Book Title: Noble Use Of Money Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 15
________________ दान अतिरिक्त वाहू द्या, धर्मासाठी हा तर लोकसंज्ञेमुळे दुसऱ्यांचे पाहून शिकतो. पण जर ज्ञानींना विचारले तर ते म्हणतील. नाही, हे का म्हणून असे खड्ड्यात पडतात. या दुःखाच्या खड्ड्यातून निघाला, की परत पैशांच्या खड्ड्यात पडला? अतिरिक्त असेल तर धर्मकार्यात वापरुन टाक, येथूनच. तेच तुझ्या हिशोबात जमा होतात. हे बँकेचे पैसे काही जमा होत नाही. आणि तुला कधी अडचणही येणार नाही. जो धर्मासाठी देतो त्याला कधी अडचण येत नाही. त्याचा प्रवाह बदला कसोटीच्या वेळी तर एक मात्र धर्मच आपल्या मदतीसाठी उभा राहतो, म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजीला जावू द्यावे. फक्त एक सुषमकाळातच (जेव्हा तीर्थंकर भगवंत हजर असतात तो काळ) लक्ष्मीचा मोह करण्या योग्य होता. त्या लक्ष्मीजी तर आल्या नाहीत, आणि या सेठ लोकांना हार्ट फेईल आणि ब्लडप्रेशर कोण करवते? तर या काळाची लक्ष्मीच करवते. पैशांचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. म्हणजे येतात व एक दिवस परत निघून जातात. म्हणून पैसे लोकांच्या हितासाठी वापरावेत. जेव्हा तुमचा वाईट कर्माचा उदय आला असेल, तेव्हा लोकांना जे दिले असेल तेच तुम्हाला मदत करेल. म्हणून आधीच समजून जावे. पैशांचा सदुपयोग तर केलाच पाहिजे ना? चारित्र्याने समंजस झाला तर समजा संपूर्ण जग जींकले. मग भले जे खायचे असेल ते खाऊ दे, पिऊ दे आणि अधिक असेल तर इतरांना खाऊ घालू दे. दुसरे करण्यासारखे काय आहे? सोबत घेऊन जाता येते का? जे धन परक्यांसाठी खर्च केले, तेवढेच धन आपले, तेवढीच तुमच्या पुढच्या जन्मासाठी जमापुंजी. म्हणून जर कोणाला पुढील जन्मासाठी जमापुंजी जमवायची असेल तर धन पराक्यांसाठी वापरावे. परका जीव, त्यात कुठलाही जीव, मग तो कावळा का असेना, तो इतकेसे जरी चाखून

Loading...

Page Navigation
1 ... 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70