जे पुण्य आहे, ते पुढे येईल नंतर. आताची कमाई पुढे चालेल.
रिवाज, देवासाठीच धर्मात दान या मारवाडी लोकांकडे जातो तेव्हा त्यांना विचारतो की, 'व्यापार कसा चालत आहे ?' तेव्हा म्हणेल, 'धंदा तर चांगला चालला आहे.' 'मग फायदा वगैरे?' तेव्हा म्हणेल, 'दोन-चार लाख तरी आहे.''देवाकडे दान देता?' 'वीस पंचवीस टक्के देत असतो तेथे, दरवर्षी.' त्यांचे काय म्हणणे की शेतात पेराल तर दाणे निघतील ना? पेरल्याशिवाय दाणे घ्यायला कसे जाऊ? पेरलेच नाही, तर? या मारवड्याकडे हीच पद्धत आहे की देवाच्या कामासाठी द्यायचे. ज्ञानदानासाठी, देवासाठी, अशा सर्व ठिकाणी दान द्यायचे पण इतर ठिकाणी नाही, हायस्कूलमध्ये किंवा ह्याला, त्याला, ते नाही. बस हेच एक.
देवळात की गरिबांना प्रश्नकर्ता : आम्ही देवळात गेलो होतो ना, तर तेथे लोक करोडो रुपये दगडामागे खर्च करतात. आणि देव तर म्हणतात की हे जिवंत अंतर्यामी जे प्रत्येक जीव मात्रात विराजमान आहे. तर जिवंत लोकांना धमकावतात, त्यांना छळतात आणि येथे दगडच्या मूर्तीमागे करोडो रुपये खर्च करतात, असे का?
दादाश्री : हो, लोकांना छळतात बिचाऱ्यांना! क्रोध-मान-मायालोभाच्या निर्बळतेमुळे त्यांना सतावतात ना!
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
दान
असे आहे, हे जे पैसे कमवायला निघतात ना, जरी चांगल्या प्रकारे घर चालत असले तरी पैसे कमवायला निघतात. तेव्हा आपल्याला हे नाही का समजत की हे स्वतःच्या कोटा व्यतिरिक्त जास्त कोटा मिळवण्यासाठी फिरत आहेत. जगात तर सर्वांचा कोटा समान आहे. पण हा लोभी आहे जो जास्तीचा कोटा घेऊन जातो. म्हणूनच त्या काही लोकांच्या वाट्याला येतच नाही. आणि ते सुद्धा असेच थापा मारुन मिळत नाही, तर ते पुण्यानेच मिळते.
तेव्हा पुण्य जास्त केले, म्हणून आता आमच्याकडे धन आले, आणि ते धन परत आपण खर्च करुन टाकतो. आम्हाला वाटते की हे तर जमा होत राहिले आहे. खर्च केले तर डिडक्शन (कमी) होऊ शकेल ना? पुण्य जमा तर होऊनच जाते, पण ते डिडक्शन करण्याची रीत तर जाणून घेतली पाहिजे ना?
अर्थात् लोक मंदिर वगैरे बनवतात, बरोबर करतात. त्यांना चावी हवी. त्यांना दर्शन थोडीच करायचे आहे. ते जेथे दर्शन करायला जातात, तेथे त्यांना लाज वाटू नये असे त्यांना पाहिजे. जिवंत माणसांसमोर त्यांना लाज वाटते पण मूर्तीच्या समोर तर तुम्ही म्हणाल तसे तो नाचेल सुद्धा! नाचत राहतो एकटाच! पण जीवंतांसमोर त्याला लाज वाटते. या मूर्त्या जीवंत नाहीत ना. आणि जीवंतांसमोर काही होऊ शकत नाही. आणि जीवंतांसमोर जर केले तर त्याचे कल्याणच होऊन जाईल, परमकल्याण होईल, आत्यंतिक कल्याण होईल. पण अशी शक्ति नसते ना! असे पुण्यही नसते!
देवाजवळ जे ठेवाल ना, ते सगळे निष्काम नाही, सकाम आहे. हे देवा, मुलाच्या घरी मुलगा व्हावा! माझा मुलगा पास व्हावा. घरी म्हातारा बाप आहे त्याला पक्षाघात झाला आहे, तो बरा व्हावा, त्यासाठी दोनशे एक ठेवतो. पण आता येथे तर कोण ठेवणार? आमचा असा कोणता कारखाना आहे का? आणि इथे घेणारही कोण आहे की तो ठेवेल?
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
दान
29
ती पण हिंसाच
प्रश्नकर्ता : व्यापारी नफा जास्त करतात, एखादा उद्योगपती किंवा व्यापारी मेहनतीच्या तुलनेने कमी मजुरी देतात किंवा विना मेहनतीची जी काही कमाई होत असेल, तर ती हिंसाखोरी म्हटली जाते का?
दादाश्री : ती सर्व हिंसाखोरीच आहे.
प्रश्नकर्ता : आता जर का तो फुकटची कमाई करेल आणि धन धर्मासाठी खर्च करेल तर ती कोणत्या प्रकारची हिंसा म्हटली जाते?
दादाश्री : जितका पैसा धर्मकार्यासाठी खर्च केला, जितका त्याग केला, तितका कमी दोष लागतो. जितके पैसे तो कमवतो, समजा लाख रुपये कमवले व त्यातील ऐंशी हजाराचा दवाखाना बनवला तर तितक्या रुपयांची जबाबदारी त्याला राहिली नाही. वीस हजाराचीच जबाबदारी राहिली. म्हणजे ते चांगले आहे, चुकीचे नाही.
प्रश्नकर्ता : लोक लक्ष्मी जमा करुन ठेवतात, ती हिंसा म्हटली जाईल की नाही?
दादाश्री : हिंसाच झाली ती. जमा करुन ठेवणे ती हिंसा आहे. दुसऱ्यांच्या कामी लागत नाही ना!
जसे येतात तसे जातात हे तर देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर सगळे चालत आहे.
प्रश्नकर्ता : दान करणारा मनुष्य तर असे मानतो की मी तर श्रद्धेने दिले आहे. पण ज्याला खर्च करायचे आहे तो कसे खर्च करतो, ते आम्हाला कसे कळेल?
दादाश्री : पण हे तर आमचे पैसे खोटे असतील तर चुकीच्या मार्गाने जातील. जितके धन खोटे तितके वाईट मार्गाने जाते आणि धन जितके चांगले असेल तितके चांगल्या मार्गाने जाते.
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
30
दान
ऐरणची चोरी, सुई चे दान
प्रश्नकर्ता : बरेच जण असे म्हणतात की दान केले तर देवता बनतो, ते खरे आहे काय ?
दादाश्री : दान केले, तरी नरकात जातील, असे पण लोक आहे. कारण ते दान कोणाच्या तरी दबावात येऊन करतात. असे आहे की आता या दुषमकाळात लोकांजवळ दान देऊ शकू अशी लक्ष्मीच नसते. दुषम काळातील जी लक्ष्मी आहे ती तर अघोर कर्तव्याची लक्ष्मी आहे. म्हणून जर त्याचे दान दिले तर उलट नुकसान होते. तरीपण जर आपण कोणी दु:खी मनुष्याला दिले, दान देण्याऐवजी त्याची समस्या दूर करण्यासाठी काही केले तर चांगले आहे. दान तर नाव कमवण्यासाठी करतात, त्याला काय अर्थ ? उपाशी असेल तर खायला द्या, कपडे नसतील तर कपडे द्या. बाकी या काळात दान देण्यासाठी रुपये कुठून आणावे ? तिथे सगळ्यात चांगले तर दान-बीन देण्याची गरज नाही. स्वत:चे विचार चांगले करा. दान देण्यासाठी धन कुठून आणावे ? खरे धन आलेच नाही ना! आणि खरे धन सरप्लस राहतच (उरतच) नाही. हे जे मोठे मोठे दान देतात ना, ते सर्व खात्या बाहेरचे, वरचे धन आले आहे, ते आहे. तरीपण जे दान देतात त्यांच्यासाठी चुकीचे नाही. कारण वाईट मर्गाने मिळवले व चांगल्या मार्गाने दिले, तरी पण मधेच पापापासून मुक्त तर झाले ! शेतात बी पेरले गेले, म्हणून उगवले आणि तेवढे तरी फळ मिळाले.
प्रश्नकर्ता : भक्तिपदांमध्ये एक ओळ आहे ना, की दाणचोरी करणारे सुईदानाने सुटू इच्छितात. तर तेथे एके ठिकाणी दाणचोरी (चुकीच्या मार्गाने खूप सारे धन कमावणे, तस्करी) केली आणि दुसऱ्या ठिकाणी दान केले, तर त्याने तेवढे तरी प्राप्त केले ना ? असे म्हणू शकतो ?
दादाश्री : नाही, प्राप्त झाले असे नाही म्हणवत. ती तर नरकात जाण्याची निशाणी म्हटली जाईल. तो तर नियत चोर आहे. दाणचोराने
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
दान
31
( तस्कराने ) चोरी केली आणि सुईचे दान दिले. त्या ऐवजी दान नाही दिले पण सरळ राहिला तरी बरे. असे आहे ना, की सहा महिन्याची जेलची शिक्षा बरी, मध्ये दोन दिवस बागेत घेऊन जातील, त्याचा काय अर्थ ?
हे तर काय सांगू इच्छिता की हा सगळा काळा बाजार, तस्करी वगैरे केली आणि नंतर पन्नास हजार दान दिले, जेणे करुन स्वतःचे नाव खराब दिसू नये, स्वतः चे काम बिघडू नये, म्हणून दान देतात, यालाच सुईचे दान म्हणतात.
प्रश्नकर्ता : म्हणजे असे सात्विक तर आता नाहीत ना ?
दादाश्री : असे संपूर्ण सात्विकतेची आशा तर ठेवूच शकत नाही ना! पण हे तर कोणासाठी आहे, की जे मोठे लोक करोडो कमवतात आणि एकीकडे लाख रुपयांचे दान देतात. ते कशासाठी ? तर स्वत:चे नाव खराब होऊ नये. या काळातच असे सुईचे दान चालते. हे खूप समजण्यासारखे आहे. दुसरे लोक दान देतात, त्यातील काही सदगृहस्थही असतात. साधारण परिस्थितीचे असतात. ते लोक दान देतात त्यात हरकत नाही. हे तर सुईचे दान देऊन स्वतःचे नाव बिघडू देत नाही. आपले नाव झाकण्यासाठी कपडे बदलून टाकतात! फक्त दिखाव्यासाठी असे दान देतात !
आता तर धनदान देतात की घेतात? आणि दान जे देतात ते तर 'मिसा'चे (तस्करीचे).
ते धन पुण्य बांधते
प्रश्नकर्ता: दोन नंबरच्या पैशांचे दान दिले, तर ते नाही चालणार?
दादाश्री : दोन नंबरचे दान चालणार नाही. पण तरीही कोणी मनुष्य उपाशी मरत असेल आणि त्याला दोन नंबरचे दान दिले तर त्याला खाण्यासाठी तर चालेल ना ? दोन नंबरच्या पैशात थोड्याश्या कायदेशीर
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
दान
अडचणी येतात. पण दुसरी कुठली हरकत नाही. ते धन आपण जर हॉटेलवाल्याला दिले तर तो घेणार की नाही?
प्रश्नकर्ता : घेणार. दादाश्री : हो, तो व्यवहार सुरुच होतो.
प्रश्नकर्ता : हल्लीच्या काळात धर्मात दोन नंबरचा पैसा आहे, तो खर्च होतो, तर त्याने पुण्य प्राप्त होते काय?
दादाश्री : नक्कीच होते ना, त्याने तेवढा त्याग केला ना! स्वतः जवळ आलेल्या पैशांचा त्याग केला ना! पण त्यात मग हेतूनुसार पुण्य बांधले जाते. हेतू असेल त्यानुसार. पैसे दिले, ती एकच गोष्ट बघितली जात नाही. पैशांचा त्याग केला हे निर्विवाद आहे. बाकी पैसा कुठून आला? हेतू काय आहे? हे सर्व वजा-बेरीज होत-होत जे बाकी राहते ते त्याचे. त्यांचा हेतू काय, तर सरकार घेऊन जाईल त्यापेक्षा येथेच देऊन टाका ना!
निरपेक्ष लुटवा प्रश्नकर्ता : ऑन चे पैसे भले खर्च होत असतील, पण तरी धर्माची ध्वजा लागतेच की धर्माच्या नावावर खर्च केले.
दादाश्री : हो पण धर्माच्या नावावर खर्च केले तर चांगले आहे. पण ऑनच्या नावाने करतात. कारण ऑन हा मोठा गुन्हा नाही. 'ऑन' म्हणजे काय की सरकारी टॅक्स जो आहे, तो लोकांना जड जातो, की तुम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आकाराताय म्हणून हे लोक लपवतात.
प्रश्नकर्ता : काहीतरी प्राप्त करण्याच्या अपेक्षेने जे दान करत, त्याची पण शास्त्रात मनाई नाही. त्याची निंदा केलेली नाही..
दादाश्री : अशी अपेक्षा ठेवली नाही तर उत्तम आहे, अपेक्षा ठेवली तर ते दान निर्मूल झाले, सत्वहीन झालेले म्हटले जाते. पाचच रुपये द्या पण अपेक्षेरहीत द्या.
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
दान
33
ते आहे केमोफ्लेज सारखे प्रश्नकर्ता : दोन नंबरचा जो पैसा आहे, तो जेथे जाईल तेथे गडबड होते की नाही?
दादाश्री : पूर्ण मदत नाही करत, आमच्या येथे पण येतात, पण ते किती असतात? दहा ते पंधरा टक्के, पण जास्त येत नाहीत.
प्रश्नकर्ता : धर्मात मदत करत नाही का? जिथे जाईल तिथे मदत नाही होत तेवढी?
दादाश्री : मदत करत नाही. तसे दिसतांना मदत केलेली दिसते, पण नंतर अस्त व्हायला वेळ लागत नाही. हे सगळे वॉर क्वॉलिटीचे स्ट्रक्चर. वॉर क्वॉलिटीचे स्ट्रक्चर बांधले सगळे! आपण पाहिले ना! हे सर्व केमोफ्लेज (सोंग) आहे. केमोफ्लेज पाहून मनात काय खुश व्हावे?
श्रेष्ठी-शेट्टी-सेठ-शठ पूर्वीच्या काळात, त्यावेळी दानवीर असत. दानवीर तर मन-वचनकायेची एकता असेल तरच जन्माला येतात, आणि त्यांना भगवंतांनी श्रेष्ठी म्हटले होते. त्या श्रेष्ठींना आता मद्रासमध्ये शेट्टी म्हणतात. अपभ्रंश होतहोत श्रेष्ठी चे शेट्टी झाले तेथे. आणि तेच आपल्या येथे अपभ्रंश होत होत 'शेठ' झाले आहे.
एका मिलच्या सेठजीकडे मी त्यांच्या सेक्रेटरीशी बोलत होतो, मी विचारले, शेठ कधी येणार? दुसऱ्या गावी गेले का ते? तो म्हणाला चारपाच दिवस लागतील. नंतर मला म्हणाला, जरा माझी गोष्ट ऐका, मी म्हणालो 'हो भाऊ.' तर तो म्हणाला वरची मात्रा काढून टाकण्यासारखे आहे. मी त्याला समजावले की, 'आता तू पगार खातोस, तोपर्यंत बोलू नकोस.' बाकी मात्रा काढली तर शेष काय उरले?
प्रश्नकर्ता : 'शठ' उरले.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
34
दान
दादाश्री : पण तरी आपण असे बोलू नये, अशी दैना झाली आहे. कसे जगडुशा वगैरे सगळे शेठ झाले होते. ते सर्व शेठ म्हणवत होते. जसा भाव, तसे फळ
कित्येकांना दान द्यायचे नसते, त्यांच्या मनात नसते पण ते वाणीने म्हणतात की मला द्यायचे आहे, आणि वर्तनात ही तसे ठेवतात आणि देतातही. परंतु मनात द्यायचे नसल्यामुळे फळ मिळत नाही.
प्रश्नकर्ता: दादाजी, असे का होते ?
दादाश्री : एक मनुष्य मनाने देतो, कारण त्याच्याकडे तेवढी सोय नाही आणि वाणीने तो असे बोलतो की मला द्यायचे आहे पण मी देऊ शकत नाही. त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मी मिळते, कारण ते दिल्यासारखेच आहे. देवाने स्वीकार केला. अर्धा लाभ तर झालाच.
देवळात जाऊन एका मनुष्याने एकच रुपया ठेवला दुसऱ्या एका शेठने एक हजार रुपये दानात दिले, ते पाहून तुमच्या मनात आले की अरे, माझ्याजवळ असते तर मी पण दिले असते. ते तुमचे तेथे जमा होतात. तुमच्याजवळ नाहीत, म्हणून तुमच्याकडून दिले जात नाही. येथे तर दिले त्याची किंमत नाही, भावनेची किंमत आहे. वीतरागांचे विज्ञान आहे.
आणि जो देणारा आहे, त्याचे केव्हा कितीतरी पट होईल. पण ते कसे? तर जेव्हा मनापासून द्यायचे आहे, वाणीने द्यायचे आहे, वर्तनाने द्यायचे आहे, असे असेल तर त्याचे फळ तर या जगात काय नसेल ते विचारा. आता तर सगळे म्हणतील, त्या अमक्यामुळे मला द्यावे लागले, नाहीतर मी दिले नसते. त्या साहेबाने दबाव घातला म्हणून मला द्यावे लागले. म्हणून मग तेथे तुमचे जमाही तसेच होते बरं का? ते तर आपण मनापासून, राजीखुशीने दिलेले कामी येते. असे करतात का लोक ? असे कुणाच्या दबावामुळे देतात ?
प्रश्नकर्ता : हो, हो !
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
दान
35
दादाश्री : अरे कित्येक तर आपला रुबाब जमवण्यासाठी देतात. नाव, स्वतःची अब्रु वाढविण्यासाठी देतात. मनात तर असे असते, की जाऊ द्या ना! देण्यासारखे तर नाही, पण आमचे वाईट दिसेल, तेव्हा मग तसे फळ मिळते. हे सर्व जसे चित्रित करतात तसे फळ मिळते. आणि एखाद्या मनुष्याजवळ पैसे नसतील पण तरी 'माझ्याजवळ असते तर मी दिले असते.' असे म्हणेल, त्याला कसे फळ मिळते?
स्थूळ कर्म-सूक्ष्म कर्म एका शेठने पन्नास हजार रुपयांचे दान दिले. त्यावर त्याच्या मित्राने त्यांना विचारले, इतके सारे रुपये दिले? तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसा पण देणाऱ्या पैकी नाही.' हे तर मेयरच्या दबावामुळे मला द्यावे लागले; आता याचे फळ येथे काय मिळेल? पन्नास हजारांचे दान केले ते स्थूळ कर्म, तर त्याचे फळ शेठजीला इथल्या इथेच मिळेल, लोक वाह-वाह करतील, कीर्ति गातील, आणि शेठजीने आत सूक्ष्म कर्ममध्ये काय चार्ज केले? तेव्हा म्हणे एक पैसा पण देणाऱ्या पैकी नाही मी त्याचे फळ पुढच्या जन्मी मिळेल, म्हणून मग पुढच्या जन्मी शेठ एक पैसा सुद्धा दान देऊ शकणार नाही. आता अशी बारीक गोष्ट कोणाच्या लक्षात येईल?
मग तेथेच दुसरा एखादा गरीब राहत असेल, त्याच्याकडे सुद्धा हेच लोक दान घेण्यासाठी गेले. तेव्हा तो गरीब मनुष्य काय सांगतो की, 'माझ्याकडे तर आता पाचच रुपये आहेत. हे सगळेच घ्या. पण माझ्याकडे जर आता पाच लाख असते तर मी ते सगळेच्या सगळे तुम्हाला दिले असते,' असे तो मनापासून म्हणतो. आता त्याने पाचच रुपये दिले, ते डिस्चार्जमध्ये कर्मफळ आले. पण आत सूक्ष्ममध्ये काय चार्ज केले? पाच लाख रुपये देण्याचे. म्हणून पुढच्या जन्मी तो पाच लाख देऊ शकेल, डिस्चार्ज होईल तेव्हा.
एक मनुष्य नेहमी दान करत असतो, धर्माची भक्ति करत असतो, मंदिरात पैसे देत असतो, दिवसभर असे सर्व धर्म करत असेल, त्याला
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
36
दान
जग काय म्हणेल की हा धर्मिष्ठ आहे. आता त्या माणसाच्या मनात काय असते की पैसे कसे गोळा करु? आणि कसे ते उपभोगू ? मनातुन तर त्याला बिनहक्काची लक्ष्मी हडप करण्याची फार इच्छा होत असते. बिनहक्काचे विषय भोगण्यासही तो तयार असतो. म्हणून भगवंत त्याचा एक पैसाही जमा करत नाहीत. त्याचे काय कारण? कारण हेच की ते सगळे स्थूळ कर्म आहे. आणि त्या स्थूळ कर्माचे फळ इथल्या इथेच मिळते. लोक या स्थूळ कर्मालाच पुढच्या जन्माचे कर्म मानतात. पण त्याचे फळ तर इथल्या इथेच मिळून जाते. आणि सूक्ष्म कर्म जे आतल्या आत बांधले जात आहे, ज्याची लोकांना जाणीवच नाही. त्याचे फळ पुढच्या जन्मी मिळते.
आज एखाद्या माणसाने चोरी केली, ती चोरी स्थूळ कर्म आहे. त्याचे फळ या जन्मातच मिळते. पुलिसवाला मारतो. हे सगळे फळ त्याला इथल्या इथे मिळणारच आहेत.
लक्ष्मीसाठी चार्जिंग
प्रश्नकर्ता : सगळेच लक्ष्मीच्या मागे खूप घावतात. म्हणून त्याचा 'चार्ज' (कर्म बंध) जास्त प्रमाणात होत असेल ना ? त्यामुळे पुढच्या जन्मी त्याला जास्त लक्ष्मी मिळाली पाहिजे ना ?
दादाश्री : आम्हाला लक्ष्मी धर्माच्या मार्गावर खर्च करायची आहे, असे जर चार्ज केलेले असेल तर जास्त लक्ष्मी मिळेल.
प्रश्नकर्ता : पण मनात असे भाव करत राहिले की मला लक्ष्मी मिळो, असे भाव केले, असे 'चार्ज' केले त्यामुळे त्याला निसर्ग लक्ष्मी नाही का देणार ?
दादाश्री : नाही, नाही, त्यामुळे लक्ष्मी मिळत नाही. लक्ष्मी मिळण्याचे जो भाव करतो ना, त्याला तर लक्ष्मी मिळायची असेल तरी मिळणार नाही, उलट त्यात अंतराय पडतील. लक्ष्मी आठवत राहिल्याने मिळत नाही. ती तर पुण्य केल्यानेच मिळते.
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
दान
37
'चार्ज' म्हणजे पुण्याचे चार्ज केले, तर लक्ष्मी मिळते. ती सुद्धा फक्त लक्ष्मी मिळत नाही. पण पुण्य चार्ज करताना जी इच्छा असेल की, मला लक्ष्मीची खूप आवश्यकता आहे, तर त्याला लक्ष्मी मिळेल. कोणी म्हणेल मला तर फक्त धर्मच हवा आहे, तर फक्त धर्मच प्राप्त होईल, आणि पैसे नसतीलही. अर्थात् त्या पुण्याचे आपण टेन्डर भरलेले असते की मला असे पाहिजे. मग ते मिळण्यासाठी पुण्य खर्च होते. कोणी म्हणेल 'मला बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे,' तर पुण्य त्यातच खर्च होईल, धर्मात काही उरणार नाही. आणि कोणी म्हणेल 'मला धर्मच पाहिजे, मोटारी नको, मला तर एवढ्याशा दोन खोल्या असतील तरीही चालेल, पण धर्मच अधिक हवा.' तेव्हा त्याला धर्म अधिक मिळतो. आणि दूसरे सगळे कमी मिळते. म्हणजे तो पुण्याच्या स्वतःच्या इच्छेनुसर टेन्डर भरतो.
अशी नियत ? तेथे दान व्यर्थ
तेव्हा हे वीतराग विज्ञान तुम्हाला किती मुक्त करेल असे सुंदर आहे. विचार केल्यावर असे नाही का वाटत ? किती सुंदर आहे! हे जर तुम्हाला समजले तर, 'ज्ञानी पुरुषांकडून ' समजून घेतले आणि स्वतः : ची बुद्धि सम्यक् करुन घेतली तर काम चालेल असे आहे. व्यवहारातही लोकांनी माझ्याकडून स्वतःची बुद्धि सम्यक् करुन घ्यावी, भलेही ज्ञान घेतले नसेल, तरी माझ्यासोबत थोडावेळ बसलात तर बुद्धि सम्यक् होते. त्यामुळे मग त्याचे काम पुढे चालते ! हे ज्ञान नसेल तर काय दैना होईल ? असे जर लोक समजतील तर ते कामाचे.
प्रश्नकर्ता : ज्ञान घेतल्याशिवाय तर याचा पारच येणार नाही असे
आहे.
दादाश्री : हो पारच येणार नाही असे आहे. त्या बाबत तर बोलण्यासारखेच नाही. तो पन्नास हजाराचे दान देतो, पण तरी तुम्हाला परत काय सांगतो, ‘या शेठचा आग्रह आहे म्हणून देत आहे, नाहीतर
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
38
दिलेच नसते.' म्हणजे हे फक्त त्यालाच माहीत आहे इतकेच नाही, तर तो तुम्हालाही सांगतो. नंतर दुसऱ्यांनाही सांगतो की मी तर असा हुशार आहे. हे असे सर्व बघताय ना बाहेर ? व्यर्थ, धुळीत गेले. म्हणून ह्या सत्संगामध्ये पडून राहिले त्यांचे काम झाले ना? संपूर्ण जगाची झंझटच गेली ना ?
दान सुद्धा गुप्त रुपाने
प्रश्नकर्ता : आत्मार्थीकरीता तर कीर्ति अवस्तू
दान
आहे ना ?
आत्म्याच्या
दादाश्री : कीर्ति तर फार नुकसानदायक वस्तू आहे. मार्गावर तर त्याची कीर्ति फार पसरते, पण त्या कीर्तित त्याला इन्टरेस्ट नसतो. कीर्ति तर पसरेलच ना. चकाकणारा हिरा असेल तर त्याला बघून प्रत्येक जण म्हणेल ना की, 'किती चांगला प्रकाश येतोय, किरणे कशी छान निघत आहे !' लोक म्हणतात नक्कीच पण त्याला स्वतःला त्यात खुशी वाटत नाही. जेव्हाकी ही सांसारिक संबधाची जी कीर्ति आहे, त्या कीर्तिचेच भिकारी आहे. कीर्तिची भिक आहे म्हणून तर हाईस्कूलमध्ये लाक रुपये देतो, इस्पितळात देतो, पण त्याला कीर्ति मिळाली म्हणजे फार झाले !
मग ते देखिल व्यवहारात असे म्हणतात की दान गुप्त ठेवा. असे गुप्त रुपाने क्वाचितच कोणी देईल, बाकी सगळ्यांना कीर्तिची भूक आहे म्हणून देतात. लोक सुद्धा कौतुक करतात की बुवा ! या शेठचे काय संगावे, अहोहो, लाख रुपयांचे दान दिले! त्याचा बदला त्याला इथल्या इथेच मिळाला.
अर्थात् दिल्यानंतर त्याचा मोबदला इथल्या इथेच घेऊन टाकला. अणि ज्याने गुप्त ठेवले, त्याने मोबदला घेण्याचे पुढच्या जन्मावर सोडले. मोबदला मिळाल्याशिवाय तर रहातच नाही. तुम्ही घ्या की घेऊ नका पण त्याचा मोबदला (ठरलेला) असतोच.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
दान
आपपल्या इच्छेनुसार दान द्यायचे असते. हे तर सगळे ठीक आहे, व्यवहार आहे. कोणी आग्रह करेल की आपल्याला द्यावेच लागतील. मग फुलहार घालतात म्हणून देतात ते.
दान गुप्त असावे. जसे हे मारवाडी लोक देवाजवळ चुपचाप पेटीत टाकतात ना! कोणालाही कळले नाही, तर ते उगवते.
तो व्यवहार चांगला म्हणवतो प्रश्नकर्ता : हिराबाच्या बाबतीत आपण त्यांच्या मागे (त्यांच्या मृत्युनंतर) जो खर्च तेला, तो व्यवहारात कसा समजला जातो?
दादाश्री : या संसार व्यवहारात तो चांगला मानला जातो. प्रश्नकर्ता : आम्हाला संसार व्यवहारातच राहायचे.
दादाश्री : या संसार व्यवहारात हे बरोबर पण त्यात हे चांगले दिसते. आणि ते चांगले दिसावे म्हणून मी केले नाही. ही तर हिराबाची इच्छा होती म्हणून मी केले, मला बरे-वाईटाची काही पर्वा नसते, पण तरीही वाईट दिसू नये असे मी वागतो.
प्रश्नकर्ता : ही तर तुमची गोष्ट झाली पण आमच्यासाठी काय?
दादाश्री : तुम्हाला थोडे फार करावे लागते, फार खेचण्याची गरज नाही, साधारण व्यवहार करावा लागेल.
वाह-वाहमध्ये पुण्य खर्च होते प्रश्नकर्ता : हे तुम्ही म्हणता तसे नियम असेल, तर तुम्ही जे हिराबांमागे (दादाश्रींच्या पत्नी) जे खर्च केले त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल?
दादाश्री : मला काय मिळेल? मला काही घेणे-देणेच नाही ना! यात पुण्य बांधले जात नाही, यात तर पुण्य खर्च होते. वाह-वाह केली जाते.
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
40
दान
किंवा जर कोणी खराब केले तर 'बघाना, मेल्याने सारे काम बिघडवले' असे म्हणतील. अर्थात् इथल्या इथेच हिशोब होऊन जातो. हाईस्कूल बनवले, तेव्हा इथल्या इथेच वाह-वाह झाली. तेथे मिळत नाही. प्रश्नकर्ता : शाळा तर मुलांसाठी बनवली. ती मुले शिकली सवरली. सद्विचार उत्पन्न झाले.
दादाश्री : ती गोष्ट वेगळी आहे. पण तुमची वाह-वाह झाली तर संपले, पुण्य खर्च झाले.
कोणाच्या निमित्ताने कोणाला मिळते ?
प्रश्नकर्ता : वाह-वाह तर ज्याच्यासाठी खर्च केले, त्यालाच जाईल ना, तुम्हाला नाही. तुम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करता, त्याचे फळ त्याला मिळते. ज्याच्यासाठी आपण जे पुण्य करतो ते त्याला मिळते. आपल्याला मिळत नाही.
दादाश्री : आम्ही करायचे आणि त्याला मिळणार ? असे कधी ऐकले आहे का ?
प्रश्नकर्ता : त्याच्या निमित्ताने आपण करतो ना ?
दादाश्री : त्याच्या निमित्ताने करा ना ? ! मग तर त्याच्या निमित्ताने आपण खाल्ले तर काय हरकत ? नाही, नाही, तसे काही त्यात फरक नाही. ते तर सगळे बनावटीने लोकांना उलट रस्त्यावर चढवतात, म्हणे त्याच्या निमित्ताने ! त्याला खायाचे नसेल आणि आम्ही खाल्ले तर काय वाईट आहे ? सगळे नियमबद्ध आहे हे संपूर्ण जग.
तेथे उमलते आत्मशक्ति
बाकी, सोबत ते येणार आहे ? हे काही सोबत येत नाही. येथे लगेच त्याची किंमत मिळते, वाह-वाह लगेचच मिळते. आणि आत्म्याकरिता जे ठेवले, ते सोबत येते.
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
दान
41
प्रश्नकर्ता : सोबत काय येते, म्हणालात?
दादाश्री : सोबत तर आपण जे आत्म्यासाठी देतो, त्याने आत्म्याची शक्ति खूप उमलते. ते आमच्या सोबत येते.
प्रश्नकर्ता : आणि इथे जो खर्च केला, ते तर वाह-वाह करतात तेच मिळते ना?
दादाश्री : मिळाले, वाह-वाह मिळाली.
वाह-वाह चे भोजन
प्रश्नकर्ता : मी जे दान करतो त्यात माझा भाव धर्मासाठी, चांगल्या कामासाठी असतो. त्यात लोकांनी वाह-वाह केली तर ते सारे उडून नाही का जाणार!
दादाश्री : यात मोठी रक्कम खर्च झाली, ती जाहिर होते आणि त्याची वाह-वाह केली जाते. आणि अशी रक्कमही दान दिली जाते जी कोणाला कळतही नाही आणि त्याची कोणी वाह-वाह करत नाही. म्हणून त्याचा लाभ होतो. आपल्याला त्या भानगडीत पडण्यासारखे नाही. आपल्या मनात असा भाव नाही की लोकांनी आम्हाला 'वाढावे!' हा इतकाच भाव असला पाहिजे. जग तर महावीरची पण वाह-वाह करत होते. पण ती ते स्वतः स्वीकारत नव्हते ना! या दादांची पण लोक वाह-वाह करत होते! पण ती ते स्वतः स्वीकार करत नाही ना! आणि हे उपाशी लोक तर लगेच स्वीकारतात. दानाचा पत्ता लागल्याशिवाय रहातच नाही ना! लोक तर वाह-वाह केल्याशिवाय राहणारच नाही, पण स्वतः जर त्याचा स्वीकार केला नाही, तर मग काय हरकत? स्वीकार केला तर रोग प्रवेशेल ना? जो वाह-वाह स्वीकारत नाही त्याला काहीही होत नाही. स्वतः वाह-वाह स्वीकारत नाही. म्हणून त्याला काही नुकसान होत नाही, आणि प्रशंसा करणाऱ्याला पुण्य मिळते. सत्कार्याच्या अनुमोदनेचे पुण्य बांधले जाते. अर्थात हे तर सगळे निसर्गाचे नियम आहेत.
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
42
दान
जो प्रशंसा करतो त्याच्यासाठी कल्याणकारी असते. मग जो ते ऐकतो त्याच्या मनात चांगल्या भावाची बीजं पडतात, की 'हे पण करण्यायोग्य आहे, आम्हाला तर हे माहितच नव्हते. '
प्रश्नकर्ता : आम्ही चांगले कार्य तन, मन आणि धनने करत असतो, पण कोणी आमच्या विषयी वाईटच बोलेल, अपमान करेल त्याचे काय करावे ?
दादाश्री : जो अपमान करत आहे, तो भयंकर पाप बांधत आहे. आता यात आमचे कर्म धूतले जातात आणि अपमान करणारा तर त्यात निमित्त बनला.
वाह-वाह ची प्रीती
अरे, मी तर माझा स्वभाव मापून घेत असे! मी अगास आश्रमाला जात असे. त्यावेळी मी कोंट्रेक्टरचा व्यवसाय करत होतो. तेव्हा शंभर रुपयांची काही कमी नव्हती. पण त्यावेळी पैशांची फार किंमत होती. पैशांची तेव्हा कमी नव्हती, तरी पण मी जेव्हा अगास जायचो तेव्हा तेथे (धर्मादासाठी) रुपये देत असे. तेव्हा शंभर रुपयांची नोट काढून म्हणत असे की, 'घ्या, पंचवीस घ्या नी पंच्याहत्तर परत करा.' आता पंच्याहत्तर परत घेतले नसते तर चालले असते. पण मन कंजूस आणि भिकारी होते, म्हणून पंच्याहत्तर परत घेत होतो.
प्रश्नकर्ता: दादाजी, तेव्हा पण तुम्ही किती सूक्ष्मपणे बघत होतात ?
दादाश्री : हो, पण मी काय सांगू इच्छितो की हा स्वभाव, प्रकृति स्वभाव जात नाही ना ! तेव्हा मग मी शोध घेतला. तसे तर लोक मला म्हणत की, ‘आपण फार नोबल (उदार) आहात.' मी म्हणालो, 'हे कसे नोबल?' इथे तर कंजूसी करतो. नंतर शोध घेतल्यावर मला कळले की जिथे माझी वाह-वाह करत, तिथे मी लाख रुपये खर्च करुन टाकत असे, नाहीतर एक रुपयाही देत नसे. हा स्वभाव बिलकुल कंजूस नव्हता, पण
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
दान
43
जिथे वाह-वाह होत नसे तिथे मग धर्म असो किंवा काहीही असो, पण तिथे देऊ शकत नव्हतो आणि वाह-वाह केली की सगळी कमाई लुटवून देत असे, कर्ज करुन सुद्धा. आता ही वाह-वाह किती दिवस? तिन दिवस. नंतर काहीच नाही. तीन दिवसापर्यंत ओरडतात जरा, नंतर बंद होऊन जाते.
बघा ना, मला आठवते, शभर द्यायचे तिथे पंत्याहत्तर परत घेत होतो. मला आजही ते दिसते, अजूनही. ते ऑफिस दिसते. पण मी म्हणालो, 'असा ढंग!' लोकांचे किती मोठे मन असते. मी आपला ढंग समजून गेलो होतो. ढंग सर्व. तसे मनही मोठे होते. पण वाह-वाह, गुदगुल्या करणारा पाहिजे. गुदगुल्या केल्या की मग चालू.
प्रश्नकर्ता : हा जिवाचा स्वभाव आहे?
दादाश्री : हो, ती प्रकृति, सगळी प्रकृति आहे.
आणि हे पक्के, ते वाणी बसले आहेत ना, ते पक्के. ते वाह-वाहीने ठगले जात नाही. ते तर विचार करतात की पुढे जमा होत आहे की मग इथल्या इथेच राहते? आणि ते वाह-वाहवाले तर इथेच वापरुन टाकले, त्याचे फळ तर मी घेऊन टाकले, चव पण घेतली मी. आणि हे वाणी लोक तर वाह-वाह शोधत नाही, तिथे फळ शोधतात ते लोक. ओवरड्राफ्ट, फारच विचारशील आणि पक्के लोक ना! आमच्या एकापेक्षा जास्त विचारशील. आम्ही क्षत्रिय तर एक वार आणि दोन तुकडे करणारे. सर्व तीर्थंकर क्षत्रियच होते. साधु स्वतःच सांगतात की आम्ही तीर्थंकर होऊ शकत नाही. कारण आम्ही कितीतरी त्याग करुन साधु झालो पण तरी एखादी गिनी(सोन्याचे नाणे) आमच्याजवळ राहू देतो, कधी अडचण आली तर? ही त्यांची मूळ ग्रंथी आणि तुम्ही तर लगेच देऊन टाकता. प्रोमिस टू पे म्हणजे सगळे प्रोमिसच! दूसरे काही येतच नाही ना! दूसरी समज नाही आत. थिंकर (विचारक)च नाही. पण त्यांची सुटका लवकर होते.
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
44
दान
प्रश्नकर्ता : त्यांची सुटका लवकर होते?
दादाश्री : हो, ते लोक मोक्षला जातात. केवळज्ञान होते. परंतु तीर्थंकर तर हे क्षित्रयच असतात. हे लोक सगळे कबुल करतात माझ्यासमोर, आम्ही क्षत्रिय म्हणवतो. आम्हाला असे येत नाही. फार गहन आहे ते. आणि ही तर विचारशील प्रजा. सगळेच समजून-उमजून, प्रत्येक गोष्टिचा विचार करुन काम करतात. आणि आम्हाला (क्षत्रियांना) जो पश्चाताप होतो त्याची सीमा नाही. त्यांना पश्चाताप कमी होतो.
...पण पाटीमुळे नष्ट झाले कोणी धर्मासाठी लाख रुपये देतो आणि स्वत:च्या नावाची पाटी लावायला सांगतो आणि कोणी एकच रुपया धर्मासाठी देतो, पण गुप्तपणे देतो, तर हे गुप्तपणे दिलल्याची फार किंमत आहे, मग जरी त्याने एकच रुपया दिला असो. आणि जर पाटी लावून घेतली तर ती 'बेलेन्स शीट'(हिशोब) पूर्ण झाला. तुम्ही मला शंभराची नोट दिली आणि मी तुम्हाला त्याचे सुटे दिले. त्यात मग मला काही घेणे राहिले नाही आणि तुम्हाला काही देणे राहिले नाही! तुम्ही धर्मासाठी दान देऊन स्वतःच्या नावाची पाटी लावून घेतली म्हणून नंतर काही घेणे-देणे राहिले नाही ना! कारण जे धर्मसाठी दान दिले त्याचा मोबदला त्याने पाटी लावून मिळवला. आणि ज्याने एकच रुपया प्राइवेटमध्ये दिला असेल, त्याचे काही घेणे-देणे झाले नाही, म्हणून त्याचे बॅलेन्स बाकी राहिले.
आम्ही मंदिरात वगैरे सगळ्या ठिकाणी फिरलो आहोत. तेथे काही ठिकाणी सगळ्या भिंती पाट्या-पाट्यानीच भरलेल्या होत्या. त्या पाट्यांची वेल्युएशन (किंमत) किती! अर्थात फक्त किर्तीसाठीच! आणि जिथे किर्ती हेतुसाठी ढिगभर असेल, तेथे मनुष्य बघतही नाही, की यात काय वाचायचे? संपूर्ण मंदिरात एकच पाटी असेल तर ती वाचण्यासाठी वेळ काढेल पण इथे तर भरपूर, सगळ्याच्या सगळ्या भिंती पाट्यानीच भरलेल्या असल्या तेव्हा मग काय होईल? तरीपण लोक म्हणतात की माझी पाटी लावा! लोकांना पाट्याच आवडतात ना!
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
दान
45
लक्ष्मी दिली आणि पाटी घेतली प्रश्नकर्ता : कित्येक लोक समजल्याशिवाय दान देतात, तर त्याचा काही अर्थच नाही?
दादाश्री : नाही, समजल्याशिवाय देत नाहीत. ते तर फार पक्के, ते तर स्वत:च्या हिताचेच करतात.
प्रश्नकर्ता : धर्माला न समजता, नावासाठीच देतात. पाटी लावण्यासाठीच देतात.
दादाश्री : हे नाव तर, हल्ली ह्या नावाचे चालले आहे, पूर्वी नावाचे नव्हते. हे तर आता विकायला लागले नाव, ते या कलियुगामुळे. बाकी पूर्वी नाव-बिव नव्हतेच. ते देतच असत निरंतर. म्हणून देव त्यांना काय म्हणत? श्रेष्ठी म्हणत, आणि आता ते शेठ म्हटले जातात.
शुभ भाव करत राहा प्रश्नकर्ता : एकीकडे तर मनात भाव होतो की मला दानमध्ये सर्वकाही देऊन टाकायचे आहे, पण रुपकात तेही होत नाही.
दादाश्री : ते दिले जात नाही ना! देणे काही सोपे आहे? दान करणे ही तर कठीण वस्तू आहे! तरी पण भाव केला पाहिजे. धन चांगल्या मार्गाने देणे ते आमच्या सत्तेत नाही. भावना करु शकतो, पण देऊ शकत नाही आणि त्या केलेल्या भावनेचे फळ पुढच्या जन्मी मिळते. दान तर हे भोवरे (मनुष्य) कसे देणार? अणि जे देतात ते तर 'व्यवस्थित शक्ति' त्यांना देण्यास भाग पाडते, म्हणून देतात. 'व्यवस्थित शक्ति' करवते, म्हणून मनुष्य दान देतो. आणि 'व्यवस्थित शक्ति' नाही करवत, म्हणून मनुष्य दान देत नाही. 'वीतरागांना' दान देण्याचा किंवा घेण्याचा मोह नसतो. ते तर शुद्ध उपयोगी असतात.
दान देतांना 'मी दान देतो' असा भाव होतो. त्यावेळी पुण्याचे
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
दान
परमाणु खेचले जातात आणि वाईट काम करतो तेव्हा पापाचे परमाणु खेचले जातात. ते मग फळ देताना शाता फळ देतात, किंवा आशाता फळ देतात. जोपर्यंत अज्ञानी असतात, तोपर्यंत फळ भोगातात, सुख-दुःख भोगातात. जेव्हा की ज्ञानी त्यास भोगत नाहीत, फक्त त्यास जाणतात.
लक्ष्मीचा सदुपयोग कशात? प्रश्नकर्ता : पण समजा एखाद्या मनुष्याच्या पुण्य कर्माने त्याच्याकडे लाखो रुपये जमले, तर ते त्याने गरिबात वाटवे की स्वत:च उपयोग करावा?
दादाश्री : नाही, घरच्या लोकांना दु:ख होणार नाही अशा प्रकारे ते पैसे खर्च केले पाहिजे. घरच्या लोकांना विचारावे की, भाऊ, तुम्हाला अडचण तर नाही ना? तेव्हा ते म्हणतील, नाही, काही अडचण नाही. तर ती लीमीट त्याची, पैसे खर्च करण्याची. म्हणून मग आपण त्यानुसार खर्च करावे.
प्रश्नकर्ता : सन्मार्गावर तर खर्च करायचा ना?
दादाश्री : मग, बाकी सगळे सन्मार्गावरच खर्च केले पाहिजे. घरात खर्च होतील, ते सारे गटारीतच जातील. आणि इतर ठिकाणी जे खर्च झाले ते तुमच्यासाठीच सेफसाइड झाली. हो, इथुन सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. पण असे दुसऱ्या प्रकारे सेफसाइड करु शकतो.
प्रश्नकर्ता : पण तसे तर ते सोबत घेऊन गेल्यासारखेच म्हटले जाइल ना!
दादाश्री : हो, सोबताच घेऊन जाण्यासारखे झाले, आपल्या सेफसाइडवाले. म्हणजे कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना सुख मिळेल, त्यासाठीच खर्च केले पाहिजे ही सगळी तुमची सेफसाइड आहे.
प्रश्नकर्ता : लक्ष्मीचा सदुपयोग कशाला म्हणतात?
दादाश्री : लोकांच्या उपयोगासाठी किंवा मग देवासाठी खर्च केले त्यास सदुपयोग म्हटला जातो.
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
दान
47
आमची पण भावना सदैव राहिली
माझ्याकडे लक्ष्मी असती तर मी लक्ष्मी दिली असती, पण अशी काही लक्ष्मी माझ्याजवळ आली नाही आणि आली तर आता सुद्धा द्यायला तयार आहे. मला काय सोबत घेऊन जायचे आहे हे सर्व ? पण काहीतरी या सगळ्यांना! तरी पण सगळ्यांना लक्ष्मी देण्या ऐवजी, कशा प्रकारे या जगात सगळे सुखी होवो, जीवन कसे जगावे, असा मार्ग दाखवा. लक्ष्मी तर दहा हजार दिले ना तर दुसऱ्याच दिवशी तो नोकरी बंद करेल, म्हणून लक्ष्मी देऊ नये. अशा प्रकारे लक्ष्मी देणे गुन्हा आहे. मनुष्याला आळशी बनवून टाकते, म्हणून बापा मुलाला जास्त लक्ष्मी देऊ नये, नाहीतर मुलगा दारुड्या होईल. मनुष्याला चैन मिळाले की बस, मग तो उलट्या मार्गाला लागतो. मुलांना द्यावे की दान करावे ?
प्रश्नकर्ता: पुण्याच्या उद्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष्मीची प्राप्ती झाली तर ?
दादाश्री : तर खर्च करुन टाकावी. मुलांसाठी जास्त ठेवू नये. त्यांना शिकवावे, सवरवावे. सगळे कम्प्लीट करुन, त्यांना नोकरीला लावले, की मग ते कमवायला लागतील. म्हणून जास्त ठेवू नये. थोडेसे बँकेत, किंवा कुठे तरी ठेवायचे. दहा-वीस हजार, मग कधीतरी तो अडचणीत असला तर त्याला द्यावे पण त्याला सांगू नये, की बाबा मी ठेवलेत. हो, नाहीतर अडचण नसेल तरी उभी करतील.
एका व्यक्तिने मला प्रश्न केला की, मुलांना काही देऊ नये ? मी म्हणालो, ‘मुलांना द्यायचे, आपल्या बापाने आपल्याला जे दिले ते सर्व द्यायचे आणि मधला जो माल आहे, तो आपला. तो मग आपण आपल्या मर्जीनुसार धर्मासाठी वापरावे.
प्रश्नकर्ता : आम्हा वकिलांच्या कायद्यात सुद्धा असेच आहे की जी वाडिलोपार्जित संपत्ति आहे ती मुलांना दिली पाहिजे. आणि जी स्वउपार्जित संपत्ति आहे, त्याचे बापाला जे करायचे असल ते करो.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
दान
दादाश्री : हो, जे करायचे असेल ते करा. आपल्या हातुनच केले पाहिजे! आपला मार्ग काय म्हणतो की जो तुझा स्वत:चा माल आहे, त्याला तु वेगळा करुन खर्च कर, तर तो तुझ्यासोबत येईल. कारण बाहेरगावी जातो तेव्हा थोडी शिदोरी घेऊन जातो, मग हे सगळे नको का?
प्रश्नकर्ता : जास्त तर केव्हा म्हणावे? ट्रस्टी प्रमाणे राहिले तर.
दादाश्री : ट्रस्टी प्रमाणे राहणे उत्तम आहे. पण असे राहता येत नाही, सगळे असे राहू शकत नाही. ते सुद्धा पूर्णपणे ट्रस्टी प्रमाणे राहू शकत नाही. ट्रस्टी अर्थात् तर ज्ञाता-दृष्टा झाले. पण ट्रस्टी प्रमाणे पूर्णपणे राहिले जात नाही. पण जर असा भाव असेल तर थोडे-फार राहू शकतो.
आणि मुलांना तर किती द्यायचे असते? आपल्या वडीलांनी आपल्याला दिले असेल तेवढे, काही दिले नसेल तरी आपण काही न काही दिले पाहिजे.
मुले दारुडे बनतात का, फार वैभव असेल तर?
प्रश्नकर्ता : हो बनतात. मुले दारुडे बनणार नाहीत तेवढे तर दिले पाहिजे?
दादाश्री : तेवढेच दिले पाहिजे. प्रश्नकर्ता : जास्त वैभव दिले तर तसे होऊ शकते.
दादाश्री : हो, ते नेहमीच त्याचा मोक्ष बिघडवेल. नेहमी पद्धतशिर असलेलेच चांगले. मुलांना जास्त देणे हा गुन्हा आहे. हे तर फोरनवाले सर्व समजतात! किती समंजस आहेत!! आणि यांना तर सात पीढ्यांपर्यंतचा लोभ! माझ्या सातव्या पीढीच्या माझ्या मुलाकडे असे असावे. किती लोभी आहेत हे लोक? मुलांना आपण काम धंद्यावर चढवायचे, तितके आपले कर्तव्य आणि मुलींचे तर आम्ही लग्न करुन दिले पाहिजे. मुलींना काहीतरी दिले पाहिजे. आजकल मुलींचा वाटा द्यायला लावतात ना वाटेकरी
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
दान
49
प्रमाणे ? लग्नात खर्च होतो ना ? नंतर वरुन थोडे - फार द्या. तिला दागिने वगैरे दिले, ते देतातच ना! पण स्वतःचा पैसा तर स्वतःच खर्च केला पाहिजे.
प्रश्नकर्ता : मुलांना पारिवारिक व्यवसाय सोपावा आणि कर्ज दिले पाहिजे ना?
दादाश्री : आपल्याकडे मिलियन डॉलर असो किंवा अर्धा मिलयन डॉलर असो, तरीही मुलगा ज्या घरात राहतो, ते घर मुलाला द्यावे. नंतर त्याला एक काम- - धंदा सुरु करुन द्यावा, त्याला आवडत असेल ते. कोणते काम त्याला आवडते, ते विचारुन मग जे काम त्याला ठीक वाटेल, ते चालू करवून द्यायचे. आणि पंचवीस - तिस हजार बँकेतून मिळवून द्यावे, लोन वर. मग तो स्वतःच लोन भरत राहील. आणि थोडे-फार आपण द्यायचे. त्याला हवी असेल त्यातली अर्धी रक्कम आपण द्यावी आणि अर्धी बँकेतून, म्हणून मग तो लोन भरत राहील. म्हणजे कोणी धक्का मारणारा हवा त्याला. ज्यामुळे तो दारु पिणार नाही. मग मुलगा म्हणेल की, ‘या वर्षी माझ्याकडून लोन भरली जाणार नाही.' तेव्हा म्हणावे की, मी आणून देतो तुला पाच हजार कोणाकडून, पण लवकरच परत करायचे आहे. असे सांगून पाच हजार आणून द्यायचे. मग आपण त्या पाच हजाराची आठवण करुन द्यावी, की 'लवकर परत करा, असे ते म्हणाले आहे.' अशी आठवण करुन दिली तर मुलगा म्हणेल, 'तुम्ही कटकट करु नका आता.' तेव्हा आपण समजून जावे. 'खूप चांगले आहे हे.' म्हणून मग तो पुन्हा घ्यायला येणारच नाही ना! 'कटकट करता' असे म्हणाला, त्याची आपल्याला हरकत नाही, पण मग पुन्हा घ्यायला तर येणार नाही ना !
अर्थात् आपली सेफसाइड आपण ठेवावी आणि परत मुला समोर आपले वाईटही दिसत नाही. मुलगा म्हणेल, 'वडील तर चांगले आहेत ! ' पण माझा स्वभाव वाकडा आहे. मी उलट बोललो म्हणून. बाकी वडील तर फार चांगले आहेत. तात्पर्य पळ काढावी या जगातून.
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
दान
आदर्श वील मुलीला काही प्रमाणात द्यावे. मुलाला द्यावे, पण ठराविक प्रमाणात. बाकी अर्धी पुंजी तर स्वत:जवळाच ठेवावी. अर्थात प्राईवेट! जाहीर केली नसेल तशी !! दुसरे सगळे जाहिर करावे व म्हणावे की आम्हा दोघांना जगेपर्यंत पाहिजे ना?
अर्थात् आम्हाला पद्धतशीर, समंजसपणे काम करायचे आहे. प्रश्नकर्ता : पण मनुष्य मृत्यू पावतो, त्या नंतरचे वील कसे असावे?
दादाश्री : नाही, मृत्यूनंतर तर जे आहे ना आमच्याजवळ, समजा अडीच लाख रुपये उरलेत, ते तर आपल्या उपस्थितीतच, म्हणजे मृत्यूपर्यंत राहू द्यायचेच नाही, शक्य असेल तर ओवरड्राफ्ट काढून घ्यावा. हॉस्पिटलचे, ज्ञानदानाचे, असे सगळे ओवरड्राफ्ट काढून घ्यावे, आणि नंतर जे उरेल ते मुलांना द्यावे. आणि थोडे वाचवावे सुद्धा. ती तशी त्यांची लालच आहे ना, त्या लालचेसाठी पन्नास हजार ठेवावे. मग दुसऱ्या दोन लाखांचा ओवरड्राफ्ट काढून घ्यावा, पुढच्या जन्मी आम्ही काय करणार? हे सगळे मागच्या जन्माचे ओवरड्राफ्ट आता खर्च करत आहात, तर या जन्मात ओवरड्राफ्ट नाही का काढावा लागणार? हो, आम्ही कोणाला देऊन नाही टाकले हे. हे तर लोकांच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी खर्च केले, त्यास ओवरड्राफ्ट म्हणतात. मुलांना देऊन तर पस्तावले आहेत, असे पस्तावले होते ना खरोखरचे! मुलांचे हित कसे करावे, हे तुम्हाला समजले पाहिजे. म्हणून माझ्याजवळ येऊन बातचीत (चर्चा) करुन घ्यावी.
म्हणून मी म्हणतो की धुळीत जावो, त्याऐवजी एखाद्या चांगल्या मार्गी जावे, असे काही करा. सोबत आपल्या उपयोगी पडतील आणि तेथे तर जातांना चार नारळ बांधून देतील ना! आणि ते सुद्धा मुलगा काय म्हणेल, 'जरा स्वस्तातले बिन पाण्याचे द्या ना!' तुमच्या जवळ जर जास्त
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
दान
51
पैसे असतील तर चांगल्या मार्गी वापरावे, लोकांच्या सुखासाठी खर्च करावे. तेवढेच तुमचे, बाकी गटारीत..... हे असे सर्व बोलायचे तर नसते. पण तरी आम्ही बोलतो.
आणि असे हिशोब फेडले जातात प्रश्नकर्ता : एका माणसाला आम्ही पाचशे रुपये दिले आणि ते रुपये तो परत करु शकला नाही. आणि दुसरे, की आपण पाचशे रुपयांचे दान दिले. तर या दोन्हीत काय फरक आहे ?
दादाश्री : हे दान दिले ती वेगळी गोष्ट आहे. त्यात जो दान घेतो तो कर्जदार बनत नसतो. तुमच्या दानाचा बदला तुम्हाला दुसऱ्या प्रकारे मिळतो. दान घेणारा मनुष्य, तो मोबदला देत नाही. जेव्हा की त्यात तर तुम्ही ज्याच्या कडे पैसे मागता, त्याच्या द्वारेच तुम्हाला देण्यास भाग पाडता. मग शेवटी हुंड्याच्या रुपातही तो ते रुपये देईल. आमच्यात असे नाही का म्हणत की मुलगा आहे गरीब घराचा पण घर परिवार खानदानी आहे, म्हणून पन्नास हजार त्याला हुंड्यात द्या! ते कुठला हुंडा देतात? तर जे घेणे आहे तेच परत करतात. अर्थात् असा हिशोब आहे सगळा. एक तर मुलगी देतात आणि रुपये पण देतात. म्हणून अशा प्रकारे सर्व हिशोब फेडले जातात.
विश्वसनीय सांगणारा कोणी पाच हजार रुपये तुमच्या हातातून हिसकावून घेतले तर तुम्ही काय कराल?
प्रश्नकर्ता : असे तर कितीतर हिसकावले गेले आहे. सगळी मिळकत पण गेली आहे.
दादाश्री : तर काय करता? मनात काही होत नाही? प्रश्नकर्ता : काही नाही.
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
दादाश्री : तेवढे चांगले, मग तर समंजस आहात. हिसाकावण्यासाठीच तर येतात. इथे नाही गेले तर तिथे जातील. म्हणून चांगल्या जागी देऊन टाकावे. नाहीतर इतरत्र तर जाणारच आहे. धनाचा स्वभावच तसा आहे, चांगल्या मार्गाने नाही गेले तर वाईट मार्गाने जाईल. चांगल्या मार्गाने कमी गेले व वाईट मार्गाने जास्त गेले.
प्रश्नकर्ता : चांगला मार्ग दाखवा. कसे कळावे की मार्ग चांगला आहे की वाईट?
दादाश्री : चांगला मार्ग तर तसा.... आम्ही एक सुद्धा पैसा घेत नाही. मी स्वतःच्या घरचे कपडे घालतो. या देहाचा मी मालक नाही! सव्वीस वर्षापासून मी या देहाचा मालक नाही. या वाणीचा मी मालक नाही. तर आता आपल्याला काही खात्री पटली, माझ्यावर थोडा विश्वास बसला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाऊ, अमक्या ठिकाणी तुम्ही पैसे दिले तर चांगल्या मार्गाने खर्च होतील. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसला म्हणून मी तुम्हाला सांगितले तर त्यात काही हरकत आहे?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तोच चांगला मार्ग आहे. आणखी कुठला? सांगणारा विश्वसनीय असावा! त्याचे त्यात अजिबात कमिशन नसावे. एक पैसा पण त्यात कमिशन नसावे, तेव्हा तर ते विश्वसनीय म्हणवेल! आम्हाला असे दाखवणारे भेटले नाही. आम्हाला तर ज्यात त्यात कमिशन... (जाईल असे दाखवणारे भटलेत)
प्रश्नकर्ता : दादाजी आम्हाला मार्ग दाखवत राहा.
दादाश्री : जिथे थोडे-फार पण कमिशन आहे, तिथे चुकीच्या मार्गावर पैसा जातो,. आतापर्यंत तर या संघाचे चार आणे देखील खर्च झाले नाही, कोणी कारकून किंवा त्याच्या नावावर. सगळेच स्वतःचा पैशाने काम करुन घेतात, असा हा संघ, पवित्र संघ! म्हणजे खरा मार्ग हा आहे. जेव्हा द्यायचे असेल तेव्हा द्या आणि ते सुद्धा तुमच्या जवळ असतील
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
दान
तरच, नसतील तर नका देऊ. आता हा भाऊ म्हणेल, 'मी पुन्हा देऊ दादाजी?' तर मी म्हणेल, नाही भाऊ, तू तूझा धंदा करत जा. आता एकदा दिले त्याने! मग पुन्हा देण्याची इथे गरज नाही. असेल तर शक्तिनुसार
द्यावे. जेव्हा दहा रतल वजन उचलू शकत असाल तर आठ रतल उचला, अठरा रतल इचलू नका. दु:खी होण्यासाठी करायचे नाही. पण सरप्लस (जास्तीचे) धन उलट मार्गाने जाऊ नये, त्याकरिता हा मार्ग दाखवत आहोत. हो, नाहीतर लोभ आणि लोभातच चित्त भटकत राहील! म्हणून ज्ञानी पुरुष दाखवतात की अमक्या ठिकाणी वापरा.
धन द्या सीमंधर स्वामींच्या मंदिरात अधिक धन असेल तर ते सीमंधर स्वामींच्या मंदिरात देण्यासारखे आहे, दूसरे एकही स्थान नाही. आणि कमी धन असेल तर महात्म्यांना भोजन करवावे, त्यासारखे दूसरे काहीच नाही! आणि त्यापेक्षाही कमी असेल तर एखाद्या दु:खी माणसाला द्यावे. आणि ते सुद्धा नगदी नव्हे, तर त्याला खाणे-पिणे इत्यादी देऊन. कमी पैश्यातून सुद्धा दान करायचे असेल तर परवडेल की नाही परवडणार!
ओळखा सीमंधर स्वामींना आपल्या इथे आपण सीमंधर स्वामींचे नाव तर एकले ना? ते वर्तमान तीर्थंकर आहेत, महाविदेह क्षेत्रामध्ये ! त्यांची उपस्थिती आहे आजही.
सीमंधर स्वामींचे वय किती? साठ सत्तर वर्षांचे असेल? पावणे दोन लाख वर्षाचे वय आहे ! आणखी सव्वा लाख वर्ष जगणार आहेत. हे त्यांच्यासोबत तार, संबंध जोडून देतो, कारण तेथे जायचे आहे. अजून एक जन्म बाकी राहील. इथून सरळ मोक्ष होणार नाही. आणखी एक जन्म बाकी राहील. त्यांच्या जवळ बसायचे आहे, म्हणून सांधा जुळवून देतो.
आणि हे भगवंत संपूर्ण जगाचे कल्याण करतील. साऱ्या जगाचे कल्याण होईल! साऱ्या जगाचे कल्याण होईल त्यांच्या निमित्ताने. कारण ते जिवंत आहेत. जे गेलेत ते काही करु शकत नाही, फक्त पुण्य बांधले जाते.
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
54
दान
अनन्य भक्ति, तेथे दिले जाते आपल्याला मोक्षगतीत जायचे आहे. तेथे मोक्ष प्राप्ती करु शकू तेवढे पुण्य पाहिजे. इथे तुम्ही सीमंधर स्वामींचे जेवढे कराल त्यात तुमचे सर्व आले. पुष्कळ झाले! त्यात असे नाही की हे कमी आहे. त्यात तर तुम्ही जे (देण्यासाठी) ठरवले असेल, ते सगळे करा. मग त्यात सर्व आले. मग त्याहून जास्त करण्याची गरज नाही. मग हॉस्पिटल बनवा किंवा आणखी काही बनवा. ते सगळे वेगळ्या मार्गाने जाते.
हे आहेत जीवंत देव लक्ष्मीच्या सदुपयोगाचा अगदी खरा मार्ग कोणता आहे आता? तेव्हा म्हणे, ‘बाहेर दान देणे तो? कॉलेजमध्ये पैसे द्यावे तो?' तेव्हा म्हणे, नाही! आपल्या या महात्म्यांना नाश्टा द्या. त्यांना संतोष देणे. तो सर्वात उत्तम मार्ग. असे महात्मा जगात कुठेही मिळणार नाहीत. तेथे सत्युगच दिसतो आणि ते सर्व आले तर कशा प्रकारे तुमचे भले होवो, हीच त्यांची भावना दिवसभर असते.
पैसे नसतील ना, तर त्यांच्याकडे राहा, जेवा, ते सर्व आपलेच आहे. समोरासमोर पारस्पारिक आहे, ज्यांच्याकडे सरप्लस आहे त्यांनी खर्च करावे. आणि अधिक जास्त असेल तर मनुष्य मात्राला सुखी करा, ते चांगले आहे आणि त्याच्याही पुढे, समस्त जीवांच्या सुखासाठी खर्च करा.
बाकी शाळेत द्याल, कॉलेजात द्याल त्याने प्रसिद्धी होईल, पण खरे हे आहे. हे महात्मा एकदम खरे आहेत, याची गॅरेंटी देतो, भले कसेही असोत. पैसे कमी असले तरी त्यांची दानत साफ आहे आणि भावनाही फार सुंदर आहे. प्रकृती तर वेगवेगळी असतेच. हे महात्मा तर जिवंतजागृत देव आहेत. त्यांच्या आत आत्मा प्रकट झालेला आहे. एक क्षण सुद्धा आत्म्याला विसरत नाहीत. तेथे आत्मा प्रकट झाला आहे, तेथे देव आहे.
प्रश्नकर्ता : लोकांना जेऊ-खाऊ घातले तर ते फलीभूत होत नाही?
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
दान
55
दादाश्री : ते फलीभूत होते ना! पण ईथल्या ईथेच वाह-वाह होते. तेवढेच. याचे फळ इथल्या इथेच मिळून जाते. आणि त्याचे तेथे मिळते, वाह वाह होत नाही, ते तेथे मिळते.
प्रश्नकर्ता : अर्थात् सोबत घेऊन जावे, असेच ना? ।
दादाश्री : ते सोबत घेऊन जायचे. हे जे तुम्ही दहा दिले ते तुम्ही सोबत घेऊन जाणार आणि वाह-वाह झाली म्हणजे खर्च झाले.
प्रश्नकर्ता : तर उद्यापासून सर्वांना जेवण देणे बंद करावे लागेल.
दादाश्री : भोजन देणे ते तर तुमच्यासाठी अनिवार्यच आहे. अनिवार्यात तर केल्याशिवाय सुटकाच नाही.
हे तर असे आहे ना, या महात्म्यांना जेऊ घालणे, आणि बाहेरच्या लोकांना जेऊ घालणे ते वेगळे आहे. ते वाह-वाहचे कार्य आहे, इथे कोणी वाह-वाह म्हणायला आले नाहीत. हे महात्मा तर! जगात असे कोणीही पुरुष भेटणार नाहीत, किंवा असे ब्राम्हण भेटणार नाहीत, की ज्यांना तुमचे काहीही घेण्याची इच्छा नसेल, कोणताही दृष्टीफेरच नाही या महात्मांना. हे महात्मा कसे आहेत, जे कोणत्याही प्रकारचा फायदा करुन घेण्यामागे नाहीत, तेव्हा असे महात्मा कुठून असतील?! हा तर संसार सगळा स्वार्थाचा आहे, पण हे महात्मा तर करेक्ट (खरे) लोक. असे लोकच नसतात ना! या जगात तर नसणारच ना!
त्यांना अशी इच्छाच होत नाही, की हा डॉक्टर माझ्या कामाचा आहे. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही. आणि इतर लोक तर डॉक्टर आले की लगेच विचार करतात की कधीतरी कामी येतील, तर का मेल्यांनो, फक्त औषध खाण्याकरिता? स्वस्थ असले तरी औषध खाण्यासाठी पळता?
हे महात्मा काय आहेत, हे माझे शब्द जर आपल्याला समजले ना, तर ते देवासारखे आहेत, पण या महात्म्यांना ते माहित नाही. यांना चहा
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
56
दान
पाणी पाजले, खाऊ घातले, जेवण दिले, हा सर्वात मोठा यज्ञ म्हणवतो. प्रथम कक्षेचा यज्ञ. बांगड्या विकून जरी जेवण दिले ना, तरीही खूप चांगले! बांगड्या शांती देत नाहीत. महात्म्यांसोबत बसलो तर त्यांची नियत वाईट नाही. म्हणून या महात्म्यांना जितके खाऊ घालता येईल तितके घालत जा. चहा जरी पाजलात तरी फार झाले.
अशी समज द्यावी लागते
एक मनुष्य माझा सल्ला मागत होता की मला पैसे द्यायचे आहे, तर मी कशा प्रकारे देऊ? तेव्हा मी विचार केला, याला पैसे देण्याची समज नाही. मी म्हणालो, तुझ्याजवळ पैसे आहेत ? तर तो म्हणाला 'हो'. तेव्हा मी म्हणालो की, 'अशा प्रकारे दे.' मी जाणत होतो की तो माणूस मनाचा खूपच स्वच्छ आहे, आणि भोळाभाबडा आहे. त्याला खरी समज दयावी.
म्हणजे गोष्ट अशी होती की आम्ही एका सदगृहस्थाकडे गेलो होतो. त्याने मला गाडीत सोडण्यासाठी एक माणूस पाठवला. फक्त सोडण्यासाठीच. त्याने त्या डॉक्टरला सांगितले की दादाजींना गाडीत सोडायला तुम्ही जाऊ नका, मी त्यांना सोडून येईल. म्हणजे असे ते सोडायला आले आणि त्यात आमचा वार्तालाप झाला. तो माणूस माझा सल्ला मागत होता की ‘मला पैसे द्यायचे आहे तर ते कुठे द्यायचे, कसे द्यायचे ?' बंगला बनवला आहे म्हणजे पैसे तर कमवले असतील. त्यावर तो म्हणाला, 'बंगला बनवला, सिनेमा थियेटर बनवले. आताच सव्वा लाख रुपयांचे तर माझ्या गावात दान दिले. ' तेव्हा मी म्हणालो की, 'जास्त कमवले असाल, तर एखादी आप्तवाणी छापून द्या.' त्यावर लगेच तो म्हणाला 'तुमच्या सांगण्याचीच वेळ आहे, हे तर मला माहितच नव्हते. मला कोणी समजावतच नाही.' मग तो म्हणाला, 'या महिन्यातच लगेच छापून देईन.' नंतर पुढे विचारतो की किती खर्च होईल ? तेव्हा म्हणालो की, 'वीस हजार होतील, ' लगेच म्हणतो की, 'इतकी पुस्तके मला छापून द्यायची आहेत!' मी त्याला घाई न करण्यास सांगितले.
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
दान
57
म्हणजे अशी भली माणसे असतात ज्यांना दान कसे देणे हे समजत नसते, आणि ते सुद्धा त्याने विचारले तर आम्ही सांगतो. आम्हाला माहित आहे की तो साधा-भोळा आहे. त्याला समजत नाही म्हणून मग त्याला सांगतो. बाकी, समजदारांना तर काही सांगण्याची आम्हाला गरज नाही ना! नाहीतर त्याला दुःख होईल. आणि दुःख होईल असे आम्हाला नकोच. इथे पैशांची गरजच नाही. सरप्लस असेल तरच द्या. कारण ज्ञानदानासारखे दुसरे कोणतेही दान नाही या जगात !
कारण या ज्ञानाची पुस्तके कोणी वाचेल, तर त्याच्यात कितीतरी परिवर्तन होईल. म्हणून असेल तर द्यावे, नसेल तर आपल्याकडे तशी काही गरजही नाही.
सरप्लसचे दान प्रश्नकर्ता : सरप्लस कशाला म्हणतात?
दादाश्री : सरप्लस तर आज तुम्ही द्याल आणि उद्या तुम्हाला चिंता होईल अशी परिस्थिती असेल त्यास सरप्लस म्हणत नाही. आता पुढच्या सहा महिन्यापर्यंत मला काही अडचण होणार नाही, असे स्वत:ला वाटले तरच काम करावे, अन्यथा करु नये.
तसे तर हे काम जर तुम्ही कराल तर तुम्हाला अडचण येणारच नाही. हे काम तर आपल्या आपणच पूर्ण होते. हे तर देवाचे काम आहे. हे काम जो कोणी करतो त्याचे तशेच्या तशे बरोबर होऊन जाते. पण तरीही मी तुम्हाला चेतावणी दिली पाहिजे. समजल्याशिवाय, विचारकेल्याशिवाय करा असे मी कशाला सांगू? डोळे मिटून यात उडी मारा, असे करायला मी का म्हणून सांगू? मी तर तुमच्या हितासाठी चेतावणी देतो की, 'मागच्या जन्मी तुम्ही दिले होते म्हणून आज तुम्हाला मिळत आहे, आणि आज द्याल तर ते परत मिळेल. हे तर तुमचेच ओवरड्राफ्ट आहे. यात मला काही घेणे-देणे नाही. मी तर तुम्हाला चांगल्या जागी देण्यास लावतो, एवढेच.' मागच्या जन्मी जे दिले होते ते ह्या जन्मात
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
दान
घेत आहोत. सगळ्यांनाच काय अक्कल नाही? तेव्हा म्हणे, 'अक्लीने नाही दिले, वरुनच आहे ! तुम्ही बँकेत ओवरड्राफ्ट क्रेडीट केले असेल तर तुमच्या हातात चेक येईल.' अर्थात् बुद्धि चांगली असेल ना तर पुन्हा जोईन्ट होऊन जाते सर्व.
घेतांना पण किती बारीक समज इथे फक्त जी पुस्तके छापली जातात तीच आणि इतका विश्वास नक्कीच आहे की या पुस्तकांचे पैसे येऊन मिळतील, आपल्या आपणच. त्याच्या मागे निमित्त आहे. ते सगळे येऊन मिळतील. त्यांना काही सांगावे लागत नाही किंवा भिक मागावी लागत नाही. कोणाकडून मागाल तर त्याला दु:ख होईल. तो म्हणेल इतके सारे ? 'इतके सारे' म्हटल्या बरोबरच त्याला दुःख होते. अशी आपल्याला खात्री झाली ना? आणि कोणालाही दुःख झाले म्हणजे आमचा धर्म राहिला नाही. म्हणून आपण कधीही मागु नये. तो स्वत:च्या खुशीने म्हणत असेल तर आपण घेऊ शकतो. तो स्वतः ज्ञानदानाचे महत्व समजत असेल तरच आपण घेऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी दिले आहेत ना, ते स्वतः ज्ञानदान समजून देतात. आपल्या आपणच देतात. आतापर्यंत मागितले नाही.
येथे पुस्तक छापून घेतले असेल तर आमच्या पैशांची शोभा येईल आणि पुण्य असेल तेव्हाच तसा मेळ बसतो. पैसे चांगले असतील तरच छापून घेता येईल. नाहीतर छापली जात नाही, तसा मेळ बसतच नाही ना!
स्पर्धा नाही होत येथे आणि स्पर्धेत ते बोलण्याची गरज नाही. हे स्पर्धेच्या लाईनीतले नाही की येथे बोली लावली जाईल की हा इतके बोलला, तो तितके बोलला! वीतराग्यांकडे अशी स्पर्धा होत नाही. पण हे तर दुषमकाळात घुसले आहे असे सर्व, ही दुषम काळाची लक्षणे सगळी. स्पर्धा करणे, हा तर भयंकर रोग आहे. मनुष्य पैज लावतो. आपल्या इथे असे कोणतेच लक्षण नसते. येथे पैशांची मागणी केली जात नाही.
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
दान
59
दादाजींच्या हृदयांची गोष्ट इतके सारे पत्र येतात की आपण कसे सांभाळावे तेच कठीण आहे. म्हणून मग आता अन्य लोक छापून घेतील तेव्हाच होईल. आपण तर हे मोफत देतो, पहिल्यांदा, फर्स्ट टाइम. नंतर लोक आपल्या आपण छापून घेतील. हे तर आपले हे ज्ञान समोर आले आहे ते लुप्त होऊ नये, म्हणून छापून घ्यायचे आहे. आणि कोणी ना कोणी तर भेटतातच, स्वत:हूनच हो म्हणतो. आमच्या ये लॉ (कायदा) नाही. नो लॉ तोच लॉ.
प्रियला सोडा तरच समाधि समाधि केव्हा येईल? संसारात ज्याच्यावर अतिशय प्रेम आहे, त्यास मोकळे सोडता येईल तेव्हा. संसारात कोणावर अतिशय प्रेम आहे ? तर लक्ष्मीजी वर. म्हणून तिला मोकळी सोडा. तेव्हा म्हणतात की सोडून दिली तेव्हा आणखी जस्त येऊ लागते. तेव्हा मी म्हणालो की, जास्त आली तर जास्त जाऊ द्या. प्रिय वस्तू सोडली तर समाधि वाटते.
__ असा आहे मोक्षमार्ग हे भाऊ लुटवून देत होते. नंतर मला विचारत होते की हा मोक्षाचा मार्ग आहे का? मी म्हणालो, 'हाच मोक्षमार्ग आहे, मग याहून दुसरा मोक्षाचा मार्ग कसा असतो? स्वतःजवळ असेल ते लुटवून द्यावे मोक्षासाठी. त्याचे नाव मोक्षमार्ग. शेवटी तर सोडायचेच आहे ना? शेवटी तर सोडतोच, सोडल्याशिवाय चालते का कोणाला? तुम्हाला कसे वाटते?
जे स्वतः जवळ आहे ते लुटवून द्यावे आणि ते सुद्धा चांगल्या कामासाठी, मोक्षासाठी किंवा मोक्षार्थीसाठी, जिज्ञासुंसाठी किंवा ज्ञानदानासाठी लुटवणे, तोच मोक्षमार्ग आहे.
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज,
जि.-गांधीनगर, गुजरात - 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर,
सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा
जि.-पंचमहाल. फोन : 9723707738 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड.
फोन : 9737048322 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, जि.-मोरबी,
फोन : 9924341188 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ, सीनोग्रा गाँव,
ता.-अंजार. फोन : 9924346622 मुंबई : 9323528901
दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230
चेन्नई : 9380159957 जयपुर : 8290333699
भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433
भिलाई : 9827481336 पटना : 7352723132
अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099
हैदराबाद : 9885058771 : 7218473468
जालंधर : 9814063043 U.S.A. : +1 877-505-DADA (3232) UAE : +971 557316937 U.K. : +44 330-111-DADA (3232) Singapore : +65 81129229 Kenya : +254 722722063
Australia :+61421127947
New Zealand : +64 210376434 Website : www.dadabhagwan.org
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________ दानाचा प्रवाह चार प्रकारचे दान आहेत : एक आहारदान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान. उपाशी माणसाला खाऊ घातले, ते अन्नदान. आजारी माणसाला औषध फ्री ऑफ कॉस्ट (मोफत) आणून दिले, ते औषधदान. लोकांना समजावून त्यांना खऱ्या मार्गावर वळवणे आणि लोकांचे कल्याण व्हावे अशी पुस्तके छापून घेणे, ते ज्ञानदान. आणि कोणत्याही जीवाला त्रास होऊ नये अशा प्रकारे वागणे, ते अभयदान. -दादाश्री Printed in India dadabhagwan.org Price Rs10